‘अब इसको जिंदा नही छोडेंगे’ असे म्हणत तरुणाच्या डोक्यात केले कोयत्याने अन चोपरने वार

अहिल्यानगर : तू खूप माजला आहेस, आमच्याकडे रागाने का पाहतोस, आम्हाला ओळखत नाहीस काय, असे म्हणून शिवीगाळ करून चौघांनी एकास लाथाबुक्क्यांनी व लाकडी काठीने मारहाण करुन लोखंडी कोयता, चॉपरने वार करुन त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना क्लेरा ब्रूस बॉईज होस्टेलच्या समोरील रोडवर १९ मार्च रोजी मध्यरात्री घडली. याबाबत अलजैद रहीम शेख (वय २२,रा. … Read more

रात्री महामार्गावर वाहनचालकाला मारहाण करत लुटले अन भल्या पहाटेच पोलिसांनी उचलले

अहिल्यानगर : नगर पुणे महामार्गावर नगर तालुक्यातील चास गावाच्या शिवारात रात्रीच्या वेळी वाहनचालकाला रस्त्यात अडवून मारहाण करत लुटल्याची घटना दि. १९ मार्चला रात्री ११.४५ वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेची माहिती मिळताच नगर तालुका पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवत केडगाव येथील तीन आरोपींना पहाटेच्या सुमारास पकडले आहे. यात दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. याबाबत तौफिक शरीफ … Read more

देहरे गावातील लैंगिक अत्याचार प्रकरण : ‘त्या’ दोन नराधमांना पुण्यातुन अटक

अहिल्यानगर तालुक्यातील देहरे येथे इन्स्टाग्रामवर ओळख झालेल्या एका तरुणीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने पुणे येथून ताब्यात घेतले आहे. या गंभीर गुन्ह्यातील मुख्य आरोपी तन्वीर शफीक शेख आणि त्याचा साथीदार सोहेल रियाज शेख यांना पकडण्यासाठी पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे प्रभावी कारवाई केली. ही घटना १४ मार्च २०२५ रोजी घडली … Read more

कंटेनरच्या भीषण अपघातात टोलनाका भूईसपाट छत्रपती संभाजी नगर महामार्गावरील घटना

अहिल्यानगर : छत्रपती संभाजी नगर महामार्गावरील जेऊर शिवारातील बंद पडलेले टोल गेट वारंवार अपघाताला निमंत्रण देत असल्याने ते हटविण्याची मागणी नागरिकांमधून होत होती परंतु संबंधितांकडून या मागणीकडे कायमच दुर्लक्ष झाले त्यामुळे बंद असलेल्या टोल गेटला धडकून अनेक अपघात घडत होते गुरुवारी मध्यरात्री कंटेनरच्या झालेल्या अपघातात टोल गेट भुईसपट झाले आहे. सुदैवाने अपघातात कोणी जखमी झाले … Read more

Ahilyanagar News : धक्कादायक! अहिल्यानगरच्या ‘या’ देवस्थानच्या जमिनी वक्फ बोर्डाच्या ताब्यात?

मागील काही दिवसांपासून वक्फ बोर्ड अन वक्फ बोर्डाच्या बेकायदेशीर नोंदणी राज्यभरात चर्चेच्या विषय ठरत आहेत. परंतु आता अहिल्यानगरमधील अनेक ठिकाणच्या देवस्थानाच्या जमिनींची वक्फ बोर्डाकडे बेकायदेशीर नोंदणी झाली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. संगमनेर नगरपालिका हद्दीतील मोक्याच्या ठिकाणी असणारे तसेच संगमेर तालुक्यातील सुकेवाडी, घुलेवाडी, पारेगाव या देवस्थानाच्या जमिनींची वक्फ बोर्डाकडे बेकायदेशीर नोंदणी झाली असल्याची माहिती … Read more

Breaking ! उन्हाच्या झळांमुळे शाळांची वेळ बदलली, आता सकाळी किती वाजता ?

वाढत्या उन्हाच्या झळा लक्षात घेता अहिल्यानगर जिल्ह्यातील शाळांचे वेळापत्रक बदलण्यात आले आहे. जिल्हा परिषदेसह सर्व व्यवस्थापनांच्या शाळा आता सकाळच्या सत्रात भरतील, अशी माहिती जिल्हा परिषद प्रशासनाने दिली आहे. हा निर्णय २० मार्च २०२५ पासून लागू होत असून, उन्हाळी सुटी लागेपर्यंत म्हणजेच १ मेपर्यंत शाळा सकाळी ७ ते दुपारी १२:३० या वेळेत चालतील. या संदर्भातील आदेश … Read more

