कांद्याचे भाव कोसळल्याने शेतकऱ्यांत नाराजी !

Ahmednagarlive24 office
Published:
onion prices

केंद्र सरकारने लागू केलेल्या कांदा निर्यात बंदीचा कांद्याच्या भावावर परिणाम होऊन भाव उतरल्याने कांदा उत्पादकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. राहुरी येथील मुख्य आवारात कांदा मोंढ्यावर लिलावास आलेल्या लाल कांद्यास २०० ते ३८०० व गावरान कांद्यास २०० ते ४१०० रुपये भाव मिळाला.

लाल कांद्याची ३००१ व गावरान कांद्याच्या ५१९२ गोण्यांची आवक झाली. लिलावास आलेल्या कांद्याचे प्रतवारीनुसार मिळालेले भाव पुढीलप्रमाणे – लाल कांदा : एक नंबर कांद्यास ३००१ ते ३५०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला,

तर दोन नंबर कांद्यास २००१ ते ३०००, तीन नंबर २०० ते २००० गोल्टी ५०० ते ३००० व काही अपवादत्मक गोण्या ३५०० ते ३८०० रुपये क्विंटल भावाने विकल्या गेल्या.

गावरान कांद्याचे भाव पुढीलप्रमाणे- एक नंबर कांद्यास ३००१ ते ३८०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला तर दोन नंबर कांद्यास २००१ ते ३०००, तीन नंबर २०० ते २०००, गोल्टी ५०० ते ३२०० व काही अपवादत्मक गोण्या ३८०० ते ४१०० रुपये क्विंटलने विकल्या गेल्या.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe