Government Scheme:- आयुष्य जगत असताना भविष्य हे पैशांच्या बाबतीत भक्कम किंवा मजबूत असावे याकरिता गुंतवणुकीला खूप महत्त्वाचे स्थान आहे. चांगला योजनांमध्ये किंवा चांगल्या पर्यायात गुंतवणूक केली तर कालांतराने चांगला पैसा आपल्याला मिळू शकतो.
गुंतवणुकीच्या दृष्टीने असा पर्याय शोधणे गरजेचे आहे की त्यामध्ये तुमची गुंतवणूक सुरक्षित राहील व मिळणारा परतावा देखील चांगला मिळेल. जर पाहिले तर अशा अनेक योजना आहेत की त्या गुंतवणुकीच्या दृष्टीतून खूप महत्त्वाच्या आणि फायदेशीर आहेत.
अशा योजनांमध्ये जर आपण काही योजना पाहिल्या तर त्या पेन्शन योजना म्हणून ओळखल्या जातात. म्हणजेच या प्रकारच्या योजनांमध्ये तुम्हाला ठराविक रक्कम प्रत्येक महिन्याला काही कालावधी करिता जमा करावी लागते व वयाच्या एका ठराविक टप्प्यानंतर व्यक्तीला पेन्शन सुरू होते
व अशाच प्रकारची योजना पाहिली तर एनपीएस अर्थात न्यू पेन्शन सिस्टम योजना खूप महत्त्वाचे आहे. या योजनेमध्ये जर पत्नीच्या नावाने खाते उघडले तर पत्नीला तिच्या वयाच्या साठाव्या वर्षी एकरकमी रक्कम तर मिळतेच परंतु प्रतीमहिना पेन्शन देखील सुरू होऊ शकते.
एनपीएस योजनेत पत्नीच्या नावे उघडा खाते आणि मिळवा पेन्शन
तुम्ही जर तुमच्या पत्नीच्या नावाने न्यू पेन्शन सिस्टम अर्थात एनपीएस योजनेमध्ये खाते उघडले तर या योजनेच्या माध्यमातून पत्नीला वयाच्या साठाव्या वर्षी एकरकमी रक्कम मिळते व प्रत्येक महिन्याला पेन्शनचा फायदा देखील मिळतो. एनपीएस योजनेचे किंवा या योजनेत खाते उघडण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुम्हाला प्रत्येक महिन्याला किती पेन्शन हवी आहे हे तुम्हाला स्वतः ठरवता येते.
एकंदरीत या योजनेत खाते उघडल्यानंतर उतारवयात पत्नीला पैशांची कमतरता भासत नाही व त्याकरिता कोणावर अवलंबून राहण्याची गरज देखील राहत नाही. या योजनेमध्ये तुम्ही तुमच्या पत्नीच्या नावाने खाते उघडून तुमच्या सोयीनुसार प्रत्येक महिन्याला किंवा वर्षाला पैसे जमा करू शकता.
या योजनेमध्ये तुम्ही तुमच्या पत्नीच्या नावाने एक हजार रुपयांपासून देखील एनपीएस खाते उघडून सुरुवात करू शकतात. एनपीएस खाते हे वयाच्या साठाव्या वर्षी मॅच्युअर होते. परंतु आता या योजनेतील नवीन नियमानुसार तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही वयाच्या 65 व्या वर्षापर्यंत एनपीएस खाते चालवू शकतात.
वयाच्या 30 व्या वर्षापासून प्रत्येक महिन्याला पाच हजार रुपये जमा केले तर…
समजा तुम्ही जर तुमच्या पत्नीचे वय 30 वर्ष आहे आणि त्या तीस वर्षाच्या वयामध्ये तुम्ही एनपीएस योजनेमध्ये खाते उघडले आणि प्रत्येक महिन्याला पाच हजार रुपये गुंतवायला सुरुवात केली व तुम्हाला या गुंतवणुकीवर वार्षिक दहा टक्के परतावा मिळाला तर वयाच्या साठाव्या वर्षी तुमच्या एनपीएस खात्यामध्ये एकूण 1.12 कोटी रुपये जमा होतील.
या रकमेमधून 45 लाख रुपये एकरकमी मिळतात व प्रत्येक महिन्याला सुमारे 45 हजार रुपये पेन्शन देखील मिळणे सुरू होते व ही पेन्शन आयुष्यभर मिळत राहते. म्हणजेच तीस वर्षाच्या कालावधीसाठी प्रत्येक महिन्याला पाच हजार रुपये गुंतवायला सुरुवात केली तर केलेल्या या गुंतवणुकीवर अंदाजे दहा टक्के परतावा मिळाला असं जरी गृहीत धरलं तरी तुमचा एकूण पेन्शन फंड एक कोटी अकरा लाख 98 हजार 471 रुपये इतका जमा होतो.
विशेष म्हणजे तुम्ही ही रक्कम पूर्ण होण्याआधी देखील काढू शकतात. दरम्यान ॲनुईटी प्लॅन खरेदी करण्याकरिता 44 लाख 79 हजार 388 रुपये रक्कम लागते व यावर तुम्ही ॲनुईटी रेट 8 टक्क्यांप्रमाणे अंदाजित रक्कम 67 लाख 19 हजार 83 रुपये होते व यातून तुम्हाला 44 हजार 793 रुपये मासिक पेन्शन सुरू होते.
आजपर्यंत जर या योजनेचा ट्रॅक रेकॉर्ड पाहिला तर अनेक फायनान्शिअल प्लॅनर्सच्या मते या योजनेने सुरुवातीपासूनच दहा ते अकरा टक्के वार्षिक परतावा दिला आहे.