Tomato rate India : टोमॅटो दराला केंद्राचा लगाम !

Ahmednagarlive24 office
Updated:
Tomato rate

Tomato rate : केंद्र सरकारने आता दिल्ली एनसीआर परिसरात टोमॅटोचे दर नियंत्रित ठेवण्यासाठी महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश. कर्नाटकातून टोमॅटोची खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे.

सरकारने दर नियंत्रणासाठी उत्पादक राज्यांतील दरांवर कसा घेतलेला हा निर्णय मूळ टोमॅटो परिणाम करणार, याबाबत आता उलटसुलट चर्चा सुरू आहे.

महाराष्ट्रात टोमॅटोचा दर सध्या ९० ते १४० रुपये प्रतिकिलो असला तरी त्याचा राष्ट्रीय स्तरावरील सरासरी दर १०८ रुपये इतका नोंदवला गेला आहे. देशातील टोमॅटोचा सर्वाधिक सरासरी दर दिल्ली एनसीआरमध्ये दीडशे रुपयांपर्यंत पोहोचला असून त्याखालोखाल लखनौमध्ये १४३, चेन्नई १२३ आणि दिब्रुगडमध्ये ११५ रुपये इतके आहेत.

दरनियंत्रणासाठी केंद्राच्या ग्राहक व्यवहार विभागाने राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ अर्थात नाफेड आणि राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघाला आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्रातील मंडयांमधून त्वरित टोमॅटो खरेदी करण्याचे निर्देश दिले आहेत.

हा साठा सर्वोच्च दरवाढ नोंदवलेल्या प्रमुख बाजारपेठांमध्ये वितरित केला जाणार आहे. त्यामुळे या आठवड्यात दिल्ली एनसीआर क्षेत्रातील ग्राहकांना टोमॅटो कमी दरात उपलब्ध होणार आहेत. टोमॅटोचे उत्पादन भारतातील जवळपास सर्व राज्यांमध्ये वेगवेगळ्या प्रमाणात होते.

त्यात बहुतांश उत्पादन भारताच्या दक्षिण आणि पश्चिम भागांत होते, ज्याचा एकूण उत्पादनात ५६ टक्के ते ५८ टक्के वाटा आहे. पिकाच्या हंगामानुसार इतर बाजारपेठांना येथील टोमॅटोचा पुरवठा केला जातो. प्रतिकूल हवामानामुळे पिकांचे नुकसान, बाजारात कमी आवक आणि मागणीतील वाढ यामुळे किमतींमध्ये अचानक वाढ झाली आहे.

तसेच आता जुलै महिना अतिपावसाचा असल्यामुळे वितरणाशी संबंधित आव्हाने आणि वाहतुकीदरम्यान होणाऱ्या नुकसानीमुळेही किमती वाढल्या आहेत. सध्या महाराष्ट्रातून विशेषतः सातारा, नारायणगाव आणि नाशिकमधून गुजरात, मध्य प्रदेश आणि इतर काही राज्यांमधील बाजारपेठांमध्ये पुरवठा होतो.

हा पुरवठा या महिन्याच्या शेवटपर्यंत पुरेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. आंध्र प्रदेशातील मदनापल्ली (चित्तूर) येथेही वाजवी प्रमाणात आवक सुरू आहे. दिल्ली एनसीआरमधील आवक प्रामुख्याने हिमाचल प्रदेशातून आणि काही प्रमाणात कर्नाटकातील कोलारमधून होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe