अहिल्यानगर जिल्ह्यात अवकाळी पावसाचा इशारा! पुढील ४ दिवस येलो अलर्ट, तापमानात ६ अंशानी घट

Ahilyanagar News: अहिल्यानगर- जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशी अवकाळी पावसाने हजेरी लावली असून, भारतीय हवामान विभागाने १४ ते १७ मे २०२५ या कालावधीत जिल्ह्यासाठी येलो अलर्ट जारी केला आहे. ढगाळ वातावरणामुळे शहराचे तापमान ३६ अंश सेल्सिअसवर घसरले आहे, जे एप्रिल महिन्यात ४३ अंशांवर पोहोचले होते. गेल्या आठ दिवसांपासून ढगाळ वातावरण आणि पावसाच्या सरींमुळे तापमानात लक्षणीय घट … Read more

नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना तडाखा, ३,८६७ हेक्टरवरील पिकांचे नुकसान तर १५ हजार शेतकरी बाधित

Nashik News : नाशिक- जिल्ह्यात ५ ते ११ मे २०२५ या कालावधीत वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाने शेतीला मोठा फटका बसला आहे. कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालानुसार, ३,८६७ हेक्टरवरील पिके मातीमोल झाली असून, १५,३३३ शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. या पावसाने जिल्ह्यातील ६५९ गावांमधील कांदा, आंबा, डाळिंब, द्राक्षे, गहू, मका, टोमॅटो आणि भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान केले. … Read more

सुपा परिसरात अवकाळी पावसाने वातावरणात गारवा मात्र, कांदा आणि आंबा उत्पादकांचे नुकसान

Ahilyanagar News: पारनेर- सुपा परिसरात सोमवारी (१२ मे २०२५) सकाळी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली, ज्यामुळे तीव्र उष्णतेने हैराण झालेल्या नागरिकांना सुखद गारव्याचा अनुभव मिळाला. हवामान खात्याच्या अंदाजानुसार झालेल्या या पावसाने वातावरण थंड आणि सुखद बनले, आणि गेल्या पंधरा दिवसांपासून चाळीशीपार गेलेला तापमानाचा पारा खाली आला. मे महिन्याच्या सुट्ट्यांमुळे लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वजण या गारव्यात … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यात १४ मे पर्यंत वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा; शेतकऱ्यांनी काळजी घेण्याचे हवामान विभागाचे आवाहन

Ahilyanagar News: अहिल्यानगर- जिल्ह्याच्या काही भागांत १४ मे २०२५ पर्यंत विजांच्या कडकडाटांसह वादळी वारा आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. यासाठी जिल्ह्यासाठी पिवळा इशारा (यलो अलर्ट) जारी करण्यात आला आहे. या कालावधीत नागरिकांना विजेपासून सुरक्षित राहण्यासाठी आणि शेतीमाल तसेच जनावरांचे संरक्षण करण्यासाठी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. … Read more

मान्सून वेळेपूर्वी होणार दाखल; हवामान विभाग म्हणते, ‘या’ दिवसापासून सुरु होणार महाराष्ट्रात पावसाळा

देशातील वातावरणात सध्या चांगलाच बदल झाला आहे. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत उष्णतेची लाट असल्याचे जाणवत आहे, तर काही जिल्ह्यांत अवकाळी पाऊस पडत असल्याचे दिसत आहे. या संमिश्र वातावरणात नेमकं मान्सूनच आगमन कधी होणार? असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे. एप्रिल हीटच्या स्थितीमुळं यावर्षी पावसाचं गणित बदलणार असल्याची माहिती, हवामान तज्ज्ञांनी दिली. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, 13 ते … Read more

नेरळ-माथेरानच्या थंड हवेला पर्यटकांचा भरभरून प्रतिसाद! ४ महिन्यांत तब्बल १ लाख पर्यटकांनी दिली भेट

माथेरान हे मुंबई आणि पुणे परिसरातील नागरिकांसाठी सर्वात जवळचे आणि लोकप्रिय थंड हवेचे पर्यटन स्थळ आहे. येथील १०० वर्षांहून जुन्या नेरळ-माथेरान टॉय ट्रेनचा थरार आणि निसर्गाचे सान्निध्य अनुभवण्यासाठी दरवर्षी लाखो पर्यटक माथेरानला भेट देतात. यंदा नव्या वर्षात, जानेवारी ते एप्रिल २०२५ या चार महिन्यांत तब्बल १ लाख ५ हजार पर्यटकांनी माथेरानला भेट दिली. या पर्यटकांनी … Read more