जलसंवर्धनाची कामे मोहिम स्तरावर करा- जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया

अहिल्यानगर, दि.२०-  जिल्ह्यातील जलस्रोतांच्या पुनरूज्जीवनासाठी अत्यंत उपयुक्त असलेल्या गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार तसेच जलयुक्त शिवार २.० या योजना जिल्ह्यात मोहिम स्तरावर राबविण्याच्या सुचना जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजना व जलयुक्त शिवार योजनेच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, जिल्हा … Read more

बँकांनी संवेदनशीलतेने कर्ज प्रकरणे मंजूर करावीत- जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया

अहिल्यानगर, दि. २०- शासनमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांना तसेच शेतकऱ्यांना कर्ज वाटपामध्ये प्राधान्य देत बँकांनी संवेदनशीलतेने अधिकाधीक कर्ज प्रकरणे मंजूर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हास्तरीय बँकर्स समितीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी रिझर्व बँकेचे प्रतिनिधी राजेंद्र कनीशेट्टी, जिल्हा अग्रणी बँक अधिकारी आशिष नवले, नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक … Read more

रात्रीच्या वेळी अहिल्यानगरमधील ‘या’ महामार्गावरून जाताय? सावधान ! होतेय ‘असे’ काही

सध्या माणूस किती सुरक्षित राहिलाय असा प्रश्न पडायला लागलाय. महिलांची सुरक्षितता तर ऐरणीवर आलेली आहेच. परंतु आता पुरुषांनाही रात्रीच्या वेळी सावधरीत्या बाहेर पडावे लागणार असल्याचे चित्र आहे. याचे कारण असे की रात्रीच्या वेळी महामार्गावर लूटमार करण्याच्या घटना वाढीस लागल्या आहेत. नुकतीच रात्रीच्या वेळी वाहनचालकाला रस्त्यात अडवून मारहाण करत लुटल्याची घटना नगर-पुणे महामार्गावर चास (ता. नगर) … Read more

नगर-पुणे रेल्वेमार्गासाठी टास्कफोर्स हवा खा. नीलेश लंके यांचे रेल्वे बोर्डाच्या चेअरमनला साकडे वाढत्या औद्योगिकरणाची पार्श्वभूमी

अहिल्यानगर : अहिल्यानगर ते पुणे दरम्यान झपाटयाने वाढत असलेल्या औद्योगिकरणाच्या पार्श्वभूमीवर नगर-पुणे दरम्यान रेल्वे सेवा सुरू करण्यासंदर्भात खासदार नीलेश लंके यांनी रेल्वे बोर्डाचे चेअरमन सतीशकुमार यांच्याकडे आग्रह धरला. दरम्यान, औद्योगीकरण म्हणजे विकास असे सांगत सतीशकुमार यांनी या मार्गासंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्याची ग्वाही खा. लंके यांना दिली.  चेअरमन सतीशकुमार यांच्यासोबत झालेल्या बैठकीदरम्यान खासदार नीलेश लंके यांनी सुपा औद्योगिक … Read more

जल-जीवनच्या कामांची चौकशी करा खासदार नीलेश लंके यांची संसदेत मागणी योजनेमध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाल्याचा आरोप

अहिल्यानगर : अहिल्यानगर जिल्ह्यात आदिवासी, दलित वस्ती भागातही जल जीवन योजनेअंतर्गत राबविण्यात आलेल्या पाणी योजना पुर्ण झालेल्या नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या स्वप्नपुर्ती योजनेसाठी केंद्र सरकारच्या जल जीवन योजनेच्या संचालक पदाच्या अधिकाऱ्यांच्या केंद्रीय समितीमार्फत चौकशी करून सबंधित भ्रष्ट शासकीय अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करून फौजदारी गुन्हा दाखल करावा, संबंधित ठेकेदारास काळया यादीत टाकावे अशी आग्रही … Read more

Ahilyanagar Breaking : आता गोतस्करी अन गोवंश हत्या करणाऱ्यांविरोधात ‘मकोका’ लागणार ! आ. जगतापांच्या मागणीस मुख्यमंत्री फडणवीसांकडून मंजुरी

गोरक्षक व गोसेवकांसाठी अत्यंत आनंदाची अन महत्वाची बातमी हाती आली आहे. आता यापुढे गो-तस्करी आणि गोवंश हत्या करणाऱ्यांविरोधात मकोका अंतर्गत कारवाई होणार आहे. गोतस्करी आणि गोवंश हत्या करणाऱ्यां विरोधात कठोर कारवाई झाली पाहिजे यासाठी आ. संग्राम जगताप हे आग्रही होते. त्यांनीच ही मागणी केली होती व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मकोका अंतर्गत कारवाईला विधानसभेत मंजुरी … Read more

लेखक येणार भेटीला, सांस्कृतिक कार्यक्रम जोडीला ‘सकाळ’ महोत्सवात खरेदीचा आनंद होणार द्विगुणित

अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यातील पुस्तकप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे ! ‘सकाळ’ आयोजित पुस्तक महोत्सव शुक्रवारपासून सावेडीतील जॉगिंग ट्रॅकवर सुरू होत आहे. चार दिवस चालणाऱ्या या महोत्सवात विविध प्रकाशनांची पुस्तके, नामवंत लेखकांशी संवाद आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रंगत पाहायला मिळणार आहे. उद्घाटन आणि पहिला दिवस शुक्रवारी (ता. २१) सकाळी ११ वाजता पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते महोत्सवाचे … Read more

Ahilyanagr News : नगर-पाथर्डी रोडवर भीषण अपघात ! एक ठार, एक जखमी

अहिल्यानगरमधून अपघाताचे एक वृत्त हाती आले आहे. वेगात आलेल्या किया कंपनीच्या कारने दुचाकीला समोरून जोरात धडक दिली. यात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला तर पाठीमागे बसलेली वृद्ध महिला गंभीर जखमी झाली. हा अपघात नगर-पाथर्डी रोडवर झाला. आधी माहिती अशी : नगर तालुक्यातील कौडगाव शिवारात १९ मार्चला सकाळी ८.३० च्या सुमारस हा अपघात झाला आहे. या अपघातात … Read more

Ahilyanagar News : इसको जिंदा नही छोडेंगे..! नगरच्या रस्त्यावर पुन्हा खुनी थरार, कोयता, चॉपरने हल्ला..

अहिल्यानगर शहरात मागील काही दिवंगत खून, खुनी हल्ले अशा अनेक घटना घडत आहेत. आता पुन्हा एकदा शहरात खुनी हल्ला झालाय. क्लेरा ब्रूस बॉईज होस्टेलच्या समोरील रोडवर काल १९ मार्च रोजी मध्यरात्री ही घटना घडली. या घटनेत चौघांनी एकास लाथाबुक्क्‌यांनी व लाकडी काठीने मारहाण करुन लोखंडी कोयता, चॉपरने वार करुन त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. याबाबत … Read more

कोपरगावच्या विजेचा प्रश्न मार्गी! २.६८ कोटींचा निधी मंजूर; शेतकऱ्यांना दिलासा

कोपरगाव मतदारसंघातील शेतकरी आणि नागरिकांच्या मागणीनुसार वीजपुरवठा सुधारण्यासाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. स्थानिक विकास निधीअंतर्गत २.६८ कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून, त्याअंतर्गत नवीन वीज रोहित्र बसविणे, वीज वाहिन्यांचे स्थलांतर, तसेच नवीन पोल टाकण्याची कामे केली जाणार आहेत. या निर्णयामुळे अनेक गावांतील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे, अशी माहिती आमदार आशुतोष काळे यांनी दिली. … Read more

Ahilyanagar Crime : पूर्ण कुटुंबास जेसीबी खाली चिरडून टाकण्याची धमकी !

अहिल्यानगर तालुक्यातील कौडगाव येथे शेतजमिनीवरील ताबेमारीच्या वादातून एका कुटुंबाला जीवघेणी धमकी देण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. संशयित आरोपींनी दोघांना जातीवाचक शिवीगाळ करत संपूर्ण कुटुंबाला जेसीबीखाली घालून संपवण्याची धमकी दिली. याप्रकरणी नगर तालुका पोलिस ठाण्यात तीन आरोपींविरुद्ध अॅट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी विक्रम भाऊसाहेब पाटोळे (वय ३८, रा. कौडगाव, ता. नगर) यांनी … Read more

एक चूक जीवावर बेतली ! कॉलेज तरुणाचा रंगपंचमीच्या दिवशी दुर्दैवी अंत

रंगपंचमी साजरी करण्यासाठी मित्रांसह शेततळ्यात गेलेल्या दंतवैद्यक महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना सुभाषनगर येथील डॉ. सचिन मजती यांच्या फार्महाऊसवर घडली. क्षितीजकुमार कुंडलिक क्षीरसागर (२२, रा. अहिल्यानगर) असे मृत तरुणाचे नाव आहे. क्षितीजकुमार भारती दंत महाविद्यालयात अखेरच्या वर्षात शिक्षण घेत होता. बुधवारी रंगपंचमीनिमित्त तो आणि त्याचे पाच ते सहा मित्र मिरजेतील दंतरोगतज्ज्ञ … Read more