Gold-Silver Rate:- गेल्या काही महिन्यांपासून आपण बघितले तर सोने आणि चांदीच्या दरामध्ये प्रचंड प्रमाणात वाढ होताना दिसून येत आहे. फक्त ज्या दिवशी अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता व सोन्यावरील आयात शुल्क कमी करण्याची घोषणा अर्थसंकल्पामध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली.
त्यादिवशी काही तासांनी सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळाली होती. त्यानंतर मात्र परत सोन्याने उच्चांकी पातळी गाठायला सुरुवात केली होती.मध्यंतरीच्या कालावधीमध्ये दसरा आणि दिवाळीसारखे सण आले परंतु त्यावेळेस देखील सोन्याच्या भावात प्रचंड प्रमाणात वाढ झाल्याची स्थिती होती.
परंतु त्यानंतर मात्र आता सातत्याने घसरण पाहायला मिळत असून गेल्या पंधरा दिवसांमध्ये 5942 रुपयांनी सोने स्वस्त झाल्याचे चित्र आहे.जर आपण इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन नुसार बघितले तर सध्या 24 कॅरेट दहा ग्राम सोन्याचे दर 73 हजार 739 रुपयांपर्यंत आले असून त्यामध्ये 1521 रुपयांनी घसरण पाहायला मिळत आहे.
यापूर्वी दहा ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचे दर 75 हजार 260 रुपये इतके होते. तसेच आज जर चांदीचे दर बघितले तर त्यामध्ये प्रति किलो 2644 रुपयांनी घसरण पाहायला मिळत असून चांदीचे दर 87 हजार 103 रुपये प्रति किलो इतका झाला आहे.
या अगोदर चांदीचे दर हे 89 हजार 747 रुपये होते.जर आपण चांदीचा या कालावधीतील सर्वात उच्चांकी दर पाहिला तर तो 23 ऑक्टोबर रोजी 99 हजार 151 रुपये प्रति किलो पर्यंत पोहोचला होता.
गेल्या पंधरा दिवसातील सोने आणि चांदीच्या दराची स्थिती
गेल्या पंधरा दिवसाच्या कालावधीतील जर आपण सोने आणि चांदीच्या दराची स्थिती पाहिली तर 24 कॅरेट सोने हे प्रति तोळा 5942 रुपयांनी स्वस्त झाले आहे.30 ऑक्टोबर रोजी 24 कॅरेट सोन्याची प्रति तोळा किंमत ही 79,681 रुपये इतकी होती.
आता सोन्याचे दर 73 हजार 739 रुपयांवर आले आहेत. तसेच चांदीची 23 ऑक्टोबर रोजीची स्थिती बघितली तर चांदीचे दर प्रति किलो 99151 रुपये इतके होते व त्यामध्ये आता घसरण होऊन प्रति किलो चांदीची किंमत 87 हजार 103 रुपये आहे.
आज काय आहेत पुण्यातील सोन्याचे दर?
जर आपण पुणे शहराचा आजच्या सोने आणि चांदीच्या दराचा विचार केला तर त्या ठिकाणी दहा ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचे दर 74 हजार 360 रुपये आहेत. तसेच दहा ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचे दर 68 हजार 830 रुपये तर चांदी प्रति किलो 90 हजार रुपयांवर गेली आहे.