Twitter Monetisation: आता ट्विटरचा वापर करा आणि पैसे कमवा! जाणून घ्या स्टेप बाय स्टेप संपूर्ण माहिती

Ajay Patil
Published:
twitter monetization

 Twitter Monetisation:-  सध्या अनेक प्रकारच्या ऑनलाइन कामांचा ट्रेंड असून विविध क्षेत्रांमध्ये अगदी घरी बसून विविध प्रकारची कामे ऑनलाईन पद्धतीने करून चांगल्या प्रकारचा पैसा कमावता येतो. अनेक प्रकारच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील विविध प्रकारे पैसा कमावता येतो.

  आपल्याला माहिती आहे की बरेचजण youtube च्या माध्यमातून देखील वेगवेगळ्या विषयांवर व्हिडिओज बनवून youtube च्या अटी व शर्तीचे पालन करून चांगला पैसा कमावतात. अगदी याच पद्धतीने ट्विटरने देखील आपल्या वापरकर्त्यांना पैसे कमावण्याची एक मोठी सुवर्णसंधी उपलब्ध करून दिलेली आहे. म्हणजेच ट्विटरने आपले वापरकर्त्यांकरिता मोनेटायझेशन फीचर्स आणले असून या माध्यमातून तुम्हाला आता चांगली कमाई करता येणार आहे.

 ट्विटरचे मोनेटायझेशन फीचर्स

याबद्दल सविस्तर वृत्त असे की, ट्विटर ने देखील आता आपल्या वापरकर्त्यांकरिता मोनेटायझेशन फीचर्स आणले असून या माध्यमातून आता तुम्ही तुमच्या अकाउंट वर फोटो किंवा व्हिडिओ पोस्ट करून देखील चांगला पैसा कमवू शकतात. परंतु यासाठीची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचे ट्विटरवर पाचशे फॉलोवर्स असणे गरजेचे आहे. त्यानंतरच तुम्ही तुमचे अकाउंट मोनेटायझेशन साठी अर्ज करू शकता व अशा पद्धतीने पैसा कमवू शकतात.

 याकरता कुणाला करता येईल अर्ज?

याकरिता जर तुम्हाला देखील अर्ज करायचा असेल तर त्यासाठी सगळ्यात महत्त्वाची अट म्हणजे ज्यांनी ट्विटर ब्लू टिक सबस्क्रीप्शन घेतले आहे त्यांना या करता अर्ज करता येणार आहे. यामध्ये साधारणपणे डेस्कटॉप करिता जर तुम्हाला ट्विटर ब्लू सबस्क्रिप्शन घ्यायचे असेल तर त्याचे शुल्क 900 रुपये असून मोबाईल ट्विटर ब्लू सबस्क्रीप्शन करिता शुल्क हे साडेसहाशे रुपये आहे.

असे असेल व तुमचे अकाउंट वर पाचशे फॉलोवर्स असतील तर तुम्ही याकरिता अर्ज करू शकतात. तसे यातील दुसरी महत्त्वाची अट म्हणजे गेल्या तीन महिन्याच्या कालावधीमध्ये तुमच्या ट्विटरवर कमीत कमी 15 मिलियन इम्प्रेशन मिळणे गरजेचे आहे. या महत्त्वाच्या अटी पूर्ण केल्यानंतरच तुम्ही ट्विटरच्या कंटेंट प्रोग्राम मध्ये सहभाग घेऊ शकतात. या माध्यमातून तुम्ही चार हजार रुपये देखील कमवू शकतात.

 याकरिता कसा कराल अर्ज?

1- याकरिता सर्वप्रथम तुम्हाला ट्विटर मॉनिटायझेशन प्रोग्राम साठी अर्ज करायचा असेल तर ट्विटर अकाउंट च्या सेटिंग जर जाणे गरजेचे आहे.

2- यानंतर अकाउंट ऑप्शनच्या खालच्या बाजूला मॉनिटायझेशन हा पर्याय येतो त्यावर क्लिक करावे.

3- त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सबस्क्रिप्शन आणि ॲड रेवेन्यू शेअरिंग हे पर्याय मिळतात.

4- त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी दोन्ही पर्यायांवर क्लिक करणे गरजेचे आहे.

5- त्यानंतर तुम्हाला तुमच्या बँक खात्याची माहिती देणे गरजेचे आहे.

6- या सगळ्या प्रक्रियेनंतर तुम्ही जे काही पोस्ट किंवा व्हिडिओ शेअर केलेला असेल त्यासोबत तुम्हाला जाहिरात दिसत व या माध्यमातून तुम्हाला पैसे मिळतील.

अशा पद्धतीने तुम्ही ट्विटरच्या माध्यमातून देखील चांगला पैसा कमवू शकतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe