भारतातील सर्वात उंच इमारत कोणती माहिती आहे का? प्लॅटची किंमत ऐकून डोळे होतील पांढरे

Published on -

दुबईतील बुर्ज खलिफा ही जगातील सर्वांत उंच इमारत आहे. परंतु भारतातील सर्वांत उंच इमारत कोणती? हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर आपण भारतील सर्वांत उंच इमारतीबद्दल माहिती पाहणार आहोत. विशेष म्हणजे भारतातील सर्वात उंच इमारत आपल्या महाराष्ट्रात आहे.

मुंबईत आहे सर्वात उंच इमारत

भारतातील सर्वांत उंच इमारत ही आपल्या मुंबईत आहे. वरळी येथील पॅलेस रॉयल ही भारतातील सर्वांत उंच इमारत आहे. ही इमारत वेळोवेळी चर्चेत असते. या इमारतीचे बांधकाम २००७ मध्ये सुरू झाले होते. या प्रकल्पाची पायाभरणी करणारी व्यक्ती होती, विकास कासलीवाल. तो एक रिअल इस्टेट डेव्हलपर आहेत. यापूर्वी तो श्रीराम अर्बन इन्फ्राचा प्रवर्तक देखील होते.

किती उंच आहे

भारतातील सर्वात उंच इमारत पॅलेस रॉयल असून ती ३२० मीटर उंच आहे. भारतातील सर्वांत उंच इमारत म्हणून तिची नोंद झाली आहे. या इमारतीच्या बांधकामापासून ती चांगलीच चर्चेत राहिली. या इमारतीच्या बांधकामात आर्थिक घोटाळा झाल्याचेही बोलले गेले. परंतु आता ती पूर्ण झाली असून, तीच भारतातील सर्वांत उंच इमारत ठरली आहे.

वादामुळे आली चर्चेत

काम सुरू झाल्यानंतर पाच वर्षांनी म्हणजेच २०१२ मध्ये इमारतीचा वरचा मजला पूर्ण झाला. त्याच वर्षी इमारतीविरुद्ध अनेक जनहित याचिका दाखल करण्यात आल्या. हे प्रकरण न्यायालयात पोहोचले. त्यानंतर बांधकाम थांबवण्यात आले. प्रकरण लांबत गेले आणि प्रकल्पाचा खर्च दररोज वाढत गेला. एक वेळ अशी आली की या प्रकल्पाचे प्रवर्तक श्रीराम अर्बन इन्फ्रा स्वतःच दिवाळखोरीत निघाले. कंपनीने इंडिया बुल्सकडून कर्ज घेतले होते. म्हणून इंडिया बुल्सने प्रकल्पाचा लिलाव केला. ऑनेस्ट शेल्टर प्रायव्हेट लिमिटेड नवीन प्रवर्तक बनले. ही इमारत बांधण्यासाठी अंदाजे ३००० कोटी रुपये खर्च आला.

प्लॅटची किंमत काय

या इमारतीत एकूण ७२ मजले आहेत. ही एक प्रीमियम निवासी इमारत आहे. ती भारतातील सर्वात उंच निवासी इमारत आहे. येथील फ्लॅट्सची किंमत त्यानुसार आहे. २०१३ मध्ये या इमारतीतील एका फ्लॅटची बुकिंग किंमत २७ कोटी रुपये होती. आज येथील सर्वात स्वस्त फ्लॅटची किंमतही ४० कोटी रुपये आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe