आज (४ मे) गुगलने हमीदा बानोच्या स्मरणार्थ डूडल बनवले आहे. आज अनेकांना प्रश्न पडला असेल की हमीदा बानो कोण होत्या. तर हमीदा बानो या भारताच्या पहिल्या महिला कुस्तीपटू होत्या.
1954 मध्ये आजच्याच दिवशी म्हणजे 4 मे ला कुस्तीच्या सामन्यात केवळ 1 मिनिट 34 सेकंदात विजय मिळवून हमीदा बानो यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळाली. या सामन्यात त्यांनी तत्कालीन प्रसिद्ध पैलवान बाबा पहेलवानचा पराभव केला होता.
असे म्हटले जाते की या पराभवानंतर बाबा पहेलवान यांनी कुस्तीतून सन्यास घेतला होता. गुगलने आपल्या डूडल डिस्क्रिप्शन असं लिहिलंय की, हमिदा बानो या त्यांच्या काळातील एक अग्रणी होत्या. त्यांचा बेडरपणा, धैर्य भारतासह जगभरातील लोक लक्षात ठेवतील.
हा दिवस त्यांच्या उत्कृष्ट खेळासोबतच स्वतःशी प्रामाणिक राहण्याच्या त्यांच्या वृत्तीसाठी साजरा केला जाईल.
हमीदा बानो यांचा जन्म 1900 च्या दशकाच्या सुरुवातीला उत्तर प्रदेशातील अलीगढ येथे कुस्तीपटूंच्या कुटुंबात झाला. त्या कुस्तीचा सराव करतच मोठ्या झाल्या वं त्यांनी त्यावेळी 1940 आणि 1950 च्या दशकात तिच्या कारकिर्दीत 300 हून अधिक स्पर्धा जिंकल्या असे सांगितले जाते.
लग्नासाठी देखील ठेवली होती कुस्तीची अट
हमीदा बानो यांनी त्यांच्या लग्नसाठी देखील कुस्तीची अट ठेवली होती. 1940 आणि 1950 च्या दशकात त्यांनी याबाबत आव्हानच दिले होते की, जो कोणी तिला कुस्तीमध्ये पराभूत करेल त्याच्याशी ती लग्न करेल.
हमीदा बानो 1937 मध्ये सर्वप्रथम एका पुरुषासोबत कुस्ती खेळली. लाहोरच्या फिरोज खान विरुद्ध हा सामना झाला व तिला या सामान्याने खूप ओळख मिळवून दिली. हमीदाने फिरोज खानला या सामन्यात हरवले होते.
या सामन्यानंतर हमीदाने कोलकाता येथील खरग सिंग याचा व आणखी एका कुस्तीपटूचा पराभव केला. या दोघांनी हमीदाला त्याच्याशी लग्न करण्याचे आव्हान दिले होते. अशा पद्धतीने हमीदा बानो यांनी आपल्या खेळातून महिलांचे नाव त्याकाळी रोशन केले.