टाटा पंच आहे भारतातील सर्वात सुरक्षित इलेक्ट्रिक कार! भारत-NCAP क्रॅश टेस्टमध्ये मुलांच्या सुरक्षिततेसाठी मिळाले 45 गुण, वाचा माहिती

Ajay Patil
Published:
tata punch ev

 

वाहननिर्मिती क्षेत्रातल्या अनेक कंपन्या आता इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मितीकडे वळल्या असून या इलेक्ट्रिक वाहनांमध्ये अनेक कंपन्यांच्या माध्यमातून इलेक्ट्रिक कारची देखील निर्मिती करण्यात येत आहे. वाहन निर्मिती क्षेत्रातील आघाडीची असलेल्या टाटा मोटर्स या कंपनीने देखील इलेक्ट्रिक कार्स बाजारात आणल्या असून त्यांची टाटा पंच ईव्ही एक लोकप्रिय ठरलेली कार आहे.

याच टाटा पंच ईव्ही ही भारतातील आता सर्वात सुरक्षित इलेक्ट्रिक कार बनली आहे. कारण नुकत्याच झालेल्या भारत न्यू कार असेसमेंट प्रोग्राम  किंवा भारत एनसीएपी कडून क्रॅश चाचण्या घेण्यात आल्या व त्यामध्ये या कारला पाच स्टार सुरक्षा रेटिंग मिळाले आहे. त्याबद्दलचीच माहिती या लेखात घेऊ.

 टाटा पंच ईव्ही बनली भारतातील सर्वात सुरक्षित इलेक्ट्रिक कार

टाटा मोटर्सची टाटा पंच ईव्ही भारतातील सर्वात सुरक्षीत इलेक्ट्रिक कार बनली असून याला भारत न्यू कार असेसमेंट प्रोग्राम किंवा भारत एनसीएपीकडून घेण्यात आलेल्या क्रॅश टेस्टमध्ये पाच स्टार सुरक्षा रेटिंग मिळाली आहे

या चाचणीमध्ये या कारणे प्रौढांच्या सुरक्षेकरिता 32 पैकी 31.46 गुण आणि मुलांच्या सुरक्षिततेकरिता 49 पैकी 45 गुण मिळवले आहेत. महत्वाचे म्हणजे ही भारतातील सर्वात स्वस्त आणि चार मीटर पेक्षा कमी रेंज मधील सर्वात लहान इलेक्ट्रिक एसयूव्ही आहे. ही कार यावर्षी म्हणजे जानेवारीमध्ये लॉन्च करण्यात आलेली होती.

भारत एनसीएपी क्रॅशने प्रथमच घेतली इलेक्ट्रिक कारची टेस्ट

भारती एनसीईपी ने नुकतीच टाटा पंच आणि टाटा नेक्सन या दोन्ही कारची क्रॅश चाचणी घेतली व त्याचा अहवाल गुरुवारी प्रसिद्ध करण्यात आला. महत्त्वाचे म्हणजे भारतीय एजन्सीने इलेक्ट्रिक वाहनाची चाचणी घेण्याची ही पहिलीच वेळ असून  त्यामुळे टाटा पंच या क्रॅश टेस्टमध्ये सहभागी होणारी देशातील पहिली इलेक्ट्रिक कार ठरली आहे

व एवढेच नाही तर टाटा पंच ईव्ही ही या टेस्टमध्ये सर्वाधिक गुण मिळवणारी टाटाची पहिली कार देखील ठरली आहे. या कारला प्रौढ संरक्षण आणि बालसंरक्षण श्रेणीमध्ये पाच स्टार रेटिंग प्राप्त झाले असून जे सर्व प्रकारांवर लागू आहे.

 बाल संरक्षण श्रेणीमध्ये मिळवले पाच स्टार

झालेल्या या टेस्टमध्ये 18 महिन्यांच्या आणि तीन वर्षाच्या मुलांच्या डमी विरुद्ध दिशेने बाल संयम प्रणालीवर ठेवण्यात आल्या. टाटा पंच ईव्हीने बाल संरक्षण श्रेणीमध्ये 49 पैकी 45 गुण मिळवले व या श्रेणीमध्ये पाच तारखेला चाचणी रेटिंग मिळवण्यासाठी हे गुण पुरेसे आहेत.