Hero Splendor : जगात मोठे नाव असणारी Hero कंपनीने मोटारसायकल (Bike) स्प्लेंडरची Splendor + XTEC आवृत्ती लॉन्च (Launch) केली आहे. या नवीन Hero Splendor + ‘XTEC’ मध्ये ब्लूटूथ (Bluetooth) कनेक्टिव्हिटी, डिजिटल मीटर, कॉल (Call) आणि एसएमएस अलर्ट (SMS Alert), RTMI (रिअल टाइम मायलेज इंडिकेटर), फ्युएल इंडिकेटर, एलईडी लॅम्प, एक्सक्लुझिव्ह ग्राफिक्स, इंटिग्रेटेड यूएसबी चार्जर ही वैशिष्ट्ये (Features) आहेत.
याशिवाय साइड-स्टँड इंजिन कट-ऑफ आणि हिरोचे क्रांतिकारी i3S तंत्रज्ञान (आयडल स्टॉप-स्टार्ट सिस्टम) यांसारखी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. नवीन Hero Splendor + XTEC 72,900 रुपये (एक्स-शोरूम) च्या सुरुवातीच्या किमतीत बाजारात लॉन्च करण्यात आला आहे. नवीन Splendor+ XTEC 5 वर्षांच्या वॉरंटीसह येते.
अखंड कनेक्टिव्हिटी
नवीन मोटरसायकलला ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह स्प्लेंडर + XTEC सह सेगमेंट-फर्स्ट फुल डिजिटल मीटर मिळेल. यामध्ये डिजिटल डिस्प्ले, इनकमिंग आणि मिस्ड कॉल अलर्ट, मेसेज अलर्ट, आरटीएमआय (रिअल टाइम मायलेज इंडिकेटर) आणि फ्युएल इंडिकेटर सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. यासोबतच यात दोन ट्रिप मीटर, यूएसबी चार्जिंग पोर्टही देण्यात आले आहेत.
डिझाइन, सुरक्षा
त्याचा एलईडी हाय इंटेन्सिटी पोझिशन लॅम्प (HIPL) आणि नवीन ग्राफिक्स स्प्लेंडर+ XTEC ला संपूर्ण नवीन रूप देतात. सुरक्षिततेच्या दृष्टीने, Hero Splendor+ XTEC ला साइड-स्टँड व्हिज्युअल इंडिकेशन आणि ‘साइड-स्टँड इंजिन कट-ऑफ’ मिळतो. मोटरसायकलला बँक-अँगल-सेन्सर देखील मिळतो.
इंजिन, रंग
नवीन Splendor+ XTEC 97.2cc BS-VI इंजिनद्वारे समर्थित आहे. हे नवीन स्प्लेंडर+ XTEC चांगले मायलेज देण्यासाठी i3S पेटंट तंत्रज्ञानासह सादर करण्यात आले आहे. नवीन मोटरसायकल स्पार्कलिंग बीटा ब्लू, कॅनव्हास ब्लॅक, टोर्नाडो ग्रे आणि पर्ल व्हाईट या चार नवीन रंगांच्या पर्यायांसह येते.