Online Scam : देशात वाढत असणाऱ्या ऑनलाईन व्यवहारामुळे आता अनेक जण सायबर ठगांचा शिकार होत आहे. आम्ही तुम्हाला सांगतो सध्या एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेची पार्ट टाईम जॉबच्या नावावर तब्बल 1.18 लाखांची फसवणूक करण्यात आली आहे.
ही धक्कादायक घटना देशाची राजधानी दिल्लीची आहे. मिळालेल्या माहितीनुसार महिलेला Amazon वर घरातून कामाची ऑफर देण्यात आली होती. तुम्हाला देखील Amazon वर घरातून कामाची ऑफर देण्याचा दावा करणारे मेसेज येत असतील, तर त्याकडे ताबडतोब दुर्लक्ष करा नाहीतर तुम्हाला देखील मोठा आर्थिक नुकसान सहन करावा लागू शकतो.
या प्रकरणात दिल्ली पोलिसांनी सायबर गुन्हेगारांच्या एका आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश केला आहे ज्याने घरातून नोकरीच्या बनावट कामाच्या नावाखाली सुमारे 11,000 लोकांची फसवणूक केली आहे. सायबर ठगांची टोळी चीन, दुबई येथे आहे आणि त्यांचा मास्टरमाइंड जॉर्जियामधून टोळी चालवतो. सायबर फ्रॉडमध्ये सहभागी असलेल्या तीन जणांना अटक करण्यात दिल्ली पोलिसांना यश आले आहे.
नोकरीच्या नावावर मोठा घोटाळा
IANS मध्ये दिलेल्या वृत्तानुसार, दिल्ली, गुरुग्राम आणि फतेहाबाद (हरियाणा) येथे वेगवेगळ्या छाप्यांमध्ये या संदर्भात गुन्हेगारांना अटक करण्यात आली. आऊटर नॉर्थचे पोलिस उपायुक्त देवेश कुमार महाला यांनी वृत्तसंस्थेला सांगितले की, त्यांच्या तपासादरम्यान त्यांना असे आढळून आले की, चिनी सायबर गुन्हेगारांनी ऑनलाइन काम करून वर्क फ्रॉम होम किंवा पार्ट टाईम जॉब करणाऱ्या लोकांची फसवणूक करण्यासाठी एक मॉड्यूल तयार केले आहे. पार्ट टाईम जॉबच्या शोधात असलेल्या एका महिलेची 1.18 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
“दिल्ली पोलिसांना एक तक्रार प्राप्त झाली होती ज्यात एका महिलेने सांगितले की, काही अज्ञात स्कॅमर्सनी अॅमेझॉनमध्ये ऑनलाइन पार्ट टाईम जॉब देण्याच्या नावाखाली 1.18 लाख रुपयांची फसवणूक केली आहे. तक्रारीत महिलेने म्हटले आहे की हा एक मोठा घोटाळा आहे जे अमेझॉन कंपनीच्या नावा खाली काही अज्ञात गुन्हेगारांकडून केला जात आहे. वस्तुस्थिती तपासल्यानंतर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.’
लोकांची फसवणूक करण्यासाठी बनावट Amazon साइट तयार केली
लोकांची फसवणूक करण्यासाठी स्कॅमर्सनी बीजिंग चीनमधून ऑपरेट होत असलेल्या टेलिग्राम आयडीचा कथितपणे वापर केला. बनावट अॅमेझॉन साइटवर गुंतवणुकीसाठी पीडितेला प्रवृत्त करण्यासाठी वापरण्यात आलेला व्हॉट्सअॅप क्रमांक भारताबाहेरूनही चालवला जात होता.
पोलिसांना तपासात बँकेकडून मिळालेल्या तपशिलांच्या छाननी दरम्यान, असे आढळून आले की एकाच दिवसात एकूण 5.17 कोटी रुपये जमा केले गेले. पुढील मनी ट्रेलमध्ये, असे आढळून आले की संपूर्ण रक्कम 7 वेगवेगळ्या कंपन्यांद्वारे राउट करण्यात आली होती आणि क्रिप्टो चलनाद्वारे परदेशी खात्यांमध्ये पैसे हस्तांतरित केले गेले आहेत.
नोकरी शोधणाऱ्यांना सावध करताना, डीसीपी म्हणाले की वेबसाइट्स अशा प्रकारे क्युरेट केल्या आहेत की ते वास्तविक Amazon वेबसाइटसारखे दिसते. इन्स्टाग्राम, फेसबुक आणि इतर सोशल मीडिया वेबसाइटवर अशा बनावट वेबसाइट्सचा मोठ्या प्रमाणावर प्रचार केला जातो. ते पुढे म्हणाले- “घोटाळे करणारे आपोआप WhatsApp द्वारे पीडितांपर्यंत पोहोचतात किंवा काही प्रकरणांमध्ये, पीडित व्यक्ती त्यांच्याशी संपर्क साधतात. पीडितांना WhatsApp चॅट्सचे बनावट स्क्रीनशॉट आणि चांगल्या पगाराच्या कर्मचाऱ्यांसोबत चांगल्या प्रकारे तयार केलेल्या क्रिएटिव्ह चॅट्सद्वारे फसवले जाते.”
हे पण वाचा :- iPhone 14 Offers : बंपर डिस्काउंट ! 46 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीमध्ये खरेदी करा आयफोन 14 ; जाणून घ्या कसा होणार फायदा