ज्योतिष शास्त्राला जितके महत्त्व आहे तितकेच अंकशास्त्राला देखील महत्त्व आहे. ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रह व तार्यांच्या अनुषंगाने संबंधित व्यक्तीचा स्वभाव किंवा त्या व्यक्तीचे भविष्य सांगण्यात येते. अगदी त्याच पद्धतीने अंकशास्त्रामध्ये व्यक्तीचा स्वभाव आणि त्याचे व्यक्तिमत्व व त्याचे करिअर व इतर दृष्टिकोनातून महत्वाचे भविष्य वर्तवता येते.
ज्योतिष शास्त्रामध्ये ज्या प्रकारे ग्रह व ताऱ्यांना महत्त्व असते अगदी त्याच पद्धतीने अंकशास्त्रामध्ये जन्म तारखेला खूप महत्त्व असते व या अंकशास्त्रामध्ये जन्मतारखेवरून जो काही व्यक्तीचा मुलांक निघतो त्यावरून संबंधित व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व आपल्याला सांगता येते.

मुलांक आपल्याला माहित आहे की,जन्मतारखेच्या बेरजेवरून काढता येतो. उदाहरणच घ्यायची झाले तर समजा तुमचा जन्म जर 21 तारखेला झाला असेल तर 2+1=3 असतो. म्हणजेच 21 तारखेला जन्म झालेल्या लोकांचा मुलांक तीन असतो.
अगदी याच पद्धतीने जर आपण कोणत्याही महिन्याच्या नऊ, 18 आणि 27 तारखेला जन्म झालेला लोकांच्या दृष्टिकोनातून बघितले तर त्यांचा मुलांक हा 9 असतो. त्यामुळे या लेखामध्ये आपण नऊ मुलांक असलेल्या लोकांचा स्वभाव किंवा त्यांची व्यक्तिमत्व कसे असते याबद्दलची माहिती बघू.
नऊ मुलांक असलेल्या व्यक्तींचा स्वभाव कसा असतो?
नऊ हा मुलांक अनेक अर्थाने खास असून ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9,18 आणि 27 तारखेला झालेला असतो त्या लोकांचा मूल्यांक नऊ असतो. या मुलांकावर साहस आणि पराक्रमाचा कारक असलेल्या मंगळ ग्रहाचे अधिराज्य असल्याने या जन्मतारखेला जन्मलेले लोक मंगळ ग्रहाने प्रभावीत असतात.
जर आपण या व्यक्तींचा स्वभाव पाहिला तर ते हसमुख कष्टाळू आणि ऊर्जावान असतात. हे लोक कायम हसमुख आणि चेष्टेखोर असतात त्यामुळे मित्रांमध्ये देखील ते खूप लोकप्रिय असतात. परंतु या जन्मतारखेला जन्मलेल्या लोकांवर मंगळ ग्रहाचा प्रभाव असल्याने त्यांना राग फार पटकन येतो.
तसेच या लोकांमध्ये प्रचंड प्रमाणात शिस्त पालन असते. हे मोठे संकट आले तरी ते संकटाला घाबरून मागे सरत नाहीत तर संकटाशी दोन हात करून समस्याचे कारण शोधून ते मिटवण्याचा प्रयत्न करतात.
करिअरच्या दृष्टिकोनातून बघितले तर नऊ मुलांक असणारे लोक आर्मी तसेच पोलीस सेवा इत्यादी क्षेत्रांमध्ये चांगले काम करतात. करियरमध्ये सुरुवातीच्या कालावधीत त्यांना कष्ट किंवा संघर्ष करावा लागतो. परंतु त्यांच्या इच्छाशक्तीच्या आणि कष्टाच्या बळावरती आयुष्यामध्ये प्रचंड यश मिळवतात.
आर्थिक स्थितीच्या दृष्टिकोनातून बघितले तर या लोकांच्या आर्थिक स्थिती खूप चांगली असते व वडीलोपार्जित संपत्तीचा त्यांना लाभ मिळू शकतो. आपल्या जवळ असलेली धनसंपत्ती तसेच पैसा कसा वापरावा हे या लोकांना चांगले कळते.
लव्ह लाईफच्या बाबतीत पाहिले तर मात्र या लोकांना यामध्ये फारसे यश मिळत नाही किंवा यांची लव्ह लाईफ चांगली नसते.यामध्ये त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. कधी नात्यांमध्ये अहंकारामुळे दुरावा देखील निर्माण होण्याची शक्यता उद्भवते व या जन्मतारखेच्या लोकांना वैवाहिक जीवनात देखील अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.