Buy Online Seeds papaya : घरबसल्या मागवा पपईच्या या प्रगत वाणाचे बियाणे! मिळेल भरपूर उत्पादन, जाणून घ्या सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Buy Online Seeds papaya : भारतात शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. तसेच देशातील शेतकरी आता परम्परेक शेती न करत आधुनिक पद्धतीने शेती करत आहेत. त्यामुळे त्यांना खर्च कमी आणि नफा अधिक मिळत आहे. शेतकरी प्रगत तंत्रज्ञानाने शेती करत असल्याने त्यांना चांगला फायदा होत आहे.

देशात फळबागांचे प्रमाण अधिक वाढत आहे. यामध्ये वेगवेगळ्या फळबागांची लागवड केली जात आहे. पपईची लागवड देखील मोठ्या प्रमाणात केली जात आहे. तसेच बाजारात पपईला मागणी देखील जास्त आहे.

पपई खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे होतात. तसेच पपईमध्ये अनेक औषधी गुणधर्म देखील आहेत. अनेकदा आजारी पडल्यानंतर डॉक्टर पपई खाण्याचा सल्ला देत असतात. पपईमधून शरीराला पुरेसे पाणी मिळते.

तसेच पपईपासून घरातील अनके सौंदर्यप्रसाधने बनवली जातात. जर तुम्ही पपईमधील गाभा काढून चेहऱ्यावर लावला तर तुमच्या चेहऱ्यावर चमक येते आणि तुमचा चेहरा स्वच्छ होतो.

रेड स्टार जातीच्या पपई वाणाला बाजारात प्रचंड मागणी आहे. त्यामुळे तुम्ही रेड स्टार जातीच्या पपईची लागवड करू शकता. पपईला बाजारात चांगली मागणी असल्याने भाव देखील चांगला मिळत आहे. सध्या पपई शेतीमधून अनेक शेतकरी लाखोंचा नफा कमावत आहेत.

पपई लागवड करत असताना जर सर्वात प्रथम शेतीची मशागत योग्य प्रकारे करणे आवश्यक आहे. तसेच त्यानंतर पपईच्या योग्य वाणाची निवड करणे गरजेचे आहे. कारण पपईच्या काही वाणांवर लगेच रोग येत असतात.

येथून पपईच्या बिया मागवा

नॅशनल सीड्स कॉर्पोरेशनकडून शेतकऱ्यांना ऑनलाईन पद्धतीने पपईच्या बिया उपलब्ध करून दिल्या जात आहेत. त्यामुळे शेतकरी घरबसल्या पपईच्या बिया मागवू शकतात. रेड स्टार जातीचे पपईचे बियाणे शेतकऱ्यांना ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून देण्यात आले आहे.

त्यामुळे ऑर्डर केल्यानंतर तुमच्या घरापर्यंत हे बियाणे पोहोच केले जाऊ शकते. खालील लिंकवर क्लिक करून तुम्ही पपईच्या प्रगत वाणाचे बियाणे ऑनलाईन मागवू शकता.

mystore.in/en/product/cro

पपईच्या या जातीचे वैशिष्ट्य काय आहेत

रेड स्टार जातीच्या पपईच्या वाणाची रोग प्रतिकार शक्ती जास्त आहे. त्यामुळे यावर जास्त कीटकनाशकांचा प्रादुर्भाव होत नसल्याने शेतकऱ्यांना कीटनाशकाची फवारणी देखील कमी कराव्या लागतात. या एका पपईच्या झाडापासून शेतकऱ्यांना 80 ते 110 किलोपर्यंत उत्पादन मिळू शकते. झाडाची उंची 7.5 फूट असते. तसेच या जातीच्या झाडाला ८ महिन्यांमध्ये फळ येते.

पपईची लागवड कशी करावी

पपई लागवडीसाठी उष्ण वातावरणाची गरज आहे. कारण थंडीच्या वातावरणामध्ये पपईच्या झाडाची वाढ होऊ शकत नाही. पपई 38°C ते 44°C या कमाल तापमानात वाढू शकते. तसेच पपई लागवडीसाठी असे शेत निवड ज्यामधून पाण्याचा निचरा सहज होतो.