Ahilyanagar News : अहिल्यानगरमधील ‘या’ भागात वादळी वाऱ्यासह गारपीट, झाडे पडली, पोल वाकले…

Ahilyanagar News : नेवासा तालुक्यातील सोनई परिसरात दुपारी साडेचार वाजता जोरदार वादळ वाऱ्यासह प्रचंड गाराचा पाऊस पडला. यामुळे सोनई मध्ये शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. आ.विठ्ठलराव लंघे पाटील यांनी तहसीलदार संजय बिरादार यांना तात्काळ सोनई परिसरातील नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच महावितरण विभागाला वीज वितरण सुरळीत करण्याबाबत आदेश दिले. अचानक सोनई परिसरात दुपारी … Read more

थांबा.! उन्हाळ्यात समुद्रकिनारी फिरायला जाताय? तर मग ही बातमी अगोदर वाचा, आम्ही सांगतोय ते फाॅलो करा

महाराष्ट्रात तापमानाचा पारा गेल्या काही दिवसांपासून 40 अंशाच्या पुढे गेलाय. उन्हाने नको-नको करुन ठेवलंय. त्यातच आता परीक्षा संपून अनेकांना सुट्याही लागल्यात. त्यामुळे उन्हाळ्याच्या सुटीचा प्लॅन अनेकदा समुद्रकिनारी जाऊन एन्जाॅय केला जातोय. फिरण्यासाठी काही जण उंच डोंगर, थंड हवेची ठिकाणं निवडतात तर काहींना निळाशार समुद्र किनारा भुरळ घालतो. यंदा जर तुम्ही समुद्रकिनारी फिरायला जाण्याचं प्लॅनिंग करत … Read more

मुंबई, ठाणे, रायगड, पालघरमध्ये पावसाची शक्यता; हवामान खात्याचा इशारा

Mumbai Rain News : मुंबई आणि आसपासच्या परिसरात रविवारपासून पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. सध्या राज्यात उष्ण आणि दमट हवामानामुळे नागरिक हैराण झाले असताना, या पावसामुळे काहीसा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड या भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे, तर काही ठिकाणी गडगडाटासह जोरदार पाऊस पडण्याची … Read more

Ahilyanagar News: अहिल्यानगर जिल्ह्यात मेच्या ‘या’ तारखांना जोरदार पावसाचा अंदाज… अहिल्यानगर प्रशासनाने दिला इशारा

Ahilyanagar News:- अहिल्यानगर जिल्ह्याच्या काही भागात ३ ते ६ मे २०२५ दरम्यान वादळी वारा, विजेचा कडकडाट आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचा आणि आपली सुरक्षा निश्चित करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. या ठिकाणी हवामान खात्याच्या माध्यमातून यलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. ज्याचा … Read more

अहिल्यानगर जिल्ह्याच्या ‘ह्या’ भागात ३ ते ६ मे दरम्यान पावसाचा हवामान खात्याचा अंदाज ! नागरिकांनी घराबाहेर पडण्याआधी…

rain

अहिल्यानगर, दि. २- जिल्‍ह्याच्या काही भागात ३ ते ६ मे २०२५ या कालावधीत वीजांच्‍या कडकडाटांसह वादळी वारा व हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्‍याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. जिल्‍ह्यासाठी पिवळा इशारा (यलो अलर्ट) जारी करण्‍यात आलेला आहे. मेघगर्जनेच्‍या वेळी, वीजा चमकत असताना किंवा वादळीवारे वाहत असतांना झाडाखाली किंवा झाडांजवळ उभे राहू नये. वीजेपासून बचावासाठी … Read more

भारतात वाढत्या AC च्या वापरामुळे लवकरच ओढवणार विजेचे संकट, बर्कले कॅलिफोर्निया विद्यापीठाने संशोधनातून दिला इशारा

भारतात पुढील दहा वर्षांत घरगुती वातानुकूलित यंत्रणेची (एसी) ऊर्जा कार्यक्षमता दुप्पट केल्यास तीव्र वीज टंचाई टाळता येईल आणि ग्राहकांची तब्बल २.२ लाख कोटी रुपयांची बचत होऊ शकेल, असा दावा बर्कले कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या ताज्या संशोधन अहवालात करण्यात आला आहे. मात्र, योग्य पावले न उचलल्यास वीज गुल (ब्लॅकआउट) होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो, असा इशाराही या अहवालात … Read more

Summer heatwave : वाढत्या उष्णतेमुळे नागरिक हैराण ! पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर

