शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ! सीसीआयने खरेदी बंद केल्यानंतर कापसाचा भाव वाढला, प्रति क्विंटल मिळतोय एवढा भाव?

अहिल्यानगर- जिल्ह्यात कापूस खरेदी-विक्रीचा हंगाम सुरू होऊन काही महिने झाले असून सुरुवातीला कापसाला ६९०० ते ७१०० रुपये दर मिळत होते. सीसीआय (कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया) ने खरेदी सुरु केल्यानंतर दर ७४०० रुपयांपर्यंत पोहोचले. त्यानंतर बहुतांश शेतकऱ्यांनी कापूस विकला. काहींनी मात्र दर वाढतील या अपेक्षेने साठवून ठेवला. सीसीआयची खरेदी थांबली १२ मार्चनंतर सीसीआयने कापूस खरेदी थांबवली. … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यातील धरणांत किती आहे पाणी शिल्लक ? जाणून घ्या भंडारदरा आणि मुळा धरणांचे उन्हाळी आवर्तने कधी सुरू होणार

अहिल्यानगर जिल्ह्यातील नऊ धरणांमध्ये एकूण २५ हजार ४८२ दलघनफूट (टीएमसी) इतका पाणीसाठा उपलब्ध आहे. ही आकडेवारी जिल्ह्यातील पाणीस्त्रोतांच्या सद्यस्थितीची सकारात्मक झलक देणारी आहे. एकूण धरणक्षमता आणि पाण्याचा वापर विचारात घेतला असता सुमारे ५० टक्के साठा शिल्लक आहे. या पाणीसाठ्याचा वापर जून महिन्याच्या अखेरीपर्यंत नियोजनबद्ध पद्धतीने करावा लागणार आहे. मुळा धरणाचे उन्हाळी आवर्तन मुळा धरणाचे उन्हाळी … Read more

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह इतर आश्वासने महायुती सरकारने पूर्ण करावेत, अन्यथा सरकार विरोधात राज्यव्यापी आंदोलन उभं राहणार!

अहिल्यानगर- राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीने आपल्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी, मोफत वीज आणि शेतमालाला भरघोस दर अशा आश्वासनांचा पाऊस पाडला होता. या घोषणांनी अनेक मतदार भारावले गेले. परंतु सत्तेत आल्यानंतर हे आश्वासन विसरले गेले. उलट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांना ३१ मार्चपर्यंत पीककर्ज फेडण्याचे आदेश दिले असून, त्यानंतर वसुली सुरू केली जाईल असा इशाराही देण्यात … Read more

पावसाच्या धास्तीने हार्वेस्टरला मागणी वाढली! शेतकऱ्यांची धावपळ तर दर पोहोचले दोन हजारांवर

अहिल्यानगर- केडगाव परिसरासह नगर तालुक्यात सध्या रब्बी हंगामातील गहू पिकाची काढणी सुरू असून, मागील चार दिवसांपासून सुरु असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पिके सोंगणीस आली असून, पावसामुळे नुकसान होऊ नये म्हणून शेतकरी तातडीने गहू घरात आणण्याच्या हालचालीत व्यस्त आहेत. हार्वेस्टरसाठी शेतकऱ्यांची गर्दी पारंपरिक पद्धतीने काढणीस तुलनेत हार्वेस्टर मशीनद्वारे गहू काढणे अधिक … Read more

संगमनेर तालुक्यात ६७७ हेक्टर क्षेत्रावर अवकाळी पावसाचा तडाखा कांदा, गहू, बाजरी, टोमॅटो, डाळिंब व द्राक्ष बागांचे मोठे नुकसान

संगमनेर- तालुक्यात बुधवारी जोरदार वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसाने आणि गारपिटीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. या नैसर्गिक संकटाचा तडाखा तालुक्यातील अनेक गावांना बसला असून, कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालानुसार १३ गावांमधील ६७७.५२ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. या पावसामुळे कांदा, गहू, बाजरी, टोमॅटो, वाटाणा यांसारख्या पिकांसह डाळिंब आणि द्राक्षांच्या बागांचेही नुकसान झाले आहे. तालुका कृषी अधिकारी … Read more

अहिल्यानगर जिल्ह्याला अवकाळी पावसाने झोडपले, शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान तर आज ऑरेंज अलर्ट

अहिल्यानगर, ३ एप्रिल: सलग चार दिवस ढगाळ वातावरण राहिल्यानंतर मंगळवारी (१ एप्रिल) संध्याकाळी शहर आणि परिसरात वादळी वाऱ्यासह हलका पाऊस झाला. सततच्या उष्णतेने त्रस्त असलेल्या नागरिकांना या पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला. यामुळे शहराच्या तापमानात २८ दिवसांनंतर ४ अंशांनी घट होऊन ते ३५ अंशांवर आले. बुधवारी (२ एप्रिल) दुपारी अकोले तालुक्यात अर्धा तास जोरदार अवकाळी पाऊस … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यात मृत शेतकऱ्यांच्या वारसांसाठी ‘जिवंत सातबारा’ अभियान सुरू, १ एप्रिलपासून अभियानाला सुरूवात!

