Ayushman Bharat Card: आनंदाची बातमी ! आता ‘या’ लोकांना मिळणार 5 लाखांचा मोफत उपचार ; जाणून घ्या पात्रता

Published on -

Ayushman Bharat Card:  आज केंद्र सरकार अनेक योजना राबवत आहे. ज्याच्या फायदा सध्या खेड्यात राहणाऱ्या लोकांपासून शहरी भागातील लोकांना होत आहे.

यातच आता आम्ही या लेखात सरकारच्या एक भन्नाट योजनेबद्दल माहिती देणार आहोत ज्याच्या फायदा घेत तुम्ही देखील तुमच्यासाठी तब्बल 5 लाखांचा मोफत उपचार प्राप्त करू शकतात. चला मग जाणून घ्या या योजनेबद्दल संपूर्ण माहिती.

आम्ही तुम्हाला सांगतो या योजनेचा नाव आयुष्मान भारत कार्ड योजना आहे. सध्या या योजनेचा लाभ देशातील हजारो लोक घेत आहे.

जाणून घ्या काय आहे आयुष्मान भारत कार्ड योजना?

केंद्र सरकारने आयुष्मान भारत कार्ड योजना सुरू केली असून आतापर्यंत मोठ्या संख्येने लोक या योजनेत सामील होत आहेत. या योजनेचा लाभ घेणाऱ्यांना आयुष्मान कार्ड बनवले जाते, ज्यानंतर लोकांना रूग्णालयात 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळू शकतात.

याप्रमाणे तुमची पात्रता तपासा

तुमचे आयुष्मान कार्ड बनले आहे की नाही हे तुम्हाला जाणून घ्यायचे असेल, तर तुम्ही तुमची पात्रता तपासू शकता. यासाठी आयुष्मान कार्ड योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.

यानंतर I am eligible या पर्यायावर क्लिक करा.

यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाका आणि त्यानंतर त्यावर  OTP येईल.

हा OTP भरा.

यानंतर दोन पर्याय येतील

ज्यावर तुम्हाला तुमचे राज्य निवडायचे आहे.

यानंतर दुसरा पर्याय येईल.

यामध्ये तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर आणि रेशन कार्ड नंबर टाकावा लागेल आणि नंतर सर्च ऑप्शनवर क्लिक करावे लागेल.

तुम्ही हे सर्व पर्याय पूर्ण करताच तुमची पात्रता कळेल.

हे पण वाचा :-  टरबूज खायला आवडतो ? तर ‘ही’ बातमी वाचाच नाहीतर होणार ..

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News