पैसे कमावण्याचे अनेक मार्ग असतात. यासाठी कुणी नोकरी करते तर कुणी इतर छोटीमोठी कामे करतात. काही लोक बिझनेस करूनही बक्कळ पैसे कमवतात. पण आज माही तुमच्यासाठी अशी एक आयडिया आणली आहे की तुम्हाला ती करोडपती बनवेल. यासाठी तुम्हाला जास्त कष्ट लागणार नाहीत. तुम्ही महोगनीच्या झाडांपासून करोडो रुपये कमावू शकता. याबद्दल विस्ताराने जाणून घेऊ –
महोगनी झाडांविषयी थोडेसे – ही झाडे विशेषत: त्यांच्या औषधी गुणधर्मांसाठी ओळखली जातात. त्यांचा उपयोग फर्निचर बनवण्यासाठीही केला जातो. या झाडाचे लाकूड खूप महाग विकले जाते. विशेष म्हणजे या झाडाची प्रचंड मागणी आहे. सुरवातीला ही झाडे जंगलात मिळायची परंतु तेथे त्यांची मोठ्या प्रमाणात कत्तल झाली.
त्यामुळे या झाडांच्या शेतीला मोठी डिमांड आली. विशेष म्हणजे या झाडाचे आरोग्याच्या दृष्टिने खूप महत्व आहे. या झाडाच्या पानांपासून आणि बियांपासून डासांपासून बचाव करणारे औषध बनवले जाते. कर्करोग, रक्तदाब, मधुमेह, दमा आणि सर्दी यांसारख्या अनेक आजारांवरही याचा उपयोग केला जातो. आता यावरूनच त्याची डिमांड व वापर तुमच्या लक्षात आला असेल. आता जाणून घेऊयात शेती कशी करावी व त्यातून मिळणारे इन्कम.
शेती व त्यातून मिळणारे उत्पन्न :- महोगनीच्या शेतीतून खूप पैसे तुम्ही कमावू शकता. या झाडाचे लाकूड तपकिरी रंगाचे असते. तुम्ही एक एकर जागेत 120 महोगनी झाडे लावली तर तुम्ही 12 वर्षात करोडपती होऊ शकता. त्याचे लाकूड देखील खूप मजबूत मानले जाते, जे दीर्घकाळ टिकते. हे लाकूड पाण्याच्या संपर्कात आले तरी खराब होत नाही.
हे झाड 50 अंश सेल्सिअसपर्यंतचे तापमान सहज सहन करू शकते. सुरुवातीचे काही दिवस सोडले तर कमी पाणी असेल तरीही या झाडांची वाढ अत्यंत सहज होते. ज्या ठिकाणी वारा कमी वाहतो अशी जागा किंवा डोंगराळ, खडकाळ आणि पाणी साचलेली जमीन सोडून तुम्ही ते कोठेही लावू शकता.
मातीची पीएच पातळी सामान्य असावी. या झाडाला 5 वर्षातून एकदा बिया येतात. एका झाडापासून ५ किलो बियाणे बोलते. त्यांची बाजारात किंमत 1000 रुपये प्रति किलो पर्यंत आहे. म्हणजे जर तुमच्याकडे 120 महोगनीची झाडे असतील तर तुम्हाला 5 वर्षांत सुमारे 600 किलो बियाणे मिळतील.
नुसत्या बियाण्यांनी तुम्हाला ५ वर्षांत ६ लाख रुपये मिळू शकतात. तसेच आता याचे लाकूड जर पाहिले तर 2000 ते 5000 रुपये प्रति फूट दराने विकले जाते. एक झाड साधारण 60 फुटांपर्यंत वाढते. म्हणजे तुम्ही यातून करोड रूपये कमावू शकता.