अहमदनगर ब्रेकिंग : अखेर ‘तो’ बिबट्या जेरबंद !पाच तासाच्या रेस्क्यू ऑपरेशनला यश

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar breaking : कोपरगाव शहरात गेल्या दोन तीन दिवसापासून दिमाखात दर्शन देणारा बिबट्याला अखेर मंगळवारी (१७) दुपारी पाच तासांच्या रेस्क्यू ऑपरेशन नंतर वनविभागाने बिबट्या मादीला पिंजऱ्यात जेरबंद केले. बिबट्याच्या वावरात दोनजण किरकोळ जखमी झाले होते.

कोपरगावात मुक्त संचार करणाऱ्या बिबट्याला पकडण्यासाठी गेल्या दोन ते तीन दिवसांपूर्वी ठिकठिकाणी जाळ्या व पिंजरा लावण्यात आला होता. परंतु, तो हुलकावणी देत होता. अखेरीस काल मंगळवारी दुपारच्या सुमारास वनविभागाच्या पाच तासाच्या अथक प्रयत्नानंतर या बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले.

रविवारी तीन ते चार वाजेच्या सुमारास या बिबट्याने संजयनगर व कोपरे मार्ग परिसरात प्रथम दर्शन दिले. गेल्या दोन-तीन दिवसांपासून सदर बिबट्या याच परिसरात वास्तव्य करून होता. परंतु रात्र होताच दहा अकरा वाजेच्या सुमारास तो शहरातील भरवस्तीत एसटी बस आगाराच्या बाजूने मुक्त संचार करीत होता.

अनेक लोकांनी आरडाओरडा केला. गाड्याचे लाईट चालू केले. परंतु त्याचा बिबट्यावर कोणताही परिणाम होत नव्हता. काल मंगळवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास सदर बिबट्या एचडीएफसी बँकच्या समोरील झुडपे असलेल्या मोकळ्या कंपाऊंडमध्ये बसला असल्याची लोकांच्या लक्षात आले,

ही घटना लक्षात आल्यावर त्यांनी तातडीने वन विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली. वनविभागाचे पथक त्या ठिकाणी आले. तसेच त्यांनी संगमनेर येथील अति शीघ्र कृती दलालाही पाचारण केले होते.

आसपास चाललेल्या या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये प्रतिभा सोनवणे, पी. एस. सोनावणे, वनपरिक्षेत्र अधिकारी बी. एस. गाढे, फोरेस्टर श्रद्धा पडवळ, वनरक्षक डी. एन. जाधव वनमजूर सागर इंदरखे, प्रदीप इंदारखे, समीर सय्यद, प्रमोद गिरी,

सर्व कोपरगाव, वनविभाग संगमनेर रॅपिड रिस्पॉन्स टीमचे संतोष एम. पारधी, श्रीकिसन सातपुते, दीपक शिंदे, सुहास उपासणी, हरीचंद्र जोजार, विठ्ठलसिंग जरवलं, दत्तात्रय परबत, रामभाऊ वर्षे, रवींद्र भोगे, वनपरिक्षेत्र अधिकारी व त्यांची टीम नगर यांनी सहभाग घेतला होता.

दरम्यान, हे रेस्क्यू ऑपरेशन सुरू असताना आमदार आशुतोष काळे, तहसीलदार संदीप भोसले, पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली.

पिंजऱ्यात अडकलेल्या बिबट्याला ताब्यात घेतले. ही मादी बिबट्या सुमारे चार ते पाच वर्षे वयाची असून वरिष्ठांच्या निर्देशानुसार तिला सुरक्षितपणे नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार आहे. दोन-तीन दिवसांच्या घटनेत दोन नागरिक किरकोळ जखमी झाले.

बिबट्याच्या हल्ल्यामध्ये शहरातील जखमी झालेल्या नागरिकांना जास्तीत जास्त मदत कशी देता येईल. यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. – आमदार आ. आशुतोष काळे

सुदैवाने बिबट्यामुळे शहरात कुठलीही जीवित हानी झालेली नाही. परंतु वेळीच बिबट्याचा बंदोबस्त केला गेला नाही, तर अनुचित घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. तेंव्हा जिल्हाधिकाऱ्यांनी व तहसीलदारांनी वन विभागाला त्वरित बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद करून नैसर्गिक अधिवासात सोडण्याचे आदेश द्यावेत. – स्नेहलता कोल्हे, माजी आमदार