HDFC Bank Success Story: मुंबईच्या चाळीत राहणाऱ्या व्यक्तीने सुरू केली एचडीएफसी बँक! वाचा बँकेचा रोपट्यापासून वटवृक्षापर्यंतचा प्रवास

Ajay Patil
Published:
hdfc bank success journey

HDFC Bank Success Story:- कुठल्याही मोठ्या गोष्टीची सुरुवात ही अगदी छोट्या पासून होते व कालांतराने वेगळ्या प्रक्रिया आणि टप्प्याटप्प्यातून जाऊन पुढे या गोष्टीचे रूपांतर एका मोठ्या वटवृक्षांमध्ये होत असते. भारतातील आपण अनेक उद्योगसमूह पाहिले किंवा अनेक स्टार्टअपचे उदाहरणे आपल्याला देता येतील की त्यांची सुरुवात अगदी छोट्याशा स्वरूपात झाली परंतु आज जगाच्या पाठीवर या उद्योगसमूहाचे किंवा स्टार्टअपचे नाव आहे.

तसेच भारतातील बँकांचा विचार केला तर भारतामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, आयसीआयसीआय बँक तसेच एचडीएफसी बँक इत्यादी महत्त्वाच्या बँक आहेत. यातील जर आपण एचडीएफसी या बँकिंग क्षेत्रातील सर्वात मोठ्या आणि जगातील चौथी सर्वात मोठी बँक म्हटले जाणाऱ्या एचडीएफसी बँकेचा प्रवास पाहिला तर खूप प्रेरणादायी असा आहे. याबद्दलच माहिती या लेखात आपण घेणार आहोत.

 कशी झाली एचडीएफसी बँकेची सुरुवात?

याबाबत सविस्तर वृत्त असे की, गुजरात राज्यातील सुरत या ठिकाणी बँकिंगची पार्श्वभूमी असलेल्या एका कुटुंबामध्ये हसमुख ठाकोरदास पारेख यांचा 10 मार्च 1911 रोजी जन्म झाला. त्यांना त्यांच्या वडिलांकडून गुजराती व्यावसायिक कौशल्याचा वारसा मिळालेला होता व त्यांचा आईचा खूप जास्त प्रभाव त्यांच्यावर होता.

पारेख हे त्यांच्या कुटुंबासोबत मुंबईच्या एका चाळीमध्ये लहानाचे मोठे होत असताना त्यांनी अनेक पार्ट टाइम नोकऱ्या केल्या. अशा पद्धतीने पार्टटाइम काम करत असतानाच त्यांनी मुंबई विद्यापीठाच्या माध्यमातून इकॉनॉमिक्सची पदवी प्राप्त केली व पुढील हायर एज्युकेशनकरिता ते लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये गेले आणि बीएससी बँकिंग अँड फायनान्स विषयात त्यांनी पदवी मिळवली.

त्यानंतर ते साधारणपणे 1936 या वर्षात भारतामध्ये परत आले व त्यानंतर हरकिसनदास लुकमिदास या आघाडीच्या स्टॉक ब्रोकिंग फर्ममध्ये नोकरी करायला सुरुवात केली. या नोकरी सोबतच त्यांनी फायनान्स क्षेत्रामध्ये आपले पहिले पाऊल ठेवले. यासोबतच त्यांनी काही काळ मुंबईतील सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये इकॉनॉमिक चे लेक्चरर म्हणून देखील तीन वर्ष काम केले.

परंतु ब्रोकिंग फर्ममध्ये त्यांनी जे वीस वर्षे काम केले त्या कालावधीमध्ये त्यांना खूप अनुभव मिळाले व कारकिर्दीला त्यांचा आकार मिळाला. यामध्ये त्यांना व्यवसायातील सर्वात महत्वाच्या गोष्टी शिकायला मिळाल्या. नंतर त्यांनी 1956 यावर्षी आयसीआयसीआय मध्ये डेप्युटी जनरल मॅनेजर म्हणून देखील काम पाहिले.

या ठिकाणचे काम ही त्यांना मिळालेली सगळ्यात मोठी संधी होती. एवढेच नाही तर 1972 मध्ये ते या बँकेचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक देखील झाले. 1976 मध्ये ते आयसीआयसीआय बँकेतून रिटायर झाले होते  परंतु 1978 पर्यंत त्यांनी आयसीआयसीआय बोर्डाचे अध्यक्ष म्हणून देखील काम केले. ही झाली त्यांची अगोदरची पार्श्वभूमी.

 अशाप्रकारे केली एचडीएफसीची स्थापना

यामागे पारेख यांचा एक विचार खूप महत्वपूर्ण ठरतो. त्यांच्या मते मध्यमवर्गीय भारतीयांना वृद्ध होण्याच्या अगोदर घर बांधण्याची संधी मिळावी ही त्यांची इच्छा होती व त्या इच्छेतूनच त्यांनी 1977 मध्ये म्हणजेच जेव्हा त्यांचे वय 65 वर्षे होते तेव्हा हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड अर्थात एचडीएफसी ही भारतातील पहिली रिटेल हाऊसिंग फायनान्स कंपनी स्थापन केली.

आयसीआयसीआय चे अध्यक्ष म्हणून रिटायर्ड झाल्यानंतर त्यांनी लगेचच एचडीएफसीची स्थापना केली. विशेष म्हणजे यात त्यांनी दहा हजार रुपयांचे स्वतःचे वैयक्तिक योगदान दिले व भारत सरकारच्या कोणत्याही आर्थिक मदतीशिवाय पारख यांनी भारताची पहिली रिटेल हाऊसिंग फायनान्स कंपनी स्थापन केली.

पारेख यांच्यासारख्या अनुभवी नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाच्या आधारावर या कंपनीने अवघ्या काही दिवसात उत्तुंग यश प्राप्त केले. ज्या व्यक्तींकडे चांगली प्रतिभा होती त्यांना दिशा आणि भरपूर शिकण्याच्या संधी देऊन पारेख यांनी त्यांचं एक प्रकारे व्यावसायिक संगोपन केले.

कारण त्यांचा त्यांच्या टीमवर व त्यांच्या टीमच्या कामावर खूप जास्त विश्वास होता. याबाबतीत पारेख यांचा विश्वास होता की कर्मचाऱ्यांच्या टीमवर्कवर एखाद्या संस्थेचे यश अवलंबून असतं. 1978 मध्ये पहिले गृह कर्ज वितरित केलेल्या एचडीएफसी ने 1984 पर्यंत 100 कोटी रुपयांपेक्षा जास्त वार्षिक कर्ज मंजूर केली होती.

पारेख यांच्या अथक प्रयत्नांमुळे संपूर्ण आशियामध्ये लवकरच होम फायनान्स क्षेत्रामध्ये या संस्थेने एक आदर्श निर्माण केला व आदर्श संस्था म्हणून पुढे आली. एवढेच नाही तर पारेख यांनी 1986 मध्ये गुजरात हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड अर्थात गृहची स्थापना केली.

गावांमध्ये व लहान शहरांमध्ये ग्रामीण गृहनिर्माण वित्त पुरवठा करणारी संस्थात्मक संरचना ठरली. एचडीएफसी ही हसमुख ठाकोरदास पारेख यांच्या बुद्धीतून आलेली कल्पना होती व या कंपनीने भारतातील हाउसिंग फायनान्सच्या उत्क्रांतीच्या काळामध्ये अनेक समस्यांवर मात करत खूप मोठा पल्ला गाठला आहे.

त्यामुळे भारतातील हाउसिंग फायनान्स आणि बँकिंग क्षेत्रातील त्यांच्या अमूल्य योगदानाकरिता पारेख यांना 1992 मध्ये भारत सरकारने पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केलेले आहे. एवढेच नाही तर लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स ने देखील त्यांना मानद फेलोशिप देखील प्रदान केलेली आहे.

18 नोव्हेंबर 1994 रोजी पारेख यांचे निधन झाले. आपल्याला माहित आहेस की एचडीएफसी बँक आणि तिची मूळ कंपनी हाऊसिंग अँड डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन यांचं मेगा विलीनीकरण पार पडले. ही बँकिंग क्षेत्रातील एक सर्वात मोठी बातमी होती. या बँकेचं आणि कंपनीचे विलीनीकरण झाल्यामुळे एक मोठी आर्थिक ताकद तयार झाली आहे. आजच्या घडीला 4.14 लाख कोटी रुपयांचे बाजार भांडवल एचडीएफसी बँकेचे असून ही जगातील चौथी सर्वात मोठी बँक बनली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe