Numerology: ‘या’ तारखांना जन्मलेल्या व्यक्ती कमी वयामध्ये होतात खूप श्रीमंत! वाचा यामध्ये तुमची जन्मतारीख आहे का?

Published on -

Numerology:- मानवाच्या जीवनामध्ये ग्रहताऱ्यांचा प्रभाव पडत असतो किंवा त्यांचे एकंदरीत चाल किंवा इतर गोष्टींचा खूप मोठ्या प्रमाणावर प्रभाव हा व्यक्तींच्या जीवनावर होत असतो. या सगळ्या गोष्टींचे विश्लेषण ज्योतिष शास्त्रामध्ये केले जाते. परंतु ज्योतिषशास्त्राप्रमाणे अंकशास्त्र हे देखील एक शाखा असून यामध्ये काही आकड्यांच्या आधारे व्यक्तीच्या जीवनावर पडणारे विशेष प्रभाव अभ्यासले जातात.

जीवनामध्ये संख्यांना देखील महत्त्वाचे स्थान असते. त्या अनुषंगाने व्यक्तीच्या आयुष्यामध्ये काही अंक हे अशुभ असतात तर काही भाग्यवान असतात. अंकशास्त्र मध्ये प्रामुख्याने एक ते नऊ पर्यंतच्या अंकांचा विचार केलेला असतो. हे अंकशास्त्रानुसार असलेले अंक व ज्योतिष शास्त्रानुसार असलेले ग्रह हे एक किंवा दुसऱ्या ग्रहाचे प्रतिनिधित्व देखील करत असतात.

ज्योतिष शास्त्रामध्ये प्रामुख्याने व्यक्तीची जन्मतारीख आणि जन्मवेळ यावरून त्या व्यक्तीचा स्वभाव आणि भविष्य इत्यादी सांगण्यात येते. अंकशास्त्राचा आधार घेतला तर व्यक्तीचा स्वभाव त्याच्या जन्मतारखेवरून आपल्याला कळतो. याच अनुषंगाने आपण या लेखांमध्ये कोणत्या मुलांकाच्या लोकांचा स्वभाव रागिट असतो इत्यादी बद्दल महत्वाची माहिती घेणार आहोत.

 अंकशास्त्रानुसार या मुलांकाच्या व्यक्ती असता स्वभावाने रागीट कमी वयात होतात श्रीमंत

ज्या व्यक्तींचा जन्म 9, 18 आणि 27 तारखेला झालेला असतो त्या व्यक्तींचा मुलांक हा 9 असतो. या नऊ मुलांकाचा स्वामी मंगळ असून मंगळाला युद्धाची देवता म्हणून संबोधले जाते. त्यामुळे त्याचा परिणाम या क्रमांकाच्या लोकांवर मोठ्या प्रमाणावर दिसतो.

9 क्रमांक असलेल्या लोकांवर मंगळाचा प्रभाव मोठ्या प्रमाणावर असतो व त्यामुळे हे लोक खूप धाडसी असतात व स्वभावाने अतिशय निर्भय देखील असतात. मंगळाचा प्रभाव त्यांच्यावर असल्यामुळे हे गुण त्यांच्यामध्ये दिसून येतात. या लोकांमध्ये अति आत्मविश्वास ठासून भरलेला असतो

त्यामुळे ते कोणतीही जोखीम पत्करायला तयार असतात व त्याला अजिबात घाबरत देखील नाहीत. हे शिस्तप्रिय लोक असतात तसेच आयुष्य जगत असताना त्यांच्या आयुष्यामध्ये कितीही मोठी समस्या आली तरी ते न घाबरता त्याला तोंड देत असतात व वेगाने आयुष्यात पुढे जातात.

नऊ अंक असलेल्या व्यक्ती संरक्षण क्षेत्रामध्ये तसेच राजकारणात, व्यवस्थापन क्षेत्रामध्ये व ज्या ठिकाणी नेतृत्व करण्याची वेळ येते तेव्हा स्वतःचा प्रभाव मोठ्या प्रमाणावर पाडण्यात यशस्वी होतात. सुरुवातीला त्यांना त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये खूप समस्यांचा सामना करावा लागतो

व त्यानंतर त्यांना यश मिळत असते. या व्यक्तींचा स्वभावाचा असा असतो की ते कमीत कमी वेळेमध्ये पैसे कमावण्याची संधी शोधतात आणि त्यामध्ये यश देखील मिळवतात. या लोकांची एक चुकीची बाजू म्हणजे ते स्वभावाने अतिशय रागीट असतात व त्यांना इतका राग येऊ शकतो किती स्वतःवर नियंत्रण ठेवू शकत नाही.

(टीप ही माहिती अंकशास्त्रावर आधारित असून ती तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी माध्यम म्हणून आम्ही काम करत आहोत. याबद्दल आम्ही कुठलाही दावा करत नाहीत.)

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!