Cotton crop : कापसाला गुलाबी बोंडअळी आणि पांढऱ्या माशीपासून वाचण्यासाठी करा हे उपाय! CICR नागपूरने सुचवल्या उपाययोजना

Cotton crop : भारतामध्ये कापूस या नगदी पिकाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. 2021-22 च्या आकडेवारीनुसार, जगातील कापूस उत्पादनात भारताचा वाटा 24 टक्के आहे. यावरूनच तुम्ही भारतामध्ये किती मोठ्या प्रमाणात कापसाचे उत्पादन घेतले जाते याचा अंदाज लावू शकता.

भारतातील अनेक राज्यांमध्ये कापसाचे उत्पादन घेतले जाते. महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्ये मुख्यतः कापसाचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते.

या राज्यांचा कापूस उत्पादनामध्ये सुमारे 90 टक्के योगदान आहे. खरीप हंगामामध्ये कापूस पिकाची लागवड केली जाते. मात्र काही वेळा या हंगामामध्ये पाऊस पडत नाही त्यामुळे अनेकदा शेतकऱ्यांच्या कापूस पिकाला मोठा फटका बसत असतो. तसेच आता बदलत्या वातावरणामुळे कापूस पिकावर रोगाचे प्रमाण देखील वाढले आहे.

रोगाचे प्रमाण वाढल्याने शेतकऱ्यांचा कापूस पिकावरील खर्च देखील वाढला आहे. मात्र आता कापूस उत्पादकांसाठी चांगली बातमी आहे. CICR नागपूरच्या संस्थेने कापूस पिकाचे सर्वात हानिकारक कीटक गुलाबी बोंडअळी, पांढरी माशी आणि लीफ कर्ल विषाणू रोगापासून संरक्षण करण्यासाठी काही उपाय सुचवले आहेत.

गुलाबी बोंडअळीपासून संरक्षण करण्यासाठी या बिया लावा

कापूस पिकाची लागवड करत असताना त्याचे बियाणे उच्च दर्जाचे निवडा. गुलाबी बोंडअळीपासून संरक्षण करण्यासाठी कमी आणि मध्यम कालावधीच्या बीटी जाती आणि संकरित जातींची पेरणी करण्याचा सल्ला सीआयसीआर नागपूरने संस्थेने दिला आहे.

सीआयसीआर संस्थेकडून सांगण्यात आले आहे की कापूस लागवड हंगामध्येच करा हंगामापूर्वी कापसाची लागवड करू नका. हंगामामध्ये कापूस पिकाची लागवड करणे फायदेशीर ठरू शकते. यामुळे तुमच्या कापूस पिकावर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव कमी राहील किंवा होणार नाही. तसेच कापूस पीक लागवड केल्यानंतर त्याचे बारकाईने निरीक्षण करणे आवश्यक आहे.

गुलाबी बोंडअळी आणि शोषक किडींच्या प्रतिबंधासाठी शेतात हेक्टरी ५ फेरोमोन सापळे लावावेत असा देखील सल्ला देण्यात आला आहे. सीआयसीआर संस्थेच्या सल्ल्यानुसार कापूस पिकाचे निरीक्षण केले किंवा उपाय केले तर गुलाबी बोंडअळीपासून संरक्षण करण्यात मदत होईल.

फेरोमोन सापळ्याने गुलाबी बोंडअळी निरीक्षण करा

तुमच्या कापसाचे पीक ४५ दिवसांचे झाल्यानंतर त्यावर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसू लागतो. त्यामुळे तुम्ही आगोदरच तुमच्या कापूस पिकामध्ये फेरोमोन सापळे लावा. हेक्टरी ५ या प्रमाणात फेरोमोन सापळे लावा. तसेच तुमच्या पिकामध्ये गुलाबी बोंडअळी दिसल्यास ती नष्ट करा. तसेच गुलाबी बोंडअळीसाठी शिफारस केलेल्या औषधांची फवारणी करा.

पांढऱ्या माशीपासून संरक्षण करण्यासाठी कापूस पिकाच्या सीमेवर इतर पिके लावा

उत्तर भारतात कापूस पिकाचे सर्वाधिक नुकसान पांढऱ्या माशीमुळे होते. त्यामुळे नागपूर सीआयसीआर संस्थेकडून यावर देखील उपाय सुचवण्यात आले आहेत. तुम्ही ज्या शेतीमध्ये कापूस पिकाची लागवड केली आहे त्या पिकाच्या सर्व बाजूने मका पिकाची लागवड करा. ज्यामुळे पांढरी माशी तुमच्या कापसाच्या पिकामध्ये येणार नाही.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe