Top 4 Affordable cars : होंडाच्या ‘या’ कार्सवर कपंनी देत आहे 1 लाख रुपयांपर्यंत सूट, आजच आणा घरी!

Content Team
Published:
Top 4 Affordable cars

Top 4 Affordable cars : अक्षर तृतीयेला जर तुम्ही नवीन कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर Honda India ने नुकतेच आपल्या चार गाड्यांवर बंपर सूट दिली आहे. कंपनीच्या ऑफरमध्ये अमेझ, सिटी, सिटी हायब्रिड आणि काही दिवसांपूर्वी लॉन्च करण्यात आलेल्या एलिव्हेटचा समावेश आहे. कपंनी या कार्सवर लाखो रुपयांपर्यंत सूट देत आहे.

Honda City

टॉप-स्पेक Honda City ZX Rs 88,000 पर्यंतच्या फायद्यांसह उपलब्ध आहे. तर त्याच्या खालच्या वेरिएंटमध्ये 78,000 रुपयांचा फायदा मिळेल. तर Honda V (MT आणि CVT) आणि VX (केवळ MT) वर 58,000 रुपयांची सूट आहे. तसेच, 1.15 लाख रुपयांचा सर्वात मोठा फायदा मागील वर्षी लाँच केलेल्या Honda City च्या प्रकारावर मिळेल.

कपंनीच्या Honda City मध्ये LED हाय-माउंट स्टॉप लॅम्प आणि इतर कॉस्मेटिक बदलांसह अनेक वैशिष्ट्ये मिळतील. Honda City मध्ये 1.5-लिटर, चार-सिलेंडर पेट्रोल इंजिन जे 121 hp आणि 145 Nm पॉवर जनरेट करते. हा प्रकार 6-स्पीड मॅन्युअल किंवा CVT गिअरबॉक्ससह येतो. हे मॉडेल Hyundai Verna, Volkswagen Virtus, Skoda Slavia आणि Maruti Suzuki Ciaz सारख्या मध्यम श्रेणीतील सेडानशी स्पर्धा करत आहे.

Honda Amaze

मे महिन्यासाठी, बेस-स्पेक Honda Amaze E वेरिएंट 56,000 रुपयांपर्यंतच्या फायद्यांसह उपलब्ध आहे, तर S आणि VX प्रकारांमध्ये 66,000 रुपयांपर्यंतचे फायदे मिळतील. ऑक्टोबर 2023 मध्ये लॉन्च झालेल्या Honda Amaze Elite प्रकाराच्या न विकल्या गेलेल्या स्टॉकवर 96,000 ची सर्वाधिक सूट आहे. यात ट्रंक स्पॉयलर, डेकल्स आणि टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम यासारख्या विशेष वैशिष्ट्यांचा समावेश आहे.

Honda Amaze 90hp, 110Nm, 1.2-लिटर, चार-सिलेंडर, पेट्रोल इंजिनद्वारे समर्थित आहे, जे 5-स्पीड मॅन्युअल किंवा CVT गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. Amaze ने GNCAP मध्ये भारतासाठी सुरक्षा कारमध्ये 2 स्टार मिळवले आहेत. कंपनी नवीन Honda Amaze वर देखील काम करत आहे, जी या वर्षीच्या सणासुदीच्या हंगामात लॉन्च केली जाईल.

Honda City Hybrid

मे 2024 मध्ये Honda City Hybrid च्या फक्त V प्रकारावर 65,000 रुपयांपर्यंत सूट आहे. सेडानमध्ये 1.5-लिटर पेट्रोल इंजिन आणि दोन इलेक्ट्रिक मोटर आहेत, जे दोन्ही ई-CVT गिअरबॉक्सशी जोडलेले आहेत.

Honda Elevate SUV

मध्यम श्रेणीच्या एसयूव्ही श्रेणीतील होंडाची एंट्री लेव्हल एलिव्हेट या महिन्यात अनेक आकर्षक सवलतींसह ऑफर केली जात आहे. V वेरिएंटवर 55,000 रुपयांची सूट मिळेल तर इतर व्हेरिएंटवर 45,000 रुपयांची सूट मिळेल. अलीकडेच अपडेट केलेल्या एलिव्हेटच्या टॉप-स्पेक ZX प्रकारावर 25,000 रुपयांपर्यंत सूट आहे. Honda Elevate मध्ये सिटी प्रमाणे 121hp, 1.5-लिटर, चार-सिलेंडर पेट्रोल इंजिन आहे, जे 6-स्पीड मॅन्युअल किंवा पर्यायी CVT ऑटोमॅटिकसह उपलब्ध असेल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe