Banana Farming: भारतात गेल्या अनेक दशकापासून उत्पादनवाढीच्या अनुषंगाने शेतकरी बांधवांनी (Farmer) फळबाग लागवड करण्यास सुरुवात केली आहे. राज्यातही आता शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात फळबाग लागवड करत आहेत. यात केळी या पिकाचा देखील समावेश आहे. राज्यातील खानदेशात मोठ्या प्रमाणात केळीचे उत्पादन घेतले जाते.
खानदेश मधील जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक केळीची लागवड बघायला मिळते. विशेष म्हणजे केळीची शेती (Farming) शेतकऱ्यांसाठी विशेष फायदेशीर ठरत आहे. शेतकरी बांधव केळीच्या शेतीतून चांगली कमाई (Farmer Income) करत आहेत. अशा परिस्थितीत आज आपण केळी लागवडीच्या एका सुधारित तंत्रज्ञान याविषयी जाणून घेणार आहोत. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया केळी लागवडीसाठी सुधारित टेक्निक.
कृषी तज्ञांच्या मते, टिशू कल्चरचा (Tissue Culture) वापर करून उत्पादीत केलेल्या केळीच्या रोपांची (Banana Crop) लागवड केल्यास केळी उत्पादक शेतकऱ्यांना दुप्पट नफा मिळू शकतो. मात्र असे असले तरी टिश्यूकल्चर पद्धतीने उत्पादीत केलेल्या केळीच्या रोपांची लागवड करण्यापूर्वी काही गोष्टींची काळजी घेणे देखील अतिशय महत्वाचे आहे.
नाहीतर शेतकरी बांधवांना यातून फायदा होण्याऐवजी नुकसानच होण्याची दाट शक्यता असते. चला तर मग मित्रांनो जाणून घेऊया केळी उत्पादक शेतकऱ्यांनी या टेक्निकचा वापर करताना कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे हे जाणून घेऊया.
टिश्यू कल्चरचा फायदा काय बर
गेल्या काही वर्षांपासून राज्यात टिश्यू कल्चर पद्धतीने केळीच्या सुधारित प्रजाती तयार केल्या जात असल्याचे कृषी वैज्ञानिक नमक करत असतात. या पद्धतीने तयार केलेल्या वनस्पतींपासून केळीची लागवड करण्याचे अनेक फायदे आहेत. ही झाडे निरोगी व रोगमुक्त असतात. झाडे समान रीतीने वाढतात. म्हणून, rhizomes च्या फुलणे, फळे आणि कापणी एकाच वेळी सर्व वनस्पतींमध्ये होते, ज्यामुळे त्याचे मार्केटिंग करणे सुलभ होते.
परिणामी शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होते. कृषी शास्त्रज्ञांच्या मते, या पद्धतीने तयार करण्यात आलेल्या वनस्पतीमध्ये फळांचा आकार आणि प्रकार एकसमान आणि मजबूत असतो. टिश्यू कल्चरपासून तयार केलेली केळीचे झाडे सुमारे 60 दिवसांत फळधारणा करतात. म्हणजेच केळीचे पहिले पीक लागवडीनंतर 14 महिन्यांत मिळते. टिशू कल्चर पासून तयार करण्यात आलेल्या केळीच्या झाडापासून सरासरी उत्पादन प्रति रोप 30-35 किलो पर्यंत असते. शास्त्रोक्त पद्धतीने शेती करून 70 किलोपर्यंत उत्पादनही मिळत असल्याचा दावा केला जातो.
टिश्यू कल्चरद्वारे तयार केलेल्या केळीच्या झाडापासून पहिले पीक घेतल्यानंतर, दुस-या खोड पिकातील घड (बंच) 8-10 महिन्यांत पुन्हा येतो. अशा प्रकारे 24-25 महिन्यांत केळीची दोन पिके घेता येतात. परंतु इतर पद्धतींनी तयार केलेल्या वनस्पतींमध्ये हे शक्य नाही. अशी रोपे लावल्याने वेळ आणि पैसा वाचतो. परिणामी भांडवली वसुली झटपट होते. निश्चितच टिशू कल्चरचा वापर करून तयार करण्यात आलेली केळीची रोपे लावली तर केळी उत्पादक शेतकरी बांधवांना दुप्पट नफा मिळत असतो.