Numerology 2024: तुमचा मूलांक 2 आहे का? 2024 हे वर्ष तुमच्यासाठी कसे जाईल? अशापद्धतीने जाणून घ्या तुमचा मूलांक

Ajay Patil
Published:
numerology horoscope 2024

Numerology 2024:- 2024 या नवीन वर्षाचा जानेवारी महिना सुरू असून या महिन्यांमध्ये ज्योतिष शास्त्रानुसार अनेक ग्रह त्यांचे राशी परिवर्तन करणार असल्यामुळे त्याचा सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम हा विविध राशींवर होणार आहे. तसेच या राशी परिवर्तनामुळे अनेक शुभ आणि अशुभ योग देखील तयार होणार असल्यामुळे योगांचा परिणाम देखील राशींवर पाहायला मिळेल.

जसा ज्योतिष शास्त्रानुसार पाहिले तर विविध ग्रहांच्या स्थितीचा परिणाम हा त्या त्या राशींच्या व्यक्तींवर होत असतो अगदी त्याच पद्धतीने मुलांक म्हणजेच अंक फळांचा देखील परिणाम व्यक्तींच्या जीवनावर होत असतो. या अनुषंगाने आपण या लेखांमध्ये ज्या व्यक्तींचा मुलांक हा दोन आहे त्या व्यक्तींसाठी 2024 वर्ष कसे असेल? त्याबद्दलची माहिती पाहू.

 मुलांक दोन असलेल्या साठी 2024 वर्ष कसे असेल?

मुलांक दोन या संख्येचा स्वामी पाहिला तर तो चंद्र असून दोन मुलांक असलेल्या व्यक्तींना या 2024 मध्ये नवीन कल्पना उपलब्ध होतील व व्यापारी नवीन उत्पादने या वर्षात लॉन्च करतील. दोन मुलांक असलेले व्यक्ती जीवनामध्ये पुढे जाण्यास आवश्यक नियोजन करतील व यावर्षी योजनांचे मोठे फायदे या व्यक्तींना होतील.

तसेच या व्यक्तींनी वाहन चालवताना निष्काळजीपणा करू नये. काही कामाच्या संबंधित कागदपत्र असतील तर त्यावर स्वाक्षरी करताना ते वाचून घेऊन स्वाक्षरी करावी. नाहीतर समस्या उद्भवण्याची शक्यता आहे. मुलांक दोन असलेले जे व्यक्ती एविएशन, केमिकल आणि पाणी व सिमेंट क्षेत्रामध्ये काम करत असतील त्या लोकांना नवीन ग्राहक मिळतील

त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर फायदा मिळेल. तसेच प्रतिष्ठा व मानसन्मान देखील मिळणार आहे व विदेशातून काही लाभ होण्याची शक्यता आहे. मुलांक दोन असलेल्या महिला वर्गाला यावर्षी ताणतणावातून आराम मिळेल. मुलांना जर या वर्षात काही व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्या करू शकतात. मुलांकडून काही आनंदाची बातमी मिळेल. विदेशात जायची इच्छा असेल तर ती देखील पूर्ण होऊ शकते.

 तुमचा मुलांक कोणता आहे ते कसे जाणून घ्याल?

तुम्हाला जर तुमचा मुलांक माहीत करून घ्यायचा असेल तर त्याकरिता तुमची जन्मतारीख सिंगल डिजिटमध्ये म्हणजे एकेरी आकड्यात काढून घ्यावी. उदाहरणार्थ तुमची जन्मतारीख जर 21 असेल तर तुमचा मुलांक हा तीन होतो. परंतु जर 29 जन्मतारीख असेल तर तुमचा मुलांक 2+9=11 असा येतो. परंतु ही संख्या जर दोन अंकामध्ये आली तर पुन्हा त्या दोन अंकांची बेरीज करावी म्हणजेच 1+1=2 म्हणजेच 29 जन्मतारीख असलेल्या व्यक्तींचा मुलांक हा दोन असतो. अशा पद्धतीने तुम्ही मुलांक काढू शकतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe