Corona : कोरोनाला हलक्यात घेऊ नका! राज्यात ४३७ नव्या कोरोना रूग्णांची नोंद तर दोघांचा मृत्यू…

Published on -

Corona : काल राज्यात ४३७ नवे करोना रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर करोनाचे सर्वाधिक रूग्ण हे पुण्यात आहेत. पुण्यात ५७१ करोना रूग्ण सध्याच्या घडीला आहेत. यामुळे अजूनही कोरोनाला हलक्यात घेऊ नका, पुन्हा एकदा काळजी घेतली नाही, तर मागचे दिवस पुढे यायला वेळ लागणार नाही.

मुंबई आणि ठाण्यात रूग्णांची संख्या जास्त आहे. राज्यात शनिवारी कोरोनामुळे दोन रूग्णांचा मृत्यू झाला. राज्याचा मृत्यूदर १.८२ टक्के इतका आहे. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे. यामुळे येणाऱ्या काळात खबरदारी घ्यावी लागणार आहे.

काही दिवसांपासून कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होते आहे. कोरोनाचे रूग्ण कमी झाल्याने सगळ्यांनीच सुटकेचा निश्वास सोडला होता. मात्र काल राज्यात ४३७ नवे कोरोना बाधित आढळले आहेत. यामुळे पुन्हा एकदा चिंता वाढली आहे. यामुळे प्रशासन सतर्क झाले आहे.

तसेच दोन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचीही माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे. राज्यात सक्रिय रूग्णांच्या संख्येतही वाढ झाली आहे. महाराष्ट्रात सध्या १९५६ सक्रिय रूग्ण आहेत. ग्रामीण भागात देखील रुग्ण आढळून येत आहेत.

आता या पार्श्वभूमीवर नागरिकांनी मास्क वापरण्याचे आवाहन सरकारतर्फे करण्यात आले आहे. देशात ज्या ज्या राज्यांमध्ये इन्फ्लुएंझाचे रूग्ण आणि करोनाचे रूग्ण वाढत आहेत त्या राज्यांना मार्गदर्शक सूचना केंद्रातर्फे जारी करण्यात आल्या आहेत. यामुळे काळजी घ्यावी लागणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe