Indian Railway ने प्रवास करणाऱ्यांसाठी सगळ्यात मोठी बातमी ! रेल्वे मंत्रालयाचा धक्कादायक निर्णय

महाराष्ट्रासह देशभरातील रेल्वे स्थानकांवर वाढती गर्दी आणि चेंगराचेंगरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने एक महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे. आता वेटिंग लिस्ट तिकीट असलेल्या प्रवाशांना रेल्वे स्थानक आणि प्लॅटफॉर्मवर प्रवेश नाकारला जाणार आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी संसदेत ही घोषणा केली असून, यामुळे केवळ कन्फर्म तिकीट असलेल्या प्रवाशांनाच स्थानकात प्रवेश मिळणार आहे. या निर्णयामुळे प्रवाशांच्या … Read more

बेकायदेशीररित्या झाडे तोडत असाल तर प्रत्येक झाडामागे भरावा लागणार १ लाख रूपयांचा दंड! सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

नवी दिल्लीतून एक मोठी बातमी समोर आलीये. झाडांची कत्तल हा माणसाच्या हत्येपेक्षाही भयंकर गुन्हा आहे, असं सर्वोच्च न्यायालयाने ठणकावून सांगितलंय. बेकायदा कापलेल्या प्रत्येक झाडासाठी एक लाख रुपये दंड भरावा लागेल, असा कडक आदेशही न्यायालयाने दिलाय. पर्यावरणाच्या बाबतीत आता कोणतीही नरमाई चालणार नाही, हे स्पष्ट झालंय. हा निर्णय ताज ट्रेपेजियम झोनमध्ये ४५४ झाडं कापल्याच्या प्रकरणात आला. … Read more

Matheran News : माथेरानमध्ये बेमुदत बंद ; पर्यटकांचे हाल,हॉटेल्स आणि बाजारपेठा पूर्णतः बंद

माथेरानमध्ये पर्यटक एजंट्सच्या फसवणुकीविरोधात कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी मंगळवारपासून बेमुदत बंद सुरू झाला आहे. पहिल्याच दिवशी हॉटेल्स, बाजारपेठा आणि वाहतूक बंद राहिल्याने पर्यटकांचे हाल झाले. याचा थेट फटका स्थानिक व्यावसायिकांना बसत असला तरी ते या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा देत आहेत. हॉटेल्स आणि बाजारपेठा पूर्णतः बंद पर्यटन बचाव समितीच्या आवाहनानंतर हॉटेल व्यावसायिकांनी बंदमध्ये सहभाग घेतला … Read more

केंद्र सरकारचा महत्त्वाचा निर्णय ! मतदार ओळखपत्र आणि आधार जोडणी प्रक्रियेस वेग

केंद्र सरकारने मतदार ओळखपत्र आणि आधार कार्ड जोडणीसाठी तयारी सुरू केली आहे. या प्रक्रियेसाठी तज्ज्ञांचे मत घेतले जाणार असून, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आणि विद्यमान कायद्यांच्या चौकटीत राहून पुढील कार्यवाही होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने याबाबत अधिकृत माहिती दिली आहे. युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी आणि गृहमंत्रालयाशी चर्चा मंगळवारी निवडणूक आयोगाने केंद्रीय गृहमंत्रालय तसेच युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ … Read more

आफ्रिका खंडाचे दुप्पट वेगाने विभाजन

१५ मार्च २०२५ केपटाऊन : आफ्रिका खंडातील इथिओपियाच्या वाळवंटात २००५ मध्ये सुमारे ५६ किलोमीटर लांबीची दरी निर्माण झाली होती. तेव्हापासून ती दरवर्षी अर्धा इंच वेगाने रुंदावत आहे. अशा विभाजनाला लाखो वर्षे लागतील, असा संशोधकांचा कयास होता; परंतु कॅलिफोर्निया विद्यापीठाचे प्राध्यापक केन मॅकडोनाल्ड यांनी अपेक्षेपेक्षा जास्त वेगाने १० ते ५० लाख वर्षांत खंडाचे विभाजन होण्याची शक्यता … Read more

जास्त स्क्रीन टाइम धोक्याचा

१५ मार्च २०२५ : नवी दिल्ली : स्क्रीनचा (टीव्ही, स्मार्टफोन) जास्त वापर मुलांच्या भाषा शिकण्याच्या क्षमतेवर नकारात्मक परिणाम करू शकतो. लहान मुलांना पुस्तकांची गोडी लावणे आणि घरातील मोठ्यांसोबत माहितीपूर्ण स्क्रीन शेअर केल्यास मुलांच्या भाषा कौशल्यात सुधार होऊ शकतो असे एका आंतरराष्ट्रीय अभ्यासातून समोर आले आहे. २० लॅटिन अमेरिकन देशांतील संशोधकांच्या नेतृत्वाखालील या अभ्यासात १२ ते … Read more

Donald Trump यांनी Elon Musk ची Tesla कार खरेदी केली ! पण कधीच चालवता येणार नाही ? कारण धक्कादायक!

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतीच आकर्षक लाल रंगाची टेस्ला मॉडेल एस खरेदी केली असून, या कारचे त्यांनी भरभरून कौतुक केले आहे. ही खरेदी टेस्लाच्या सीईओ इलॉन मस्क यांच्या उपस्थितीत व्हाईट हाऊसच्या दक्षिण लॉनवर करण्यात आली. ट्रम्प यांनी मस्क यांना ‘देशभक्त’ असे संबोधित केले आणि टेस्ला कंपनीच्या कामगिरीचे कौतुक केले. या कार्यक्रमादरम्यान, टेस्लाची पाच … Read more

दुबई मधून स्वस्तात सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर एकदा हि बातमी वाचाच…

कन्नड अभिनेत्री रान्या रावला दुबईहून भारतात मोठ्या प्रमाणात सोने आणताना अटक करण्यात आली आहे. ती एमिरेट्सच्या विमानाने केंपेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरली असताना डिरेक्टोरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्स (DRI) अधिकाऱ्यांनी तिच्या हालचालींवर संशय घेतला. तपासानंतर 12.56 कोटी रुपये किमतीचे 14.8 किलो सोन्याचे बार जप्त करण्यात आले. अधिकाऱ्यांच्या मते, सोन्याच्या तस्करीसाठी तिने कपड्यांमध्ये सोने लपवले होते. गेल्या काही … Read more

भारतातील YouTubers वर मोठे संकट? YouTube ने २९ लाख व्हिडिओ डिलीट केले!

यूट्यूबवरील व्हिडिओ कन्टेन्ट व्यवस्थापनासंदर्भात भारताने पुन्हा एकदा आघाडी घेतली आहे. Googleच्या मालकीच्या YouTube प्लॅटफॉर्मने त्यांच्या सर्वोत्तम समुदाय मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करणाऱ्या २९ लाखांहून अधिक व्हिडिओ हटवले आहेत. ऑक्टोबर ते डिसेंबर २०२४ या तिमाहीत हा आकडा समोर आला असून, भारतात सर्वाधिक व्हिडिओ काढून टाकण्यात आले आहेत. जगभरातील आकडेवारीनुसार, भारत हा YouTube व्हिडिओ डिलीट करण्याच्या बाबतीत प्रथम … Read more

Bank holiday today : आज ८ मार्च रोजी बँका बंद असतील का? जाणून घ्या आरबीआयच्या सुट्ट्यांचे वेळापत्रक

Bank holiday today : जर तुम्ही आज ८ मार्च २०२५ रोजी बँकेशी संबंधित कोणतेही काम करण्याचा विचार करत असाल, तर त्याआधी बँक सुट्ट्यांचे वेळापत्रक तपासणे महत्त्वाचे आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) च्या नियमानुसार, प्रत्येक महिन्याचा दुसरा आणि चौथा शनिवार हा बँकांसाठी सुट्टीचा दिवस असतो. यानुसार, ८ मार्च हा महिन्याचा दुसरा शनिवार असल्याने, या दिवशी … Read more

प्रत्येक जिल्ह्यात एक आदर्श ग्रामपंचायत विकसित होणार

७ मार्च २०२५ नवी दिल्ली : देशात आदर्श महिलास्नेही ग्रामपंचायत उपक्रमाची सुरुवात करण्यात आली असून त्याआधारे प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक आदर्श ग्रामपंचायतीं निर्माण केल्या जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात महिला आणि कन्यास्नेही असलेली किमान एक आदर्श ग्रामपंचायत निर्माण करण्यासाठी ५ मार्च रोजी नवी दिल्ली येथे पंचायती राज मंत्रालयाने आदर्श महिलास्नेही ग्रामपंचायतींवरील राष्ट्रीय परिषदेचे आयोजन … Read more

पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार ? कच्च्या तेलाच्या किमती २०२१ नंतर प्रथमच ३ वर्षांच्या नीचांकी स्तरावर ; भारत सरकारने कमाविले लाखो कोटी रुपये !

७ मार्च २०२५ नवी दिल्ली : जगभरात व्यापार युद्ध भडकण्याची भीती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे व्यक्त होत असतानाच कच्च्या तेलाच्या किमती ३ वर्षांच्या नीचांकी स्तरावर आल्या आहेत.कच्च्या तेलाच्या किमती ७० डॉलर प्रति बॅरलच्या खाली आल्या आहेत तसेच गेल्या चार दिवसांत यात तब्बल ६ टक्क्यांनी घसरण झाली आहे.त्यामुळे भारतात महागाईने होरपळत असलेल्या जनतेला दिलासा मिळेल … Read more

अवघ्या ३६ मिनिटांत केदारनाथ यात्रा !

नवी दिल्ली: केंद्र सरकारने उत्तराखंडमधील सोनप्रयाग ते केदारनाथ (१२.९ किमी) आणि – गोविंदघाट ते हेमकुंड साहिबजी (१२.४ किमी) अशा दोन रोपवे प्रकल्पांना मंजुरी दिली. या दोन प्रकल्पांवर एकूण ६८११ कोटी – रुपये खर्च येईल. या प्रकल्पांमुळे दोन्ही तीर्थस्थळांपर्यंत पोहोचण्याचा कालावधी कमी होऊन पर्यटनाला चालना मिळेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार … Read more

BSNL चा धमाका ! फक्त ₹4 दररोज खर्च करा आणि मिळवा 2GB डेटा – 365 दिवसांसाठी!

BSNL Recharge Plans : भारतातील टेलिकॉम बाजारात जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन-आयडियासारख्या खाजगी कंपन्यांनी वर्चस्व मिळवले असले तरी, BSNL अजूनही आपल्या स्वस्त आणि आकर्षक प्लॅनसह मोठ्या संख्येने ग्राहकांना आकर्षित करत आहे. जर तुम्ही कमी खर्चात दीर्घकालीन वैधता असलेला आणि चांगले फायदे देणारा रिचार्ज प्लॅन शोधत असाल, तर BSNL चे काही प्लॅन तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. BSNL लवकरच आपल्या … Read more

Major Rivers in India : भारतातील ‘नद्यांचे राज्य’! या एका राज्यात वाहतात तब्बल ३० पेक्षा जास्त नद्या – तुम्हाला माहीत आहे का?

भारत हा नद्यांचा देश म्हणून ओळखला जातो. येथे लहान-मोठ्या मिळून ४०० हून अधिक नद्या आहेत, ज्या देशाच्या आर्थिक, सामाजिक आणि धार्मिक जीवनाचा अविभाज्य भाग आहेत. या नद्यांमुळे शेतीला मदत मिळते, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो आणि संपूर्ण पारिस्थितिकी यंत्रणेला आधार मिळतो. काही नद्या थेट हिमालयातील बर्फ वितळून तयार होतात, तर काही पावसावर अवलंबून असतात. उत्तर प्रदेश … Read more

स्वस्तात विमान प्रवासाची सुवर्णसंधी ! फक्त १३८५ मध्ये विमान प्रवास

Air India Express Offer : हवाई प्रवास स्वस्त करण्यासाठी एअर इंडिया एक्सप्रेसने अनोखी ऑफर जाहीर केली आहे. टाटा समूहाच्या या विमानसेवेने कमी किमतीत तिकिटे उपलब्ध करून देत प्रवाशांसाठी एक उत्तम संधी आणली आहे. या ऑफर अंतर्गत, फक्त ₹१३८५ मध्ये तुम्ही विमान प्रवासाचा आनंद घेऊ शकता. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी प्रवाशांनी २ मार्च २०२५ पर्यंत बुकिंग … Read more

IIT Baba : न्यूज चॅनेलच्या चर्चेत ‘आयआयटी बाबा’ वर हल्ला? पोलिसांनी घेतली तक्रार, पण गुन्हा दाखल नाही!

IIT Baba : प्रयागराज महाकुंभातून प्रसिद्ध झालेले आयआयटी बाबा उर्फ अभय सिंग पुन्हा चर्चेत आले आहेत. नोएडामध्ये एका खाजगी न्यूज चॅनेलच्या चर्चा कार्यक्रमादरम्यान त्यांच्यावर हल्ला झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. सोशल मीडियावर हा वादाच्या गोंधळाचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत असून, या घटनेने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. शुक्रवारी नोएडातील एका खाजगी न्यूज चॅनेलवर वादविवाद सत्र सुरू … Read more

Rule Change 2025 : आजपासून हे नियम बदलले ! LPG गॅस, विमा प्रीमियम आणि बँक तुमच्या खिशावर थेट परिणाम

Rule Change 2025 : मार्चपासून LPG सिलिंडरच्या किमतींमध्ये वाढ झाली आहे. व्यावसायिक वापरासाठी असलेल्या १९ किलोच्या गॅस सिलिंडरच्या किमतीत ६ रुपयांची वाढ झाली आहे. गेल्या महिन्यात अर्थसंकल्पादरम्यान १९ किलोच्या सिलिंडरच्या किमतीत ७ रुपयांनी घट करण्यात आली होती, मात्र आता ती वाढवण्यात आली आहे. घरगुती सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. हे दर तेल विपणन कंपन्यांकडून … Read more