Renault Triber Car:- आजकाल मोठ्या कुटुंबासाठी किफायतशीर आरामदायक आणि शक्तिशाली कारची आवश्यकता असते. रेनॉल्ट ट्रायबर या ७ सीटर एसयूव्हीमध्ये तुम्हाला या सर्व गोष्टी मिळतात. ही कार खास कुटुंबांसाठी डिझाइन केली आहे आणि या कारची किंमत भारतीय बाजारपेठेतील इतर कार्सच्या तुलनेत खूपच परवडणारी आहे. रेनॉल्ट ट्रायबरची सुरुवातीची किंमत 6 लाख ते 8.98 लाख रुपयाच्या दरम्यान आहे.ज्यामुळे ती एक उत्तम फॅमिली कार म्हणून ओळखली जाते.
रेनॉल्ट ट्रायबर किंमती
रेनॉल्ट ट्रायबर विविध प्रकारांमध्ये उपलब्ध असून ते प्रकार पुढील प्रमाणे…
RXE: 6 लाख
RXL – 6.80 लाख रुपये
RXL नाईट अँड डे एडिशन – 7 लाख रुपये
RXT – 8.98 लाख रुपये
इंजिन
रेनॉल्ट ट्रायबरमध्ये 999 सीसी पेट्रोल इंजिन आहे. जे 71.01 बीएचपी पॉवर आणि 96 एनएम टॉर्क जनरेट करते. ही कार 5-स्पीड मॅन्युअल आणि 5-स्पीड एएमटी ट्रान्समिशन पर्यायांसह उपलब्ध आहे. ट्रायबरचे मायलेज साधारणत: 19 किमी प्रति लिटर आहे.त्यामुळे तुमच्या लांब अंतर आणि शहरातील ड्रायव्हिंग दोन्ही ठिकाणी चांगले मायलेज देते.
वैशिष्ट्ये
रेनॉल्ट ट्रायबरमध्ये अत्याधुनिक वैशिष्ट्यांचा समावेश आहे. यात 8 इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, अँड्रॉइड ऑटो, वायरलेस चार्जिंग, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम (TPMS), 60:40 फोल्डेबल रिअर सीट,
पुश-बटण स्टार्ट, रिअर एसी व्हेंट्स आणि कीलेस एंट्री यांसारखी सुविधा दिली आहे. सुरक्षा बाबत ग्लोबल एनसीएपीने ट्रायबरला प्रौढांच्या सुरक्षेसाठी 4-स्टार आणि मुलांच्या सुरक्षेसाठी 3-स्टार रेटिंग दिले आहे.
आरामदायक राइड
ट्रायबरचा ग्राउंड क्लीयरन्स 182 मिमी आहे.म्हणजेच खराब रस्त्यांवर किंवा खडबडीत रस्त्यांवर देखील तुमचं वाहन आरामदायक राइड देईल. प्रोजेक्टर हेडलाइट्स आणि एलईडी डीआरएल ट्रायबरला प्रीमियम आणि आकर्षक लूक देतात.
शक्तिशाली इंजिन
ट्रायबरमध्ये 1.0-लिटर 3-सिलेंडर पेट्रोल इंजिन आहे, जे 72 हॉर्सपॉवर आणि 96 न्यूटन मीटर टॉर्क निर्माण करते. त्यामुळे तुम्हाला उत्कृष्ट पिकअप आणि मायलेज दोन्ही मिळतात. 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स किंवा ऑटोमेटेड मॅन्युअल ट्रान्समिशन (AMT) चा पर्याय उपलब्ध असल्यामुळे तुम्ही तुमच्या सोयीप्रमाणे ड्रायव्हिंग अनुभव घेऊ शकता.