श्रीरामपूर: शेतजमिनीच्या मालकी हक्कासंदर्भातील अडचणी दूर करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ‘जिवंत सातबारा’ अभियान हाती घेतले असून, श्रीरामपूर तालुक्यात हे अभियान १ एप्रिल २०२५ ते १० मे २०२५ दरम्यान राबवले जाणार आहे. शेतजमिनींचे मालकी हक्क वारसदारांकडे अधिकृतपणे हस्तांतरित करण्यासाठी सातबारा उताऱ्यावर त्यांची नोंद असणे आवश्यक असते. मात्र, अनेक मृत खातेदारांच्या वारसांची नोंद सातबाऱ्यावर वेळेत होत नसल्याने त्यांच्या … Read more

शेतकरी झाले बांधावरूनच ऑनलाइन, घरबसल्या केले ४ कोटी ३५ लाख उताऱ्यांचे डिजिटल डाउनलोड

खरीप हंगाम तोंडावर आला असून, शेतकऱ्यांची पीककर्जासाठीची धावपळ सुरू झाली आहे. पीककर्ज प्रक्रियेसाठी सातबारा, आठ-अ आणि फेरफार उताऱ्यांची मोठ्या प्रमाणावर मागणी वाढली आहे. मात्र, या कागदपत्रांसाठी तलाठी कार्यालयात फेऱ्या मारण्याची गरज आता राहिलेली नाही. राज्यातील शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करत डिजिटल स्वाक्षरीयुक्त उताऱ्यांचे ऑनलाइन डाउनलोड मोठ्या प्रमाणावर सुरू केले आहे. भूमिअभिलेख विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावरून मागील … Read more

संगमनेरच्या 50 लिटर दूध उत्पादन उपक्रमाने महाराष्ट्राच्या दूध उद्योगाला दिला नवा दिशा!

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी शेतीला जोड व्यवसाय म्हणून दूध संघाची स्थापना केली. 1980 नंतर आपण पुढाकार घेऊन तालुक्यात दूध व्यवसाय वाढविला. आज तालुक्यात 9 लाख लिटर दूध उत्पादन होत आगामी काळामध्ये कमी गाईंमध्ये जास्त दूध उत्पादन होण्याकरता राजहंस दूध संघाच्या वतीने 50 लिटर दूध उत्पादन करणाऱ्या क्षमतेच्या गाई निर्माण करण्याचा घेतलेला उपक्रम हा … Read more

बळीराजा पुन्हा अडचणीत! अवकाळी पावसाने कांदा, गहू पिकांना धोका

पाचेगाव: नेवासा तालुक्यात सध्या गहू आणि कांदा पिकांची काढणी जोरात सुरू आहे. रब्बी हंगामातला जवळपास पन्नास टक्के शेतमाल अजूनही शेतात उभा आहे. पण आता अवकाळी पावसाचं वादळ घोंगावत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. आपला शेतमाल वाचवण्यासाठी बळीराजा रात्रंदिवस झटताना दिसतोय. वातावरणात उकाडा वाढलाय, हवामान सतत बदलतंय आणि हवामान खात्याने पुढचा आठवडाभर अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवला … Read more

Ahilyanagar News : दुर्गम भागात पिकवली काळी मिरी ! बाराशे रुपये प्रतिकिलो भाव, अहिल्यानगरच्या शेतकऱ्याचा प्रयोग

अहिल्यानगरमधील शेतकरी हे नेहमीच विविध प्रयोग करत असतात. आता अकोले सारख्या दुर्गम भागात काळीमिरी पिकवण्याचाच प्रयोग येथील शेतकऱ्याने केलाय. ज्येष्ठ पर्यावरण तज्ञ तथा वनौषधी अभ्यासक सेवानिवृत्त प्राध्यापक रामलाल हासे यांनी अथक प्रयत्नातून आपल्या महाळदेवी येथील शेतावर काळी मिरीचे पीक यशस्वीरित्या घेतले आहे. पर्यावरणाचा गाढा अभ्यास असणारे रामलाल हासे यांना 2020 मध्ये कृषी विभागाचे तालुका कृषी … Read more

अवकाळी पावसाची शक्यता! गहू-कांदा पिकांवर संकट, शेतकरी चिंतेत

नेवासा- तालुक्यात सध्या सतत बदलणारे हवामान आणि अवकाळी पावसाची शक्यता यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, पुढील आठवडाभर अवकाळी पावसाचे संकट कायम राहण्याची शक्यता आहे. यामुळे गहू आणि कांदा या प्रमुख पिकांचे मोठे नुकसान होण्याची भीती बळिराजाला सतावत आहे. मागील आठवड्यात जिल्ह्यातील काही भागांत आणि कोकणपट्टीत अवकाळीने हजेरी लावली होती. आता … Read more

अहिल्यानगर जिल्ह्याला ‘येलो अलर्ट’, आजपासून तीन दिवस वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपिटीची शक्यता!

