Electric Car Price : इलेक्ट्रिक कार खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर आली आहे. खरे तर गेल्या काही वर्षांमध्ये भारतात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी झपाट्याने वाढली आहे. ग्राहकांमध्ये इलेक्ट्रिक कारची मोठी क्रेज पाहायला मिळत आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमती पाहता आता इलेक्ट्रिक कार वापरायला पसंती दाखवली जात आहे.
जर तुम्हीही इलेक्ट्रिक कार खरेदी करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एमजी या कंपनीने गुड न्यूज दिली आहे. एमजीने आपल्या लोकप्रिय इलेक्ट्रिक कारची किंमत एक लाख रुपयांनी कमी केली आहे. एमजी मोटर कंपनी आपले शताब्दी वर्ष सेलिब्रेट करत आहे.
अशातच कंपनीने आपल्या ग्राहकांना मोठी भेट दिली आहे. ग्राहकांसाठी कंपनीने आपल्या सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कारची किंमत कमी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. मिळालेल्या माहितीनुसार कंपनीने एमजी कॉमेट EV या इलेक्ट्रिक कारची किंमत एक लाख रुपयांनी कमी केली आहे.
किमतीत कपात केल्यानंतर आता ही इलेक्ट्रिक कार फक्त आणि फक्त 6.99 लाख रुपये एक्स शोरूम किमतीत उपलब्ध होणार आहे. कंपनीने गेल्या वर्षी ही कार 7.98 लाख रुपये किमतीत बाजारात ही कार लॉन्च केली होती.
आता मात्र ग्राहकांना ही कार स्वस्तात खरेदी करता येणार आहे. यामुळे जर तुम्हालाही ही इलेक्ट्रिक कार खरेदी करायची असेल तर तुमचे एक लाख रुपये वाचणार आहेत. आता आपण या गाडीचे फीचर्स थोडक्यात समजून घेणार आहोत.
काय आहेत स्पेसिफिकेशन अँड फिचर्स ?
या कारमध्ये 55 हून अधिक कनेक्टेड कार फीचर्स, वायरलेस अँड्रॉइड आणि ऍपल कार प्ले, फ्लोटिंग ट्विन डिस्प्ले, 100 हून अधिक व्हॉइस कमांड आणि डिजिटल की यांसारखी वैशिष्ट्ये आहेत. या कारमध्ये 10.25 इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आहे, जी वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कार प्लेला सपोर्ट करते.
स्टीयरिंग व्हीलवर नियंत्रण बटणे प्रदान केली जातात, ज्यांचे डिझाइन iPad सारखे आहे. यात 17.3kWh क्षमतेचा बॅटरी पॅक आहे, त्याची इलेक्ट्रिक मोटर 41bhp पॉवर आणि 110Nm टॉर्क जनरेट करते. ही कार 230 किमीची रेंज देते. या गाडीची बॅटरी सात तासात चार्ज होते.
या गाडीची बॅटरी पाच तासात 80% पर्यंत चार्ज होते. या कारमध्ये ड्युअल एअर बॅग, अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम, रियर पार्किंग सेन्सर, सीट बेल्ट रिमाइंडर, स्पीड अलर्ट सिस्टम, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम यांसारखे फीचर्स देखील आहेत.