Black Tomato Farming: लाल टोमॅटोपेक्षा करा ब्लॅक टोमॅटोची शेती! कमवाल लाखो रुपये, करा अशा पद्धतीने नियोजन

Ajay Patil
Published:
black tommato farming

Black Tomato Farming:- शेतीमध्ये आता मोठ्या प्रमाणावर तंत्रज्ञानाचा वापर होऊ लागल्यामुळे शेती क्षेत्राचा झपाट्याने विकास होताना दिसून येत आहे. तंत्रज्ञानाचा वापर व शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेली प्रयोगशीलता यामुळे अनेक वेगवेगळ्या प्रकारची पिके देखील घेतली जात असून देशातील कृषी विद्यापीठे व कृषी संशोधन केंद्राच्या माध्यमातून पिकांच्या वेगवेगळ्या वाणाचा देखील विकास करण्यामध्ये यश आल्याने खूप चांगल्या प्रकारचे उत्पादन शेतकऱ्यांना मिळू लागले आहे.

याचेच जर उदाहरण घेतले तर टोमॅटोचे उदाहरण आपल्याला घेता येईल. जर आपण साधारणपणे टोमॅटो म्हटले म्हणजे आपल्यापुढे लाल रंगाचा टोमॅटो येतो. परंतु यामध्ये तुम्हाला माहिती आहे का लाल टोमॅटो ऐवजी काळ्या रंगाचा म्हणजेच ब्लॅक टोमॅटोचे उत्पादन देखील घेता येऊ शकते.

या टोमॅटोला लाल रंगाच्या टोमॅटो पेक्षा जास्तीचा बाजार भाव मिळतो. कारण काळा टोमॅटो आरोग्याच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वपूर्ण असल्यामुळे त्याला मागणी चांगली असते. या लेखामध्ये ब्लॅक टोमॅटो शेती विषयी जाणून घेणार आहोत.

 ब्लॅक टोमॅटो जास्त काळ स्टोरेज करता येतो

साधारणपणे जर आपण लाल रंगाच्या टोमॅटोचा विचार केला तर तो पटकन खराब व्हायला लागतो म्हणजेच तो जास्त काळ साठवता येत नाही. परंतु त्या तुलनेमध्ये ब्लॅक टोमॅटो हा जास्त काळ ठेवता येतो. याव्यतिरिक्त लाल टोमॅटो पेक्षा यामध्ये औषधी गुणधर्म जास्त प्रमाणात असतात.

ब्लॅक टोमॅटोचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे हा दिसायला बाहेरून जरी काळा रंगाचा दिसत असला तरी आतून लहान असतो. तसे याची चव फारशी आंबट किंवा गोड देखील नसते व हे खारट असतात. जे शरीरातील कोलेस्ट्रॉल तसेच वजन आणि साखरेची पातळी कमी करण्यासाठी मदत करतात.

 ब्लॅक टोमॅटोच्या शेतीसाठी लागते उबदार हवामान

ब्लॅक टोमॅटोची लागवड लाल टोमॅटो सारखीच केली जाते. परंतु ब्लॅक टोमॅटोचे उत्पादन चांगले येण्यासाठी उबदार  हवामानाची आवश्यकता असते. साहजिकच उष्ण कटिबंधात असलेल्या भारतातील हवामान हे ब्लॅक टोमॅटोचे शेती करिता योग्य असल्याचे म्हटले जाते. ब्लॅक टोमॅटोच्या उत्पादनाकरिता पीएच म्हणजे सामू हा सहा ते सातच्या दरम्यान असणे गरजेचे आहे.

ब्लॅक टोमॅटोची पहिली लागवड इंग्लंडमध्ये करण्यात आली व याला इंग्रजीमध्ये इंडिगो रोज टोमॅटो फार्मिंग असे म्हणतात. युरोपमध्ये सुपर फूड म्हणून या टोमॅटोला ओळखले जाते व सध्या भारतामध्ये देखील याची मागणी सातत्याने वाढताना दिसून येत आहे.

 कोणता महिना लागवडीसाठी योग्य असतो?

तुम्हाला देखील ब्लॅक टोमॅटोची लागवड करायची असेल तर तुम्ही जानेवारी या महिन्यांमध्ये याची लागवड करू शकतात व हा चांगला महिना मानला जातो. समजा तुम्ही जर जानेवारी महिन्यामध्ये लागवड केली तर त्याचे उत्पादन तुम्हाला मार्च एप्रिल पर्यंत मिळायला सुरुवात होते.

 खर्च आणि नफा

टोमॅटोच्या लागवडीचा खर्च पाहिला तर तो साधारणपणे लाल टोमॅटो इतकाच येतो. यामध्ये तुम्हाला काही प्रमाणात जास्त खर्च हा ब्लॅक टोमॅटोच्या बियाण्याकरिता करणे गरजेचे असते. या शेतीत खर्च कमी असतो तसेच हेक्टरी चार ते पाच लाख रुपये नफा तुम्ही मिळवू शकतात. मोठे शहरांमध्ये सध्या ब्लॅक टोमॅटोला जास्त मागणी असून त्या ठिकाणी विक्री केली तर जास्त पैसे मिळवता येणे शक्य आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe