Fixed Deposit : सध्या बाजरात गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत, तरीही मुदत ठेव अजूनही लोकांची पहिली पसंत आहे. कारण येथील गुंतवणूक ही सर्वात सुरक्षित गुंतवणूक मानली जाते. तसेच एफडीमध्ये तुम्ही तुमच्या सोयीनुसार गुंतवणूक करू शकता.
येथे तुम्हाला गॅरंटीड रिटर्न मिळण्यासोबतच सुरक्षितता देखील मिळते. अशातच जर तुम्ही देखील FD मध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला 3 वर्षांच्या FD स्कीम्सबद्दल सांगणार आहोत, जिथे तुम्ही वेगवगेळ्या बँकेत गुंतवणूक करून उत्तम परतावा मिळवू शकता.
जर तुम्ही SBI मध्ये 3 वर्षांसाठी FD केल्यास, तुम्हाला 7.00 टक्के दराने व्याज मिळेल. तर पंजाब नॅशनल बँकेत त्याच कालावधीसाठी FD मध्ये 7.00 टक्के दराने व्याज मिळेल. याशिवाय, एचडीएफसी बँकेत 3 वर्षांची एफडी केल्यास केवळ 7.00 टक्के दराने व्याज दिले जाईल. तुम्ही IDFC बँकेत 3 वर्षांसाठी FD केल्यास, तुम्हाला 7.25 टक्के दराने व्याज दिले जाईल. तर RBL बँकेत 3 वर्षांची FD केल्यास, तुम्हाला 7.70 टक्के दराने व्याज मिळेल. तर ज्येष्ठ नागरिकांना 50 टक्के अधिक व्याज मिळेल.
अशातच जर तुम्ही या कालावधीसाठी 1,00,000 ची FD केल्यास तुम्हाला किती फायदा होईल हे देखील जाणून घ्या. जर तुम्ही SBI बँकेत 3 वर्षांसाठी 7 टक्के व्याजदराने 1 लाख रुपयांची FD केल्यास तुम्हाला 1,23,144 रुपये मिळतील. तर PNB बँकेत 3 वर्षांसाठी 7 टक्के व्याजदरासह 1 लाख रुपयांची FD केल्यास तुम्हाला 1,23,144 रुपये मिळतील. आणि एचडीएफसी बँकेत 7 टक्के व्याजदरासह 3 वर्षांसाठी 1 लाख रुपयांची एफडी केल्यास तुम्हाला 1,23,144 रुपये मिळतील.
तर आयडीएफसी बँकेत 7.25 टक्के व्याजदरासह 3 वर्षांसाठी 1 लाख रुपयांची एफडी केल्यास तुम्हाला 1,24,055 रुपये मिळतील. आणि RBL बँकेत 3 वर्षांसाठी 7.70 टक्के व्याजदराने 1 लाख रुपयांची FD केल्यास तुम्हाला 1,25,710 रुपये मिळतील.