कारने प्रवासाला निघाला तर ‘ही’ 5 कागदपत्रे नक्की सोबत ठेवा! नाहीतर बसेल 10 हजाराला फटका,वाचा माहिती

Ajay Patil
Published:
traffic rule

जेव्हाही आपण वाहनाने रस्त्यावर प्रवास करतो तेव्हा आपल्याला प्रवास करत असताना वाहतुकीचे नियम पाळणे खूप गरजेचे असते. अशा पद्धतीचे नियम पाळणे हे कायदेशीर दृष्टिकोनातूनच नाही तर  स्वतःच्या आणि इतरांच्या जीवाचे हिताचे देखील आहे. या व्यतिरिक्त जेव्हा आपण वाहनाने किंवा आपल्या कारने प्रवास करत असाल तर वाहतुकीचे नियम पाळणे जितके गरजेचे आहे तितकेच कायदेशीर दृष्ट्या महत्त्वाची असलेली काही कागदपत्रे तुमच्याकडे असते देखील तितकेच महत्त्वाचे आहे.

तुम्ही प्रवासाला निघालात आणि वाहतूक पोलिसांनी रस्त्यावर जर तुमच्याकडे कागदपत्रे मागितली तर ती तुम्हाला देता येणे खूप गरजेचे आहे. परंतु पोलिसांनी कागदपत्रे मागितल्यावर जर तुमच्याकडे नसतील तर कमीत कमी दहा हजार रुपयांचा दंड तुम्हाला ठोठावला जाण्याची शक्यता असते.

दुसरे म्हणजे रस्त्यावर जर एखादा अपघात वगैरे घडला तर तुमची ओळख ही कागदपत्रांच्या आधारेच होत असते व त्यासंबंधीची माहिती तुमच्या नातेवाईकांपर्यंत पोहोचवणे देखील पोलिसांना किंवा इतर लोकांना सोपे जाते. या दृष्टिकोनातून देखील सोबत काही डॉक्युमेंट्स ठेवणे खूप गरजेचे आहे. याकरिता कारने प्रवास करत असाल तर तुमच्याकडे नेमकी कोणती कागदपत्रे सोबत असणे गरजेचे आहे? याबद्दलची माहिती या लेखात बघू.

 कारने प्रवासाला निघा परंतु सोबत ही कागदपत्र ठेवा

1- वाहन परवाना अर्थात ड्रायव्हिंग लायसन्स मोटर वाहन अधिनियम 1988 आणि केंद्रीय मोटर नियम 1989 नुसार बघितले तर जेव्हाही रस्त्यावरून वाहन चालवता तेव्हा ड्रायव्हिंग करणाऱ्या व्यक्तीकडे वाहन परवाना म्हणजेच ड्रायव्हिंग लायसन्स असणे गरजेचे आहे. कारण या कागदपत्राच्या आधारे तुमची ओळख, तूमचे राष्ट्रीयत्व तसेच वय व इतर महत्त्वाची माहिती समजते.

तुमच्याकडे जर ड्रायव्हिंग लायसन्स असेल तर तुम्ही देशाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये विशेष परमिट शिवाय देखील प्रवास करू शकतात. कारण संपूर्ण देशामध्ये ड्रायव्हिंग लायसन्स वैध असते. तसेच अपघात किंवा दुर्घटना घडली तर ड्रायव्हिंग लायसन्स असणे खूप गरजेचे आहे. याचा सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे याशिवाय तुमचा विमा क्लेम होतच नाही.

2- नोंदणी प्रमाणपत्र म्हणजेच रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट कार चालवणाऱ्याच्या नावावर आहे की नाही हे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट किंवा आरसीच्या माध्यमातून कळते. तसेच वाहतूक निरीक्षक संबंधित कार आरटीओमध्ये रजिस्टर आहे की नाही याची खात्री करतात. हे कागदपत्र विम्याचा क्लेम करताना देखील खूप महत्त्वाची कागदपत्र ठरते.

रजिस्ट्रेशन सर्टिफिकेटमध्ये गाडीचा रजिस्ट्रेशन नंबर, मालकाचे नाव तसेच गाडीचा मॅन्युफॅक्चरिंग टाईप आणि कारचा कोणता प्रकार आहे ते व उत्पादनाचे वर्ष, कार नोंदणीची तारीख, कारचा चेसिस व इंजिन नंबर इत्यादी महत्त्वाची माहिती यावर असते. त्यामुळे आरसी म्हणजेच रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट प्रवास करताना सोबत असणे गरजेचे आहे.

3- थर्ड पार्टी विमा 1988 चा मोटर वाहन अधिनियम बघितला तर त्यानुसार कार चालवत असाल तर संबंधित व्यक्तीकडे विमा पॉलिसी असणे गरजेचे आहे व अशा पद्धतीची पॉलिसी तुम्हाला थर्ड पार्टी विम्याचे कव्हरेज देण्यासाठी महत्त्वाची ठरते. याचाच अर्थ जर तुमच्या वाहनाने एखाद्या तिसऱ्या पक्षाचे म्हणजेच व्यक्ती, वाहन किंवा संपत्तीचे नुकसान झाले तर थर्ड पार्टी विम्यामुळे संबंधित व्यक्तीचे नुकसान भरपाई देण्यास मदत होते.

4- पीयुसी सर्टिफिकेट अर्थात पोलुशन कंट्रोल सर्टिफिकेट हे सर्टिफिकेट खूप महत्त्वाचे असून यामुळे तुमच्या वाहनातील कार्बनच्या उत्सर्जनाची लेवल किती आहे याची माहिती मिळते. वाढत्या प्रदूषणामुळे काही प्रमाणात वाहनांचे उत्सर्जन वाढते. याकरिता सोबत पोलुशन कंट्रोल सर्टिफिकेट असणे खूप गरजेचे असते.

तुम्ही जी कार चालवत आहात ती कार निर्धारित काळापर्यंत कार्बन उत्सर्जन करते आणि नियम व यासंबंधी असलेली इतर मानकांचे पालन केले जाते हे या सर्टिफिकेटच्या माध्यमातून सिद्ध होत असते. अशा प्रसंगी तुम्ही प्रवास करत असताना जर तुम्हाला ट्राफिक पोलिसांनी अडवले आणि तुमच्याकडे पीयूसी मागितली व तुमच्याकडे जर ती नसेल तर दहा हजार रुपयांचा दंड तुम्हाला होऊ शकतो किंवा सहा महिन्याचा तुरुंगवास देखील होण्याची शक्यता असते किंवा दोन्ही शिक्षा देखील होऊ शकतात.

5- आयडी प्रूफसाठीची कागदपत्रे आधार कार्ड आणि पॅन कार्ड यासारखे डॉक्युमेंट कार चालवताना असावेत असे बंधन नाही. परंतु काही अवघड परिस्थितीमध्ये ही कागदपत्रे तुम्हाला खूप मोलाची मदत करू शकतात. याकरिता तुम्ही डीजीलॉकर सारख्या डिजिटल डॉक्युमेंट स्टोरेज प्लॅटफॉर्मचा वापर करून ही कागदपत्र तुमच्याजवळ ठेवू शकता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe