साप म्हटले म्हणजे प्रत्येकाच्या अंगावर काटा उभा राहतो. कारण साप चावला म्हणजे व्यक्तीचा मृत्यू होतो ही पक्की भावना माणसाच्या मनामध्ये रुजलेली आहे. परंतु प्रत्येकच साप हा विषारी नसतो. कारण जितक्या सापांच्या जाती आहेत त्यापैकी बहुतांश जाती या बिनविषारी वर्गातील आहेत.
परंतु तरीदेखील सापांपासून स्वतःला वाचवणे किंवा सावध राहणे खूप गरजेचे आहे. आता पावसाळ्याचा कालावधी सुरू होत असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर साप बाहेर निघण्याच्या घटना घडतात व कधीकधी साप घरात देखील घुसतात. पावसामुळे बऱ्याचदा सापांची बिळे बुजली जातात व त्यामुळे त्यांचा निवारा नष्ट झाल्याने साप अडगळीच्या ठिकाणी
किंवा घरामध्ये जर अडगळ असेल तर अशा ठिकाणी लपून बसतात व चुकून जर अशा वेळेस आपला पाय सापावर पडला किंवा धक्का लागला तर सर्पदंश होण्याची दाट शक्यता असते. अशा प्रसंगी जर साप घराच्या आसपास दिसला किंवा घरात घुसला तर आपल्याला त्यावेळी नेमके काय करावे किंवा सापाला घराच्या बाहेर कसे काढावे?
हे आपल्याला उमजत नाही व मोठ्या प्रमाणावर गोंधळ उडतो. त्यामुळे आपण या लेखामध्ये अशा काही छोट्या गोष्टी किंवा टिप्स पाहणार आहोत की ज्यांच्या वापरामुळे साप घराच्या आसपास भटकणार देखील नाहीत किंवा घरात घुसला तर पटकन बाहेर निघेल.
साप घरात घुसला तर वापरा या ट्रिप्स व घरातून पळवा सापाला
1- गरम मसाला आणि चुन्याचा वापर– समजा तुमच्या घरामध्ये साप दिसला किंवा घराच्या आसपास साप तुम्हाला दिसला तर घाबरून न जाता त्याला घरापासून दूर किंवा घरातून बाहेर काढण्यासाठी गरम मसाला आणि चुन्याचा वापर करू शकतात. याकरिता तुम्हाला गरम मसाला आणि चुना एकमेकांमध्ये चांगला मिक्स करावा लागेल व याचा वापर करून तुम्ही सापाला घरातून किंवा घराच्या जवळून पळवून लावू शकतात.
2- लसूण आणि मिठाचा वापर– समजा घरामध्ये साप घुसला आहे किंवा घराच्या आजूबाजूला तुम्हाला साप दिसला तर घाबरून न जाता पटकन लसूण आणि मीठ घेऊन त्याची पेस्ट करावी व ही पेस्ट तुम्ही घरात ठेवली तर साप येत नाही आणि आला असेल तर तो लागलीच पळून जातो.
3- मातीचे तेल किंवा फिनाईलचा वापर– घरामध्ये साप घुसला तर मातीचे तेल तुम्ही शिंपडले तरी साप घरातून दूर पळतो किंवा घरामध्ये असलेले फिनाईलचा वापर देखील तुम्ही यासाठी करू शकतात. फिनाईल जर तुम्ही घरामध्ये शिंपडले तरी देखील घरात आलेला साप बाहेर पळून जातो.
5- घराजवळ लावा ही झाडे– समजा तुम्ही तुमच्या घराच्या जवळ किंवा घराच्या बगीच्यामध्ये किंवा कुंड्यांमध्ये लेमन ग्रास म्हणजेच गवती चहा, सर्पगंधा वनस्पती, स्नेक प्लांट, निवडुंग अर्थात कॅक्टस आणि तुळस इत्यादी रोपांची किंवा झाडांची लागवड केली तर यांच्या तीव्र वासामुळे साप घराच्या आजूबाजूला देखील भटकत नाहीत. ही झाडे घरात असली किंवा घरात ठेवली तरी देखील साप घरात घुसत नाही.
अशा पद्धतीने तुम्ही या छोट्या गोष्टींचा वापर करून सापाला पळवून लावू शकतात.