Summer heatwave : चालू हंगामाच्या उन्हाळ्यामध्ये उष्णतेने अक्षरशः हा कहर केला असून गेली अनेक दिवसापासून दररोज उष्णतेमध्ये मोठी वाढ होत असल्यामुळे नागरिकांची लाहीलाही होत असताना दिसून येत आहे. प्रत्येक वर्षी एप्रिल महिना सूरू झाला की तीव्रता झपाट्याने वाढत आहे हा अनुभव गेली अनेक पिढ्‌यापासून पुढे सूरू राहिला आहे. गेली अनेक दिवसापासून नागरिक बाहेर पडणे टाळत … Read more

अहिल्यानगरला उन्हापासून मिळणार दिलासा? ४ ते ६ मे दरम्यान ढगाळ वातावरणाची शक्यता

Ahilyanagar News: अहिल्यानगर- गेल्या काही आठवड्यांपासून उन्हाचा कडाका कायम आहे. या आठवड्यात तापमानात किंचित घट झाली असली, तरी दुपारी १२ ते ४ वाजेदरम्यान उष्णतेची तीव्रता नागरिकांना जाणवत आहे. बुधवारी शहराचे कमाल तापमान ४२ अंश सेल्सियस नोंदवले गेले. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, ४ ते ६ मे २०२५ दरम्यान काहीसे ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे, ज्यामुळे उष्णतेची तीव्रता … Read more

Tisgaon News : बस शेडअभावी रखरखत्या उन्हात प्रवाशांची दमछाक

Tisgaon News : कल्याण विशाखापट्टण, हैदराबाद शिर्डी, छत्रपती संभाजीनगर, पुणे या राष्ट्रीय महामार्गासह पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्याला जोडणाऱ्या तिसगाव येथे प्रवाशांसाठी प्रवासी शेड नसल्याने रखरखत्या उन्हात बसची वाट पाहत रस्त्यावर थांबण्याची वेळ प्रवाशांवर आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, पाथर्डी नगर रस्त्यावरील तिसगाव हे बाजारपेठेचे मोठे केंद्र असून परिसरातील २५ गावांचा दैनंदिन संबंध येथे … Read more

अहिल्यानगरमध्ये उष्णतेचा कहर, तापमान पुन्हा ४३ अंशांवर, पुढील ५ दिवस उकाडा कायम

Ahilyanagar News: अहिल्यानगर- शहर आणि परिसरात एप्रिल २०२५ मध्ये उष्णतेचा कडाका वाढला असून, शुक्रवारी (२५ एप्रिल) तापमानाने पुन्हा ४३ अंश सेल्सिअसचा उच्चांक गाठला. गेल्या चार दिवसांत दुसऱ्यांदा तापमान ४३ अंशांवर पोहोचले आहे, जे एप्रिल २०२२ नंतर प्रथमच नोंदवले गेले. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढील पाच दिवस तापमान ४१ ते ४२ अंशांदरम्यान राहण्याची शक्यता आहे. शुक्रवारी सायंकाळी … Read more

अहिल्यानगरमध्ये उष्णतेचा कहर, रस्ते ओस, बाजारात शुकशुकाट! तापमानाने गेल्या ३ वर्षातील तोडले सर्व रेकाँर्ड

Ahilyanagar News: अहिल्यानगर- सध्या उष्णतेचा प्रकोप वाढत चालला आहे. सोमवारी शहराचे तापमान ४३ अंश सेल्सिअसवर पोहोचले, जे गेल्या तीन वर्षांतील एप्रिल महिन्यातील सर्वोच्च तापमान आहे. यापूर्वी एप्रिल २०२२ मध्ये तापमान ४३.६ अंशांवर गेले होते. हवामान विभागाने येत्या काही दिवसांत तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली असून, मंगळवारी (२२ एप्रिल) देखील तापमान ४३ अंशांवर कायम राहण्याचा … Read more

तापमान वाढलंय, तुमच्या कारचीही काळजी घ्या! उन्हाळ्यात 3 चुका टाळा, अन्यथा गाडी जळून खाक होईल

Summer Mistakes | उन्हाळ्याचा कडक हंगाम सुरू झाला असून, तापमान सतत वाढत आहे. अशा वेळी केवळ स्वतःची नव्हे तर तुमच्या वाहनाची देखील योग्य काळजी घेणे गरजेचे ठरते. दरवर्षी उन्हाळ्यात गाड्यांना आग लागल्याच्या घटना समोर येतात आणि त्यामागे काही सामान्य पण गंभीर चुका कारणीभूत असतात. या चुका टाळल्या नाहीत तर तुमच्या गाडीचं मोठं नुकसान होऊ शकतं, … Read more