तणाव वाढला: तुमच्या फोनमध्ये लगेच करा’ही’ सेटींग; इमर्जन्सी अलर्ट कसा मिळवायचा? वाचा

Published on -

भारत-पाकिस्तानमध्ये तणाव वाढला आहे. भारताने पाकिस्तानात घूसुन अतिरेक्यांचे तळ उध्वस्त केले आहेत. सरकारने बुधवाी (७ मे) देशभरात मोठा मॉक ड्रिल घेत, जनतेला सजग केले आहे. हवाई हल्ल्याचे सायरन, नागरिकांना त्वरित संदेश पाठवणे, याररख्या आपत्कालीन प्रतिसाद प्रणालींची माहितीही देण्यात आली आहे. देशातील लाखो स्मार्टफोन वापरकर्त्यांसाठी आपत्कालीन सूचना देण्यात येणार आहे. त्यासाठी तुमच्या फोनच्या काही सेटींग्ज तत्काळ तपासाव्या लागणार आहेत.

आपत्कालीन सूचना कशा मिळवायच्या?

अँड्रॉइड फोन वापरकर्त्यांना आपत्कालीन सूचना मिळू शकणार आहेत. त्यासाठी अँड्रॉइड ११ किंवा त्यावरील आवृत्ती असलेला फोन आवश्यक असणार आहेत. त्याखालील आवृत्तीच्या फोनवर हे अलर्ट मिळणार नाहीत. वेगवेगळ्या अँड्रॉइड आवृत्त्यांसाठी सेटिंग्ज वेगवेगळ्या असतील. म्हणून तुमच्या डिव्हाइससाठी प्रत्यक्ष अटी तपासाव्या लागतील.

काय करावे लागेल?

– तुमच्या अँड्रॉइड फोनवरील सेटिंग्जमध्ये जा.
– स्क्रीन खाली स्क्रोल करून सुरक्षितता आणि आणीबाणी पहा.
– आता तुम्हाला वायरलेस इमर्जन्सी अलर्ट्स पर्याय दिसेल, त्यावर टॅप करा.
– तुमच्या डिव्हाइससाठी सर्व सूचना सक्षम करा.
– फोन सेटिंग्जमध्ये असे म्हटले आहे की जेव्हा तुम्ही रोमिंगमध्ये असता किंवा तुमच्याकडे सक्रिय सिम नसेल तेव्हा तुम्हाला काही अलर्ट मिळू शकतात जे या सेटिंग्जमध्ये समाविष्ट नाहीत. आम्हाला पिक्सेल फोनवर हे चरण मिळाले आहेत परंतु तुम्ही ते OnePlus, Samsung किंवा Xiaomi फोनवर देखील लागू करू शकता.

आयफोनवर कसा मिळेल अलर्ट?

iPhone वर असे अलर्ट साधारणपणे आधीपासूनच ऑन असतात. तरीही, तुम्ही एकदा सेटिंगमध्ये जाऊन ते तपासू शकता. सर्वात आधी iPhone च्या सेटिंग्स उघडा आणि Notifications मध्ये जा. त्यानंतर खाली स्क्रोल करा आणि Government Alerts सेक्शनवर क्लिक करा. येथून तुम्ही ते सहजपणे ऑन करू शकता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe