उच्चशिक्षित तरुणाने अडीच एकरमध्ये घेतले 14 लाखांचे उत्पन्न! काय केले नेमके शेतीत?

तरुणाई म्हटले म्हणजे कायम सळसळता उत्साह आणि काहीतरी नवीन करण्याची उर्मी आणि कुठलीही अशक्य गोष्ट शक्य होईलच या जिद्दीला पेटून केलेले प्रयत्न असल्याचे आपल्याला दिसून येते. तरुणाईच्या माध्यमातून कुठल्याही क्षेत्रामध्ये काहीतरी नाविन्यपूर्ण करण्याचा प्रयत्न केला जातो व त्यासाठी कायमच नवनवीन प्रयोग करण्यावर तरुणांचा भर असल्याचे आपल्याला दिसून येते.

Ajay Patil
Published:
success story

Taiwan Peru Lagvad:- तरुणाई म्हटले म्हणजे कायम सळसळता उत्साह आणि काहीतरी नवीन करण्याची उर्मी आणि कुठलीही अशक्य गोष्ट शक्य होईलच या जिद्दीला पेटून केलेले प्रयत्न असल्याचे आपल्याला दिसून येते. तरुणाईच्या माध्यमातून कुठल्याही क्षेत्रामध्ये काहीतरी नाविन्यपूर्ण करण्याचा प्रयत्न केला जातो व त्यासाठी कायमच नवनवीन प्रयोग करण्यावर तरुणांचा भर असल्याचे आपल्याला दिसून येते.

त्यातल्या त्यात उच्चशिक्षित तरुण अनेक प्रकारचे प्रयोग करत असतात व त्यामध्ये यशस्वी देखील होतात. हाच मुद्दा कृषी क्षेत्राला देखील लागू होताना सध्या दिसून येत असून नोकऱ्यांची उपलब्धता कमी असल्यामुळे अनेक उच्च शिक्षित तरुण आता शेतीकडे वळत आहेत व शेतीला देखील चांगले दिवस आले आहेत असे म्हटले तरी वावगे ठरू नये.

कारण अशा प्रकारचे उच्चशिक्षित तरुण शेतीत आल्यामुळे त्यांनी परंपरागत शेती पद्धती व पिकांना तिलांजली देत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विविध फळबाग व भाजीपाला पिकांच्या लागवडीतून मोठ्या प्रमाणावर आर्थिक स्थैर्य मिळवले आहे व त्यासोबत कृषी क्षेत्राची वाटचाल देखील प्रगती आणि आधुनिकतेच्या दिशेने केली आहे.

अगदी याच मुद्द्याला धरून जर आपण भूम तालुक्यातील पाठसांगवी येथील उच्चशिक्षित असलेले बाळासाहेब नाईकिंदे यांची यशोगाथा बघितली तर ती इतर तरुणांना आणि शेतकऱ्यांना देखील तितकीच प्रेरणादायी आहे.

बाळासाहेब यांनी नोकरीच्या मागे न लागता शेतीमध्ये येण्याचे ठरवले व तैवान पिंक पेरूच्या लागवडीतून तब्बल 14 लाख रुपयांचे उत्पन्न मिळवण्यात ते यशस्वी झाले आहेत.

बाळासाहेब नाईकिंदे यांनी तैवान पिंक लागवडीतून केली लाखोत कमाई
याबाबत सविस्तर वृत्त असे की, भूम तालुक्यातील पाठसांगवी येथील उच्चशिक्षित तरुण बाळासाहेब नाईकिंदे हे पदवीधर असून त्यांनी बार्शी येथे तीन वर्षे स्पर्धा परीक्षांची तयारी केली.

परंतु त्यामध्ये यश न आल्याने त्यांनी शेतीमध्ये येण्याचे ठरवले व शेतीची कास धरत २० जुलै 2023 या कालावधीमध्ये अडीच एकर क्षेत्रावर होर्टी तैवान या पेरूची लागवड केली. विशेष म्हणजे पहिल्याच वर्षी त्यांना 30 टन पेरूचे उत्पादन मिळवले व त्यातून त्यांनी दहा लाख रुपयांची कमाई केली.

या चालू वर्षांमध्ये 40 टन उत्पादन मिळाले असून बाजारात 20 ते 40 रुपये प्रति किलोचा दर सध्या या पेरूला मिळत आहे व त्यामुळे आतापर्यंत बारा लाख रुपयांचे उत्पन्न त्यांनी मिळवले असून अजून देखील पेरूची काढणी सुरू असल्याने अजून चार लाख रुपयांचे उत्पन्न मिळेल अशी अपेक्षा बाळासाहेब यांना आहे. या अडीच एकर पेरूसाठी सर्व खर्च मिळून चार लाख रुपये त्यांना खर्च आला व सात महिन्यांमध्ये जवळपास खर्च वजा करिता दहा लाख रुपयांचा निव्वळ नफा त्यांना मिळणार आहे.

अशा प्रकारे करतात पेरू बागेचे नियोजन
या पेरू बागेमध्ये उत्कृष्टपणे व्यवस्थापन ठेवत त्यांनी या प्रकारचे भरघोस उत्पादन मिळवले आहे. ते या बागेला फवारणी करण्यासाठी ट्रॅक्टरचा वापर करतात व ट्रॅक्टरच्या माध्यमातून पूर्ण बागेला फवारणी करतात.

तसेच खत व्यवस्थापन करताना रासायनिक व इतर मिश्र खतांचा वापर करतात व एकरी सहा ट्रॅक्टर शेणखत देखील वापरतात. सगळ्या प्रकारचे व्यवस्थापन अगदी अचूक व योग्य कालावधीत ठेवल्यामुळे त्यांना दर्जेदार असे पेरूचे उत्पादन मिळत असल्याने त्याला मागणी देखील जास्त असल्याचे दिसून येत आहे.

चेन्नई, तिरुपती व हैदराबादच्या मार्केटमध्ये ते पेरू विक्रीसाठी पाठवतात व इतकेच नाहीतर काही व्यापारी त्यांच्या शेताच्या बांधावर येऊन जागेवरून पेरूची खरेदी करतात व त्यामुळे त्यांना वाहतूक खर्च तसेच कमिशन व इतर खर्च वाचून मोठ्या प्रमाणावर नफा मिळताना दिसून येत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe