Sugarcane Farming : यंदाच्या ऊस गळीत हंगामावर दुष्काळ, पाणी व ऊस टंचाईचे संकट आहे. अशाही स्थितीत अशोक साखर कारखान्याचे चेअरमन माजी आ. भानुदास मुरकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सभासद, शेतकरी,
अधिकारी व कर्मचारी यांचे सहकार्याने हंगाम यशस्वीरित्या पार पडेल, असा विश्वास कारखान्याचे व्हा. चेअरमन पुंजाहरी शिंदे यांनी व्यक्त केला.
अशोक कारखान्याचा सन २०२३ – २४ ऊस गळीत हंगामाचा बॉयलर व नवीन डिस्टीलरी प्रकल्पाचा २२ टी. पी. एच. क्षमतेचा इन्सीरेशन बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभ व्हा. चेअरमन पुंजाहरी शिंदे यांचे अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी संचालक अमोल कोकणे व प्रतिक्षा कोकणे तसेच डिस्टीलरी इनचार्ज बाबासाहेब हापसे व आशाताई हापसे या दाम्पत्यांचे हस्ते पूजन करण्यात आले.
कार्यकारी संचालक संतोष देवकर प्रास्तविकात म्हणाले की, ऊस गाळप सुरु करण्याच्या दृष्टीने आवश्यक ती तयारी कारखान्याने पूर्ण केलेली आहे. ऊस तोडणी वाहतूक व ऊस तोड मजुरांची यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. यावेळी अशोक सहकारी बँकेचे चेअरमन अॅड. सुभाष चौधरी व कारखान्याचे माजी संचालक काशिनाथ गोराणे यांचे भाषण झाले.
कार्यक्रमास कोंडीराम उंडे, हिम्मतराव धुमाळ, ज्ञानदेव साळुंके, भाऊसाहेब उंडे, सोपानराव राऊत, भाऊसाहेब कहांडळ, सिद्धार्थ मुरकुटे, मंजुश्री मुरकुटे, सुनीता गायकवाड, किशोर बनसोडे, बाबासाहेब आदिक, आदिनाथ झुराळे,
यशवंत बनकर, ज्ञानेश्वर काळे, प्रफुल्ल दांगट, योगेश विटनोर, दत्तात्रय नाईक, नानासाहेब मांढरे, अच्युत बडाख, अशोक पारखे, सखाराम कांगुणे, अॅड. डी. आर. पटारे, भागवत पवार, भास्कर बंगाळ,
रामदास पटारे, राधाकिसन उंडे, शिवाजी मुठे, संजय लबडे, नारायण बडाख, भाऊसाहेब बनसोडे, बबन आसने, आबासाहेब कोकणे, चंद्रकांत कोकणे, श्रीराम उंडे, अंजाबापू शिंदे व संपत देसाई, प्रियंका शेरकर,
विजया शिंदे, शालिनी कोलते, सुवर्णा कोकणे, सुरेखा शिंदे, रत्नाबाई पवार, अर्चना पवार, रंजना उंडे, सुवर्णा कोकणे, कार्यकारी संचालक संतोष देवकर, अधिकारी विक्रांत भागवत,
नारायण चौधरी, सुनील चोळके, बाळासाहेब उंडे, भगवान निकम, विजयकुमार धुमाळ, कृष्णकांत सोनटक्के, अनिल कोकणे, भाऊसाहेब दोंड, ज्ञानेश्वर सांगळे, अण्णासाहेब वाकडे, बाळासाहेब राऊत, रमेश आढाव, विलास लबडे आदींसह सभासद, शेतकरी, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.