सुटे खाद्यतेल खाताय ? रंगाची होतेय भेसळ, ‘या’ आजारांनी घातलेय थैमान

सध्याचं जग हे अगदी फास्ट झाले आहे. परंतु या फास्ट झालेल्या जगात अनके जीवघेणे आजारही बळावले आहेत. परंतु हे सगळे कशामुळे झाले हे देखील पाहावे लागेल.

Ahmednagarlive24 office
Published:
khadyatel

सध्याचं जग हे अगदी फास्ट झाले आहे. परंतु या फास्ट झालेल्या जगात अनके जीवघेणे आजारही बळावले आहेत. परंतु हे सगळे कशामुळे झाले हे देखील पाहावे लागेल.

भेसळयुक्त खाणे हेच याला कारणीभूत आहे असे म्हटले जाते. आपल्या आहारात जास्त करून तेलाचे प्रमाण असते. परंतु या तेलातच प्रचंड भेसळ होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे असे तेल खाण्यात वापरल्यास आरोग्यावर त्याचा दुष्परिणाम होऊ शकतो.

भेसळयुक्त तेलामुळे रक्तवाहिन्यांचे आजार जडतात. त्यामुळे हृदयविकाराचा धोकाही निर्माण होऊ शकतो. त्यासाठी नागरिकांनी सुटे खाद्यतेल वापरण्याचे टाळावे, असा सल्ला आहारतज्ज्ञ देतात.

आपण आपल्या आहारात सोयाबीन, पाम, करडई, सूर्यफूल, शेंगदाणा आदी प्रकारचे तेल वापरत असतो. हे खाद्य तेल म्हणजे आहारातील मुख्य घटक असे म्हटले तरी ते वावगे ठरू नये. या तेलाच्या उत्पादन करणाऱ्या अनेक कंपन्या आता बाजारात आहेत.

आपलेच तेल शुद्ध आहे, असा प्रत्येक कंपनीचा दावा असतो. तेलाच्या घाण्याच्या माध्यमामधून काढलेले तेल सर्वाधिक सकस व आरोग्यदायी असल्याचा दावा केला जातो.

मात्र या सुट्या तेलात अनेकदा भेसळीचे प्रमाण असते. यामुळे अनेक आरोग्याच्या समस्यांना आकर्षित करत असते. त्यामुळे दूरगामी परिणाम करणाऱ्या आरोग्याच्या अडचणीना सामोरे जावे लागते.

कशी केली जाते भेसळ?
खाद्यतेलामध्ये केलेली भेसळ प्रथमदर्शनी ओळखू येत नाही. त्याच्या चवीमध्ये फरक येतो. मात्र तो तितकासा लक्षात येत नाही.

खाद्यतेलात भेसळ करण्यासाठी रेन्सिड तेल, मार्जरीन, सुपर सोयाबीन तेल, कापूस बियाणे, पाम तेल खनिज तेल यांचा वापर केला जातो. इतरही काही द्रव्य पदार्थ मिसळून तेलाच्या रंगावर काम केले जाते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe