Jyotish Tips : देशात महाशिवरात्रीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी अनेकजण भगवान शंकराच्या मंदिरात जाऊन पूजा करतात. या वर्षाची महाशिवरात्र काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. अनेक भागात महाशिवरात्र साजरी करण्यासाठी तयारी देखील सुरु झाली आहे.
यंदाच्या वर्षातील महाशिवरात्र या महिन्यातील १८ फेब्रुवारीला होणार आहे. या दिवशी ज्योषशास्त्रानुसार तुम्ही काही उपाय केले तर तुमचे नशीब चमकेल आणि महादेवाकडून तुम्हाला चांगले वरदान मिळेल.
पुराण आणि आगमानुसार महाशिवरात्रीदिवशी जर तुम्ही पूजा किंवा रुद्राभिषेक केला तर महादेव प्रसन्न होतात. तसेच तुमची मनोकामना हमखास पूर्ण होईल. शिवपुराणातील काही उपाय तुमच्यासाठी भाग्यदायक ठरू शकतात.
शिवरात्रीला करा हे उपाय
महाशिवरात्रीदिवशी शिवपुराणात महामृत्युंजय मंत्र मंत्र ॐ हौं जूं सः ॐ भूर्भुवः स्वः ॐ त्रयम्बकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्व्वारुकमिव बन्धानान्मृत्यो मुक्षीय मामृतात् ॐ स्वः भुवः भूः ॐ सः जूं हौं ॐ 108 वेळा जप करून पाण्याने अभिषेक करा. यामुळे सर्वात मोठा असाध्य आजारही बरा होतो.
आजकाल अनेक तरुण मुलामुलींच्या वैवाहिक जीवनात अडचण येत असते. मात्र महाशिवरात्रीदिवशी शिवलिंगावर केशरमिश्रित दूध अर्पण केल्याने लवकरच अशा समस्या दूर होतील.
गरिबीपासून मुक्ती मिळवण्यासाठी आणि संपत्ती मिळविण्यासाठी शिवरात्रीला महादेवाची पूजा केल्यानंतर माशांना पिठाचे गोळे खाऊ घाला. या दरम्यान ओम नमः शिवाय मंत्राचा सतत जप करत राहा.
जीवनातील सर्व समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी महाशिवरात्रीला नंदीला हिरवा चारा आणि गूळ खाऊ घाला. यानंतर पुढील 7 सोमवार हे सतत करत राहा, तुमच्या जीवनातील सर्वात मोठी समस्या दूर होईल.
काहींना विवाह झाल्यानंतर मुले होत नाहीत. मात्र शिवपुराणात यावरही उपाय सांगणायत आला आहे. महाशिवरात्रीदिवशी पीठाने 11 शिवलिंगे बनवावीत आणि पाण्याने अभिषेक करून भोलेनाथाची पूजा करावी. नि:संतानांनाही या उपायाने संतती प्राप्त होते.