बजाज पल्सर N160 प्रचंड प्रमाणात ठरत आहे लोकप्रिय! काय आहे या बाईकमध्ये खास? जाणून घ्या फीचर्स

प्रत्येक जण आपापला बजेट आणि त्या बजेटमध्ये चांगली वैशिष्ट्ये असलेली बाईक मिळेल याच्या शोधात असतात.तसेच काही व्यक्तींना डॅशिंग आणि स्पोर्टी बाईक घेण्याची इच्छा असते व अशा बाईकच्या शोधात बरेच जण आपल्याला दिसून येतात.

bajaj pulsur n160 bike

Features Of Bajaj Pulsar N160 Bike:- प्रत्येक जण आपापला बजेट आणि त्या बजेटमध्ये चांगली वैशिष्ट्ये असलेली बाईक मिळेल याच्या शोधात असतात.तसेच काही व्यक्तींना डॅशिंग आणि स्पोर्टी बाईक घेण्याची इच्छा असते व अशा बाईकच्या शोधात बरेच जण आपल्याला दिसून येतात.

अशा प्रकारच्या अनेक बाईक सध्या बाजारात उपलब्ध आहेत व लोकप्रिय आणि प्रसिद्ध असलेल्या कंपन्यांच्या माध्यमातून अशा बाईक सादर करण्यात आलेल्या आहेत. अगदी याच प्रमाणे तुम्हाला देखील या नवीन वर्षामध्ये डॅशिंग आणि दमदार अशी बाईक घ्यायची असेल तर तुमच्याकरिता बजाज ऑटोची बजाज पल्सर N160 ही बाईक फायद्याची ठरू शकते.

बजाज ऑटोची ही बाईक 160 सीसी सेगमेंट मधील सर्वात मजबूत बाईक आहे व इतकेच नाही तर या बाईकमध्ये अनेक अत्याधुनिक असे फीचर्स देण्यात आले आहेत व लूकदेखील खूपच डॅशिंग आहे.

कसे आहे बजाज पल्सर N160 चे इंजिन?
बजाज ऑटो या कंपनीने या बाईकमध्ये अतिशय शक्तिशाली इंजिनचा वापर केला आहे. या बाईकमध्ये 164.82 सीसी चे डबल सिलेंडर ऑइल प्रकारचे इंजिन देण्यात आले असून जे 14.65NM चा टॉर्क जनरेट करते.

जर या बाईकच्या मायलेज बद्दल सांगायचे झाले तरीही बाईक 56 किलोमीटर पर लिटर इतके मायलेज देते.या बाईकचा टॉप स्पीड 120 किलोमीटर प्रतितास आहे व कंपनीने या बाईकमध्ये पाच स्पीड गिअरबॉक्स दिला आहे.

बजाज पल्सर N160 बाईकचे वैशिष्ट्ये
तर आपण या बाईकचे प्रीमियम वैशिष्ट्य बघितले तर यामध्ये डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल, डिजिटल स्पीडोमीटर आणि डिजिटल ओडोमीटर दिले आहे.

तसेच या बाईकमध्ये हॅझार्ड वार्निंग इंडिकेटर, डिस्टन्स टू एमटी इंडिकेटर दिले असून ही बाईक सिंगल चैनल ABS सिस्टीमवर काम करते. तसेच या बाईकच्या मागील आणि पुढील अशा दोन्ही बाजूस डिस्क ब्रेक देण्यात आले आहेत.

किती आहे या बाईकची किंमत?
तुम्हाला जर या नवीन वर्षामध्ये बाईक घ्यायची असेल तर तुमच्याकरिता बजाज पल्सर N160 ही बाईक उत्तम ठरू शकते. कारण ही बाईक खूप पावरफुल आहे आणि त्यामध्ये अनेक अत्याधुनिक फीचर्स देण्यात आले आहेत.

कंपनीच्या माध्यमातून ही बाईक वेगवेगळ्या प्रकारांमध्ये सादर करण्यात आली आहे. जर आपण या बाईकची एक्स शोरूम आणि ऑन रोड किंमत इत्यादी बद्दल पाहिले तर एक्स शोरूम किंमत ही एक लाख 50 हजार रुपयांपासून सुरू होते आणि एक लाख 66 हजारापर्यंत जाते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe