Dairy Farming Tips : भारताच्या ग्रामीण भागात शेतकरी (Farmer) तसेच अल्पभूधारक शेतकरी बांधव आणि भूमिहीन शेतमजुर मोठ्या प्रमाणात पशुपालन (Animal Husbandry) करत असतात. आपल्या देशात पशुपालन मुख्यता दुग्ध उत्पादनासाठी (Dairy Production) केले जाते.
मित्रांनो जाणकार लोक सांगतात की, आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेत विशेषतः ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेत पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. मित्रांनो हाती आलेल्या एका आकडेवारीनुसार अमेरिकेनंतर दुग्ध उत्पादनात भारताचा दुसरा क्रमांक आहे.
अशा परिस्थितीत भारतात दुग्धव्यवसाय (Dairy Farming) किती मोठ्या प्रमाणात केला जातो याचा आपल्याला अंदाज घेता येईल. एका ऑफिशियल आकडेवारीनुसार आपल्या देशात 53 कोटींहून अधिक दुभती जनावरे आहेत.
अशा परिस्थितीत दुभत्या जनावरांच्या उदरनिर्वाहासाठी किंवा त्यांच्यासाठी वेळेवर चार्याची व्यवस्था (animal care) करणे हे अत्यंत आव्हानात्मक काम आहे. अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला एका अशा चाऱ्याविषयी माहिती देणार आहोत, ज्यामुळे दुभत्या जनावरांचे दूध उत्पादन वाढणार आहे.
शिवाय चार्याची बनत चाललेली बिकट परिस्थिती देखील निवारण्यात मदत होणार आहे. मित्रांनो जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार कॅक्टस पिअर या निवडुंग वनस्पतीचा पाला पशुखाद्य म्हणून वापरल्यास जनावरांचे दूध उत्पादन क्षमता वाढते. अशा परिस्थितीत या चाऱ्याची लागवड पशुपालक शेतकरी बांधवांसाठी (Livestock Farmer) फायद्याची ठरणार आहे. यामुळे शेतकरी बांधवांना कमी खर्चात चाऱ्याची उपलब्धता होणार आहे.
आम्ही तुमच्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की, कॅक्टस नाशपाती केवळ प्राण्यांचे आरोग्य चांगले ठेवत नाही, तर हा चारा पशुना खाऊ घातल्यास चांगल्या दर्जाचे दूध देखील मिळतं असते. कॅक्टस नाशपातीची लागवड करणे खूप सोपे आहे. शेतकऱ्यांना हवे असल्यास ते शेतातील बांधावरही याची लागवड करू शकणार आहेत. त्यामुळे वन्य प्राण्यांपासून पिकांचेही संरक्षण होणार असून, जनावरांसाठी निवडुंगाचा ताजा चाराही तयार होईल.
कॅक्टस नाशपाती लागवडीसाठी उपयुक्त हवामान
देशातील पशुधनाची वाढती लोकसंख्या आणि पशुखाद्य संकट असताना कृषी शास्त्रज्ञ कॅक्टस नाशपातीची लागवड करण्याची शिफारस करतात. जरी ही एक वाळवंटी वनस्पती असली तरी देखील याची लागवड आता मैदानी प्रदेशात केली जाऊ लागली आहे. मैदानी प्रदेशातील उष्ण आणि नापीक जमिनीवर देखील याची लागवड करता येते.
ही निवडुंग प्रजातीची वनस्पती आहे, जी अगदी कमी पाण्यात चांगली विकसित होते. जेव्हा ते 5 ते 7 मीटर पर्यंत वाढते तेव्हा त्याची कापणी केली जाते. कमी पाण्यात आणि उष्ण प्रदेशात वाढणारा हा चारा पाण्याची कमतरता आणि उष्णतेपासून जनावरांचे संरक्षण करतो.
कॅक्टस नाशपातीसाठी उपयुक्त शेतीजमीन कोणती बर
या पिकाची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे कॅक्टस नाशपाती ओसाड किंवा नापीक जमिनीवरही लावता येते आणि त्यापासून चांगले उत्पादन घेता येते. ज्या जमिनीचा उपयोग होत नाही ती जनावरांसाठी निवडुंग चारा लावण्यासाठी वापरली जाऊ शकते.
टिश्यू कल्चर पद्धतीने त्याची लागवड केली जात असली, तरी कमी प्रमाणात पेरणीसाठी कंदांचा वापर करता येतो. कोरडी, भारी आणि वालुकामय माती व्यतिरिक्त, खारट जमीन जी लागवडीसाठी अयोग्य बनली आहे, ती जमीन देखील या झाडाच्या लागवडीसाठी योग्य असून निवडुंग नाशपातीचे अशा जमिनीत देखील बंपर उत्पादन घेता येऊ शकते.
कॅक्टसचे उत्पादन
निवडुंग नाशपातीचे पीक पेरणीनंतर पाच ते सहा महिन्यांत तयार होते. ही वनस्पती 1 मीटर उंचीपर्यंत वाढली की तेव्हा देखील ते काढले जाऊ शकते. या ठिकाणी लक्षात ठेवा की दुभत्या जनावरांनी ही वनस्पती थेट खाऊ घालू नये, कारण त्यावर अनेक काटे असतात, त्यामुळे कापणी व साफसफाई केल्यानंतरच जनावरांना खायला द्यावे. शेतकर्यांना हवे असल्यास, कॅक्टस नाशपाती गहू हरभरा किंवा इतर कोरड्या पेंढ्यामध्ये मिसळून देखील जनावरांना पौष्टिक पशुखाद्य देऊ शकतात.
प्राण्यांसाठी आहे वरदान
कॅक्टस पिअरमध्ये आम्ल, प्रथिने, फायबर, फॉस्फरस, पोटॅशियम, मॅग्नेशियम, सोडियम, जस्त, तांबे आणि लोह आढळतात, ज्यामुळे प्राण्यांची पचनक्रिया चांगली राहते. याच कारणामुळे हे रुमिनंट प्राण्यांचे आवडते पशुखाद्य बनले आहे. लक्षात ठेवा की, नाशपाती निवडुंग जनावरांना खायला देण्यासाठी जनावरांना थेट शेतात सोडू नका, तर या वनस्पतीची चांगली स्वच्छता केल्यानंतर त्यांना खायला द्या.