हनुमान जयंती 2025 : भारतातील 5 अशी मंदिरे जिथे दर्शन घेतल्यावर होते प्रत्येक इच्छापूर्ती!

Published on -

Hanuman Temples | देशभरात हनुमान जयंती 12 एप्रिल रोजी साजरी केली जाई. या दिवशी भक्त विविध हनुमान मंदिरांना भेट देऊन आपल्या इच्छा पूर्ण होण्याची प्रार्थना करतात. भारतात अनेक हनुमान मंदिरे आहेत, जिथे भक्ती आणि श्रद्धेने अनेक संकटांवर मात केली आहे. मात्र, भारतातील 5 प्रसिद्ध आणि चमत्कारिक हनुमान मंदिरे अशी आहेत, जिथे लोक प्रार्थना करून इच्छांची पूर्तता करतात. ही मंदिरे कुठे आहेत पाहुयात-

श्री हनुमान मंदिर, कॅनॉट प्लेस (दिल्ली)

दिल्लीतील कॅनॉट प्लेसमधील श्री हनुमान मंदिर हे एक ऐतिहासिक स्थान आहे. येथे प्रमुख हनुमान मूर्ती असून, 24 तास हनुमान चालीसा पठण करण्यात येते. मंगळवार आणि शनिवार हे मंदिरात जाण्यासाठी अत्यंत शुभ मानले जातात. या मंदिरात भक्तांची अत्यधिक गर्दी असते आणि येथे केलेली प्रार्थना लवकर स्वीकारली जात असल्याचा अनुभव अनेक भक्तांचा आहे.

संकट मोचन हनुमान मंदिर, वाराणसी

 

वाराणसीतील संकट मोचन हनुमान मंदिर हे अत्यंत प्राचीन मंदिर आहे. हे मंदिर रामचरितमानसचे लेखक पूज्य संत तुलसीदास यांनी स्थापित केले असे मानले जाते. भक्तांचा विश्वास आहे की, येथे हनुमानाची पूजा केल्याने जीवनातील सर्व संकटे दूर होतात. या मंदिरात गेले की भक्तांना मानसिक शांती मिळते आणि संकटांपासून मुक्ती मिळते.

सालासर बालाजी मंदिर, सालासर

सालासर बालाजी मंदिर राजस्थानातील प्रसिद्ध हनुमान मंदिर आहे. येथे बालाजी हनुमानाची मूर्ती असून, प्रत्येक वेळी भाविकांचे आशीर्वाद घेण्यासाठी येथे येतात. या मंदिरात काही विशेष चमत्कारी घटनाही घडल्याचे स्थानिक लोक सांगतात. मंदिराचे धार्मिक महत्व आणि भक्तांचा अनुभव नेहमीच चर्चेत असतो.

हंपी हनुमान मंदिर, कर्नाटका

कर्नाटकमधील हंपी हनुमान मंदिर हे एक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या महत्त्वाचे आहे. हे मंदिर युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळामध्ये वसलेले आहे. हंपी हनुमान मंदिर भारतातील सर्वात जुन्या हनुमान मंदिरेपैकी एक मानले जाते. येथील भक्तांना हनुमानाची कृपा लवकर मिळते आणि हे स्थान श्रद्धेने परिपूर्ण असते.

चित्रकूट हनुमान धारा, चित्रकूट

 

चित्रकूट हनुमान धारा हे स्थान त्या महत्त्वाच्या घटनांचे केंद्र आहे, जेथे भगवान राम, सीता आणि लक्ष्मण यांनी त्यांचा वनवास घालवला. या मंदिरातून चित्रकूट धबधब्याचे आकर्षक दृश्य पाहता येते. येथील शांत वातावरण भक्तांना मानसिक शांती आणि सुख प्राप्त करण्यास मदत करते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News