Car Discount Scheme : देशात महागाईचा भडका उडाला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती शंभरी पार गेल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागिरक हैराण झाले आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी ऑटोमोबाईल कंपन्यांना इलेक्ट्रिक कार आणि हायड्रोजन कार बनवण्यास भर द्यावा असे सांगितले आहे.
तसेच नितीन गडकरी यांनी कार खरेदीदारांना पैसे वाचवण्याची भन्नाट युक्ती सांगितली आहे. सर्वच कारच्या किमती अधिक महाग झाल्या आहेत. कार खरेदी करताना ग्राहकांना नोंदणी शुल्क आणि एक्स-शोरूम किंमतीपेक्षा जास्त विमा यासह अनेक शुल्क भरावे लागतात.
त्यामुळे ग्राहकांचे अधिक पैसे खर्च होतात. वाहन खरेदी करताना कसे पैसे वाचवता येऊ शकतात. हे खुद्द नितीन गडकरी यांनीच सांगितले आहे. सरकारच्या वाहन स्क्रॅप धोरणाचा ग्राहक आणि कंपनी दोघांनाही फायदा होऊ शकतो असे गडकरी यांनी सांगितले आहे.
ऑटो एक्स्पो-2023 मधील आपल्या भाषणात, गडकरी म्हणाले, “भंगाराच्या बाबतीत, वाहन कंपन्यांच्या कच्च्या मालाच्या किमतीत 33 टक्के कपातीसह विक्रीत 10-12 टक्के वाढ होईल.
जे आपले वाहन स्क्रॅप करणार आहेत ते नक्कीच नवीन वाहन खरेदी करतील.” त्यांनी कंपन्यांना सल्ला दिला की त्यांनी भंगार प्रमाणपत्र दाखवणाऱ्या ग्राहकांना नवीन वाहनांच्या खरेदीवर सवलत द्यावी.
ते पुढे म्हणाले, “आम्ही यात अर्थ मंत्रालयाकडून काही शिथिलता मिळवण्याचाही प्रयत्न करत आहोत… पण जर तुम्ही काही शिथिलता देऊ शकत असाल तर ते तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल कारण तुमचा व्यवसाय आणि नफा वाढेल.”
प्रमाणपत्रातून सूट मिळवा
या पॉलिसी अंतर्गत, जर तुमचे वाहन 15 वर्षांपेक्षा जास्त जुने असेल तर ते स्क्रॅप करावे लागेल. असे केल्यावर सरकार तुम्हाला प्रमाणपत्र देईल. या प्रमाणपत्राच्या आधारे, तुम्ही वर्षभरात नवीन वाहन खरेदी केल्यास तुम्हाला नोंदणीदरम्यान 15 टक्क्यांपर्यंत कर सूट मिळेल. तथापि, जर तुम्ही व्यावसायिक कार घेत असाल तर 10 टक्क्यांपर्यंत सूट मिळेल.