Chanakya Niti : आचार्य चाणक्य यांनी चाणक्य नीती या ग्रंथामध्ये मनुष्याच्या जीवनासंबंधी अनेक धोरणे सांगितली आहेत. तसेच चाणक्य नीतीमध्ये महिलांबद्दल विशेष काही तत्वे सांगण्यात आली आहेत. त्याचा आजही मानवी जीवनात मोठा उपयोग होत आहे.
आचार्य चाणक्य यांनी जीवनात सुखी राहण्यासाठी अनेक मार्ग सांगितले आहेत. चाणक्याच्या या मार्गांचा जीवनात उपयोग केला तर नक्कीच माणूस यशस्वी बनू शकतो. आजही अनेकजण चाणक्याच्या धोरणांचा स्वीकार करत आहेत.
आचार्य चाणक्य यांनी महिलांबद्दल अनेक गोष्टी सांगितली आहेत. वैवाहिक जीवनात सुखी राहण्यासाठी चाणक्यांची अनेक तत्वे पुरुषांच्या कामी येत आहेत. तसेच वैवाहिक जीवनात स्त्री आणि पुरुष कसा सुखी राहू शकतो हे देखील चाणक्यांनी सांगितले आहे.
अनेकदा वैवाहिक जीवनात महिलांचे अनेक रूप हळूहळू समोर येत असतात. तसेच काही विवाहित महिला लग्नाच्या काही दिवसांनंतर पतीपासून असंतुष्ट असतात. यामागे देखील काही कारणे आचार्य चाणक्य यांनी सांगितली आहेत.
वैवाहिक जीवनात अनेक महिला स्वतःच्या पतीपासून समाधानी नसतात. मात्र याची जराशीही जाणीव पतीला नसते. त्यामुळे अशा असमाधानी महिला अनेकदा वेगळे हावभाव देत असतात.
बोलणे कमी करणे
वैवाहिक जीवनात ज्या महिला पतीपासून असंतुष्ट असतात अशा महिला पतीबरोबर कमी बोलतात. त्या पतीसोबत जास्त बोलण्यास टाळाटाळ करत असतात.
नवऱ्याला कधीही कोणत्या गोष्टीस नकार देत नाहीत. अशा सतत शांत राहणे पसंत करत असतात. त्यामुळे अशा महिला नेहमी असंतुष्ट असतात हे चाणक्यांनी सांगितले आहे.
जर पतीने पत्नीशी जास्त गप्पा मारल्या नाहीत तर महिलांमध्ये असंतोष पाहायला मिळतो. तसेच पत्नी शांत असेल तर पत्नीने त्याबद्दल विचारपूस करणे गरजेचे आहे. पत्नीशी सतत गप्पा मारणे हे देखील महत्वाचे आहे.
प्रत्येक गोष्टीवर रागावणे
पत्नीसाठी नवरा किती महत्त्वाचा असतो हे सर्वांनाच माहीत आहे. पत्नीला आपल्या पतीला कधीही नाराज करायचे नसते. अशा परिस्थितीत जर पत्नी तुमच्यावर रागावू लागली, म्हणजे भांडण करू लागली, तर समजून घ्या की ती कोणत्या ना कोणत्या कारणाने नाराज आहे. ही भावना लक्षात घेऊन तुमचा पुढचा निणर्य तुमच्या पत्नीला आनंदी ठेवण्यासाठी असायला हवा .
फक्त स्वतःबद्दल विचार करणे
पती आणि पत्नीचे नटे हे सात जन्माचे अतूट नाते असते असे बोलले जाते. पण जर वैवाहिक जीवनात पतीपासून पत्नी नेहमी दूर राहिली किंवा सतत स्वतःच्या विचारात असली तर ती तुमची काळजी घेत नाही असे समजा. तसेच तुम्ही याबद्दल तिच्याशी विचारपूस केली पाहिजे.
जर पत्नी घरामध्ये सतत शांत असेल आणि स्वतःच्या विचारत असेल तर ती पतीपासून असमाधानी आहे असे चाणक्यांनी सांगितले आहे. त्यामुळे तुम्ही जर पत्नी रागावली तर तिचा राग शांत करण्याचा प्रयत्न करा. तसेच तुझाबर शांत आणि प्रेमाने बोलणे पसंत करा. तसेच तिच्या समस्या सोडवण्यास प्राधान्य द्या.