व्यक्ती असो किंवा एखाद्या ठिकाण असो त्याच्या विशिष्ट अशा वैशिष्ट्यांमुळे त्याला ओळखले जाते. अशा ठिकाणी असलेल्या वेगवेगळ्या वैशिष्ट्यांमुळे अशा गावांना किंवा ठिकाणांना किंवा व्यक्तींना नवीन ओळख निर्माण होत असते. यावर्षीवरूनच संबंधित ठिकाणांना किंवा गावाला ओळखले जाते.
अशा पद्धतीने जर आपण पाहिले तर महाराष्ट्रात एक गाव असे आहे की त्या गावाला बुलेटचे गाव म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यात असलेले बेडग नावाचे हे गाव असून बुलेट बाईक या गावाचे एक खास वैशिष्ट्य आहे व त्यामुळेच या गावाला बुलेटच गाव अशी ओळख निर्माण झाली आहे. नेमकी त्यामागचे काय कारणे आहेत? याबाबत माहिती घेऊ.

सांगली जिल्ह्यातील बेडग गावाला म्हणतात बुलेटचे गाव
याबाबत सविस्तर वृत्त असे की, सांगली जिल्ह्यात असलेल्या बेडग या गावाला एक नवीन ओळख असून ती म्हणजे या गावाला बुलेटचं गाव म्हणून सगळीकडे ओळखले जाते. जर या गावाची लोकसंख्या पाहिली तर ती 27 हजारच्या घरात असून काही वर्षांपूर्वी या गावांमध्ये एक साधी मोटरसायकल नव्हती परंतु आता या गावांमध्ये म्हैसाळ योजनेचे पाणी आलं आणि गावात समृद्धी नांदायला लागली. त्यामुळे संपूर्ण गावाचा कायापालट झाला आहे.
शेती हा बेडग या गावातील प्रमुख व्यवसाय असून या ठिकाणी ऊस आणि द्राक्ष शेती प्रामुख्याने केली जाते. तसेच महत्त्वाचे म्हणजे कुक्कुटपालन हा या ठिकाणच्या शेतकऱ्यांचा प्रमुख जोडधंदा असून या व्यवसायांच्या माध्यमातून गावातील शेती बहरली आहे आणि गावकऱ्यांची आर्थिक सुबत्ता देखील वाढली आहे.
या ठिकाणी गेल्या काही वर्षांत अगोदर पहिली बुलेट खरेदी केली व एका घरातील बुलेट पाहून त्यापेक्षा आधुनिक मॉडेलची बुलेट आपल्याकडे असावी असा प्रयत्न गावकऱ्यांकडून झाला व हीच आवड आतापर्यंत अशीच राहिली असून अगोदरच्या गावकऱ्यांची बुलेटची असलेली आवड आताच्या पिढीने देखील जपली असून आताच्या तरुणांकडे आता मार्केटमध्ये आलेल्या आधुनिक बुलेट आहेत व हीच परंपरा आताची पिढी देखील जपून ठेवल्यामुळे या गावाला बुलेटचं गाव म्हणून ओळख निर्माण झाली आहे.
यामध्ये एकापेक्षा एक सरस बुलेट असावी अशी हौस असल्यामुळे तगडी फायरिंग असलेली बुलेट असावी त्यामुळे या गावात बुलेट या बाईकचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. तरुणच नाही तर या गावातील तरुणींमध्ये देखील बुलेटची क्रेझ मोठ्या प्रमाणावर आहे. या ठिकाणचे तरुण-तरुणी दुसऱ्या गावाला शिकायला जातात तरी देखील बुलेटचा वापर करतात. विशेष म्हणजे या गावांमध्ये 20 ते 30 जणांचं एकत्र कुटुंब आहे. त्या कुटुंबामध्ये एक नाही तर तब्बल पाच बुलेट आहेत असे देखील गावकऱ्यांच्या माध्यमातून सांगण्यात आले.
काय आहे बुलेटचा इतिहास?
रॉयल एनफिल्डचा इतिहास पाहिला तर या कंपनीचे सगळ्यात प्रसिद्ध असलेले मॉडेल म्हणजे बुलेट 350 होय. हे साधारणपणे 87 वर्षांपूर्वी म्हणजेच 1931 मध्ये बाजारपेठेत लॉन्च करण्यात आले होते व तेव्हा या बाईकचे नाव एनफिल्ड बुलेट असे होते. लवकरच ही बाईक बाजारपेठेमध्ये ग्राहकांच्या विश्वासाला पात्र ठरले.
त्यावेळेस भारतीय सेना सीमावर्ती भागामध्ये पेट्रोलिंग अर्थात गस्त घालण्याकरिता करत असे व 1931 यावर्षी ब्रिटनमध्ये लॉन्च करण्यात आलेली बुलेट त्यानंतर वीस वर्षांनी 1951 मध्ये भारतात लॉन्च करण्यात आली. विशेष म्हणजे इतर बाईकच्या तुलनेत एनफिल्ड बुलेट अजून देखील बाजारपेठेमध्ये विश्वासनीयतेच्या दृष्टीने खूप महत्त्वपूर्ण आहे.