Gold-Silver Price Today:- गेल्या काही दिवसांपासून जर आपण सोने आणि चांदीचे दर बघितले तर यामध्ये चढउतार होताना दिसून येत आहे व चालू आठवड्यामध्ये सोन्यात आपल्याला वाढीचा ट्रेंड दिसून आला तर चांदी मात्र थोड्याशा प्रमाणात घसरलेली दिसली.
जर आपण इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाईट नुसार बघितले तर काल म्हणजेच 14 डिसेंबर रोजी सोन्याचे दर 76 हजार 922 रुपये प्रति दहा ग्रॅम तर चांदीचे दर हे 88 हजार 976 रुपये प्रतिकिलो इतके होते. या आठवड्यामध्ये चांदीच्या किमतीत १८४४ रुपयांनी घट झाल्याचे दिसून आले.
या अनुषंगाने आज मात्र सोन्याच्या दरात कालपेक्षा काहीशी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. आज जर आपण सोन्याचे दर पाहिले तर ते 24 कॅरेट सोन्याचे प्रतितोळा करिता हा 77 हजार 890 रुपये मोजावे लागतील. म्हणजेच आज एक ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत 7789 रुपये इतकी आहे.
तसेच 22 कॅरेट सोन्याची प्रतितोळा किंमत आज 71400 आहे. म्हणजेच 22 कॅरेटचे एक ग्रॅम सोने जर तुम्ही आज खरेदी केले तर तुम्हाला 7140 रुपये मोजावे लागणार आहेत. तसेच चांदीचे आजचे दर बघितले तर आज चांदीची किंमत प्रतिकिलो 92 हजार पाचशे रुपये इतकी आहे. या दराने तुम्हाला जर 100 ग्रॅम चांदी खरेदी करायची असेल तर त्याकरिता नऊ हजार दोनशे पन्नास रुपये मोजावे लागणार आहेत.
महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरांमधील आजचे सोने-चांदीचे दर
1- अहमदनगर- अहमदनगर येथे आज 24 कॅरेटच्या एक तोळा सोन्याची किंमत 77 हजार 890 रुपये आहे तर 22 कॅरेट सोन्याच्या एक तोळ्याची किंमत 71 हजार चारशे रुपये इतकी आहे. जर चांदीचे दर प्रतीकिलोला 92 हजार पाचशे रुपये आहेत.
2- जळगाव- जळगाव येथे आज 24 कॅरेटच्या एक तोळे सोन्याची किंमत 77,890 तर 22 कॅरेट एक तोळा सोन्याची किंमत 71400 आहे. तसेच एक किलो चांदीची किंमत 92 हजार पाचशे रुपये आहे.
3- मुंबई- मुंबई येथे आज 24 कॅरेटच्या एक तोळा सोन्याची किंमत 77 हजार 890 तर 22 कॅरेट सोन्याची एक तोळाची किंमत 71 हजार चारशे रुपये इतकी आहे. तर एक किलो चांदीची किंमत 92 हजार पाचशे रुपये आहे.
4- पुणे- पुण्याला आज 24 कॅरेट एक तोळा सोन्याची किंमत 77 हजार 890 तर 22 कॅरेट एक तोळा सोन्याची किंमत ७१४०० रुपये आहे. तसेच चांदीची किंमत एक किलोला 92 हजार पाचशे रुपये आहे.
5- नासिक- नासिक येथे आज 24 कॅरेटच्या एक तोळा सोन्याची किंमत 77 हजार 890 तर 22 कॅरेटच्या एक तोळ्याची किंमत 71 हजार चारशे रुपये इतकी आहे. एक किलो चांदीची किंमत 92 हजार पाचशे रुपये आहे.