आज म्हणजे तीन ऑक्टोबर पासून संपूर्ण भारतामध्ये शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ होत असून हा उत्सव संपूर्ण भारतामध्ये जवळपास 11 ऑक्टोबर पर्यंत धुमधडाक्यात आणि मोठ्या भक्ती भावाने साजरा केला जाणार आहे. अध्यात्मिक दृष्ट्या नवरात्र उत्सवाला जितके महत्त्व आहे तितकेच महत्त्व ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून देखील या कालावधीला आहे.
सध्या जर आपण ज्योतिषशास्त्रानुसार बघितले तर नवरात्री उत्सवाच्या कालावधीमध्ये धन आणि समृद्धी देणारा शुक्र हा स्वतःच्या तूळ राशीत प्रवेश करत असल्याने तूळ राशीतील शुक्राचे गोचरामुळे मालव्य आणि केंद्र त्रिकोण राजयोग तयार होत असून या दोन्ही राजयोगांचा फायदा काही राशीसाठी खूप मोठ्या प्रमाणावर होणार असून शैक्षणिक तसेच नोकरी, व्यवसाय व अनेक बाबतीत काही राशींना फायदा होणार आहे. नेमक्या या चार राशी कोणत्या आहेत? याबद्दलची माहिती या लेखात बघु.
नवरात्रोत्सवात या चार राशींवर होईल धन वर्षाव
1- मेष– काल झालेले सूर्यग्रहण या राशीच्या लोकांसाठी शुभ नव्हते. परंतु आज मात्र शुक्राचे होणारे तूळ राशीतील गोचर या राशीच्या व्यक्तींसाठी खूप फायद्याचे ठरणार आहे.
नवरात्रोत्सव कालावधीमध्ये या राशींच्या विवाहित लोकांचे आयुष्य हे प्रेमाने भरलेले असेल व अविवाहित व्यक्तींना लग्नाचा प्रस्ताव या कालावधीत येऊ शकतो. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे जे व्यक्ती नोकरी आणि व्यवसायामध्ये आहेत त्यांच्यासाठी हा कालावधी खूप अनुकूल व फायदा देणारा कालावधी आहे.
2-वृषभ– शुक्र ग्रह वृषभ राशीचा स्वामी ग्रह असून शुक्र ग्रहाचे होणारे गोचर या राशींच्या व्यक्तींसाठी खूप फायदेशीर ठरणार आहे. तुम्हाला या कालावधीत नोकरी मिळण्याची शक्यता आहेच व तुम्हाला जे पद हवं आहे किंवा ज्या पदाची इच्छा आहे ते पद या कालावधीत तुम्हाला मिळू शकणार आहे.
पैशांच्या संदर्भात देखील हा कालावधी खूप फायदा देणारा असून या कालावधीत आर्थिक लाभ मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता आहे. अविवाहित व्यक्तींचे विवाह या कालावधीत निश्चित होतील व आनंदी आनंद जीवनामध्ये राहील.
3- कन्या– कन्या राशी असलेल्या व्यक्तींसाठी तयार होणारे हे राजयोग खूप फायदा देणारे असून या कालावधीत धनलाभ होण्याची शक्यता आहे. अनेक अनपेक्षित ठिकाणाहून पैसे मिळण्याची शक्यता आहे. तसेच या राशीच्या व्यक्तींचे व्यक्तिमत्व या काळात उजळेल व करिअरमध्ये देखील चांगली प्रगती होऊन आर्थिक फायदा देखील मिळेल.
4- कुंभ– कुंभ राशींच्या व्यक्तींकरिता तयार होणारा केंद्र त्रिकोण राजयोग खूप फायद्याचा ठरणार आहे. त्यामुळे या व्यक्तींच्या बाजूने त्यांचे नशीब असणार असून कर्जापासून देखील मुक्ती मिळण्यास मदत होणार आहे.
जे व्यक्ती नोकरी करत असतील त्यांच्यासाठी हा कालावधी उत्तम असून जे व्यक्ती बेरोजगार आहेत त्यांना देखील या कालावधीत रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. इतकेच नाहीतर नवीन कार किंवा घर खरेदी करण्याची देखील या कालावधीत शक्यता असून काही धार्मिक आणि शुभ कार्यक्रमांमध्ये या राशीचे व्यक्ती भाग घेऊ शकणार आहेत. तसेच जीवनामध्ये सुख समृद्धी वाढण्यास देखील मदत होणार आहे.