अरे व्वा! संपूर्ण देशात राहील सोन्याचा एकच भाव; काय आहे केंद्र सरकारची यामागील प्लॅनिंग? सोन्याचे दर गडगडणार? वाचा माहिती

Published on -

सोने आणि चांदीचे भाव गेल्या काही दिवसापासून कधी नव्हे एवढ्या उच्चांकी पातळीवर असून दिवसेंदिवस यामध्ये आपल्याला वाढ होताना दिसून येत आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर सोने-चांदीची खरेदी गेल्याचे आपल्याला दिसून येते. तसे पाहायला गेले तर सोने-चांदीच्या दरामध्ये थोड्याफार प्रमाणात चढ-उतार होताना सध्या दिसत आहे.

परंतु सोने आणि चांदीच्या दरांच्या बाबतीत जर आपण पाहिले तर एका ठिकाणी किंवा संपूर्ण देशांमध्ये एकच भाव नसतो. देशातील विविध शहरांमध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे भाव दिसून येतात

यामागे त्या त्या राज्यांचे कर किंवा इतर अनेक गोष्टी असतात व त्यामुळे सोने चांदीच्या दरात ही तफावत आपल्याला दिसते. परंतु आता एक माहिती समोर येत असून ज्याप्रमाणे वेगवेगळ्या राज्यांमध्ये आणि वेगवेगळ्या शहरांमध्ये सोन्याचे वेगवेगळे बाजार भाव आपल्याला दिसतात. यापुढे असे होणार नाही.

यापुढे संपूर्ण देशामध्ये सोन्याचे भाव एकसमान असल्याचे आपल्याला दिसून येईल.कारण केंद्र सरकार आता एक धोरण लागू करणार आहे व यामुळे आता देशातील सर्व शहरांमध्ये एकच भावात सोने खरेदी करता येणे शक्य होणार आहे.

 देशात लागू केले जाणार वन नेशन वन गोल्ड रेट धोरण

याबाबत सविस्तर वृत्त असे की, संपूर्ण देशामध्ये वेगवेगळ्या राज्यात आणि शहरांमध्ये जे सोने-चांदीच्या दरामध्ये आपल्याला फरक दिसून येतो तो यापुढे दिसणार नाही.कारण देशामध्ये वन नेशन वन गोल्ड रेट धोरण लागू होणार आहे. जेव्हा हे धोरण देशामध्ये लागू केले जाईल तेव्हा देशातील सर्व शहरातील सोन्याच्या दुकानांमध्ये सारखे भाव पाहायला मिळतील.मिळालेल्या माहितीनुसार सरकारच्या या धोरणाला देशातील सर्व मोठ्या ज्वेलर्सच्या माध्यमातून देखील सहमती दाखवण्यात आलेली आहे.

संपूर्ण देशामध्ये सोन्याच्या दरात समानता यावी याकरिता जेम अँड ज्वेलरी कौन्सिलने पाठिंबा दिला आहे व सप्टेंबर महिन्यात याबाबत सरकारकडून अधिकृत घोषणा केली जाईल अशी माहिती समोर आलेली आहे. या वन नेशन वन गोल्ड रेट पॉलिसी ही भारत सरकारच्या माध्यमातून प्रस्तावित केलेली पॉलिसी आहे.

या माध्यमातून देशात सर्व राज्यात सोन्याच्या किमती सारख्या असाव्यात हे या धोरणामागील प्रमुख उद्दिष्ट आहे. याकरता सरकारच्या माध्यमातून राष्ट्रीय पातळीवर बुलियन एक्सचेंज स्थापन  केले जाणार असून नॅशनल बुलियन एक्सचेंज संपुर्ण देशातील सोन्याचा भाव ठरवेल. ज्याप्रमाणे शेअर बाजारामध्ये एखाद्या कंपनीच्या शेअरची किंमत संपूर्ण देशात सारख्या असतात.

अगदी त्याचप्रमाणे आता संपूर्ण देशात सोन्याचे भाव देखील एकसारखे असावेत याकरिता हे धोरण महत्वाचे ठरणार आहे. सध्या जर आपण सोन्याचे दर ठरवण्याची पद्धत पाहिली तर ती सराफा बाजार संघटना ठरवतात.

यामुळे प्रत्येक शहरासाठी वेगवेगळे सोन्याचे दर असतात. परंतु आता वन नेशन वन गोल्ड रेट पॉलिसी अंतर्गत नॅशनल बुलियन एक्सचेंजच्या माध्यमातून संपूर्ण देशात सोन्याचा एकच भाव ठरणार आहे.

या धोरणामुळे सोन्याच्या बाजारभावात पारदर्शकता वाढण्यास मदत होईल व त्यामुळे सोन्याच्या किमती मधील फरक कमी होऊ शकतो व त्यामुळे सोन्याच्या विक्रीसाठी जे ज्वेलर्स मनमानी करतात त्यांच्यावर देखील आता नियंत्रण ठेवता येणे शक्य होणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News