Cotton Farming : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक गुड न्यूज समोर आली आहे. शास्त्रज्ञांनी आपल्या राज्यासाठी कापसाचे तसेच तिळाचे एक नवीन वाण विकसित केले आहे. जळगाव जिल्ह्यातील कृषी शास्त्रज्ञांनी उन्हाळी हंगामासाठी तिळाचे वाण विकसित केले असून फुले पूर्णा असे या जातीला नाव दिले आहे.
याव्यतिरिक्त कोरडवाहू जमिनीसाठी कापसाचे नवीन वाण शोधण्यात आल आहे. कापसाचे हे नवीन वाण महाराष्ट्रसह चार राज्यांसाठी अनुकूल राहणार आहे. कापसाच्या या नवीन वाणाला फुले सातपुडा असं नाव देण्यात आल आहे.
महाराष्ट्र ओडिशा गुजरात मध्य प्रदेश या चार राज्यांतील कोरडवाहू प्रदेशासाठी या वाणाची शिफारस करण्यात आली आहे. जळगाव जिल्ह्यातील मुरादाबाद शिवारात असलेल्या महात्मा फुले संशोधन केंद्रात तिळाचे हे पूर्णा वाण विकसित करण्यात आले आहे. तिळाचे हे उन्हाळी हंगामात लागवड करता येणारे वाण खानदेश तसेच मराठवाड्यासाठी उपयुक्त असल्याची माहिती संशोधकांनी यावेळी दिली आहे.
या वाणाची निर्मिती प्रमुख शास्त्रज्ञ डॉक्टर एस एस पाटील, डॉक्टर एस डी राजपूत, तुषार आर पाटील, डॉक्टर गिरीश चौधरी, यांनी केली आहे. आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की उन्हाळी हंगामासाठी महाराष्ट्रात आतापर्यंत उन्हाळी हंगामात लावता येणारे एकही तिळीचे वाण तयार झालेले नव्हते.
म्हणून शास्त्रज्ञांनी हे तिळाचे नवीन वाण विकसित केले आहे. जेलखी 408-2 असं या वाणाच शास्त्रीय नाव असून वान पूर्णपणे विकसित झाल्यानंतर याला पूर्णा असे नाव देण्यात आले आहे. हे वाण खानदेश आणि मराठवाड्यासाठी शिफारशीत करण्यात आले आहे.
तिळाचे हे नवीन वाण 90 दिवसात परिपक्व होणार आहे. शास्त्रज्ञांच्या मते उन्हाळी हंगामात या वाणाने सर्वाधिक उत्पादन दिले आहे. इतर प्रचलित वाणापेक्षा हे वाण खानदेश आणि मराठवाड्यासाठी सरस ठरणार आहे.
निश्चितच कापसाचे आणि तिळाचे नवीन वाण विकसित झाले असल्याने शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे. कोरडवाहू भागासाठी शिफारशीत करण्यात आलेले नवीन फुले सातपुडा हे वाण कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी अधिक फायद्याचे राहणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.