अहिल्यानगर : जिल्ह्यात ३१ मार्च ते २ एप्रिल या तीन दिवसांत विजांच्या कडकडाटांसह वादळी वारा, हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. विशेष म्हणजे १ एप्रिलला वादळी वाऱ्यासोबत गारपीटही होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्यासाठी ‘येलो अलर्ट’ जाहीर करण्यात आला असून, लोकांनी सावध राहावे, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने केले … Read more

शेतकऱ्यांची काळजी वाढवणारी बातमी; रब्बी पिकांना धोका अन्न धान्य साठवून ठेवा: गारपीट, भुकंप होण्याची शक्यता ?

अहिल्यानगर : यावर्षी मान्सून वेळेवर सुरु होईल, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पर्जन्यमान साधारण राहील. यावर्षी सहा भाग पाऊस नद्या व पर्वत असलेल्या भागात होईल तर उर्वरित चार भाग पाऊस भुभागावर पडेल, त्यामुळे अन्न धान्य साठवून ठेवा, असे भाकित कर्जत येथील श्री गोदड महाराज यांच्या संवत्सरीत वर्तविण्यात आले आहे. कर्जतचे ग्रामदैवत श्री संत सद्गुरू गोदड महाराज … Read more

सीना बॅकवॉटरचं पाणी जातंय कुठे? फेब्रुवारीतच पाणीटंचाई गंभीर, शेतकऱ्यांची कांदा-ऊस पिके संकटात!

अहिल्यानगर- अहिल्यानगर आणि बीड जिल्ह्याच्या सीमेवरून वाहणाऱ्या सीना नदीवर निमगाव गांगर्डा इथे एक धरण आहे, ज्याची क्षमता अडीच टीएमसी आहे. या धरणासाठी कर्जत, श्रीगोंदा, नगर आणि आष्टी तालुक्यातल्या अनेक गावांमधली शेतकऱ्यांची जमीन गेली. पण जमीन गमावूनही हातवळण देवीचे, हातोळण, औरंगपूर, पारोडी, तरडगव्हाणसारख्या गावातल्या शेतकऱ्यांना उन्हाळ्यात पाणी मिळत नाही. धरण भरलं तरी त्याचा फायदा या लोकांना … Read more

काष्टीचा जनावरांचा बाजार दुसरीकडे भरवला जाणार, सभापती अतुल लोखंडे यांचा थेट इशारा

श्रीगोंदा- तालुक्यातील काष्टी उपबाजाराची ओळख राज्यभरात आहे. या बाजारानं आपलं वेगळं स्थान निर्माण केलंय. पण काही स्थानिक पदाधिकारी आपल्या कृतींमुळे या बाजाराच्या नावाला काळिमा फासतायत, असा गंभीर आरोप श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अतुल लोखंडे यांनी केलाय. जर हा त्रास असाच सुरू राहिला, तर काष्टीचा जनावरांचा बाजार दुसरीकडे हलवण्याशिवाय पर्याय उरणार नाही, असा थेट … Read more

शेतकऱ्यांना कर्जासाठी आता ‘त्या’ परवानगीची गरज नाही, भोगवटादार वर्ग-२ च्या जमिनीवर मिळणार तारण कर्ज

राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. भोगवटादार वर्ग-२ च्या जमिनीवर आता तारण कर्ज मिळणं सोपं होणार आहे. याआधी या जमिनींमुळे शेतकऱ्यांना बँकेकडून कर्ज घेताना अनेक अडचणी यायच्या, पण आता त्या दूर झाल्या आहेत. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही माहिती दिली. यामुळे जिल्हा बँकांबरोबरच राष्ट्रीयकृत बँकांकडूनही शेतकऱ्यांना कर्ज सहज मिळेल. शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी जिल्हा बँका … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यातील बहुचर्चित म्हशींच्या बाजाराला झाली सुरूवात

शिर्डी :सर्वसामान्य शेतकऱ्यांना आधार देण्याचं काम कृषी उत्पन्न बाजार समिती करत आहे. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून शेतकऱ्यांच्या भल्यासाठी सुरू झालेल्या प्रत्येक योजनेची अंमलबजावणी बाजार समितीला राज्यात वेगळं स्थान मिळवून देत आहे. नव्याने सुरू झालेल्या म्हैस बाजारामुळे परिसरातील म्हैस पालक आणि व्यापाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे, असं माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के यांनी सांगितलं. … Read more