Fish Farming: ‘या’ नवीन टेक्निकने मत्स्यशेती करा, लाखोंची नाही तर करोडोची कमाई होणारं; वाचा सविस्तर

Ajay Patil
Published:

Fish Farming: भारतासह इतर देशांमध्ये मत्स्यपालनाचा व्यवसाय (Aquaculture) मोठ्या प्रमाणात केला जातो. आपल्या राज्यातील शेतकरी बांधव (Farming) शेतीपूरक व्यवसाय मत्स्य पालन (Fisheries) करत असतात. जर तुम्हाला देखील स्वयंरोजगाराचा अवलंब करायचा असेल तर मत्स्यपालन व्यवसाय (Fish Farming Business) करून तुम्ही भरपूर उत्पन्न कमवू शकतात.

मात्र मत्स्य पालन व्यवसाय करण्यापूर्वी, मासे पालन करण्याच्या विविध पद्धतींबद्दल जाणून घेणे आवश्यक आहे. मत्स्यपालनाचा एक आणि पारंपारिक मार्ग म्हणजे तलाव बांधून त्यात मासे ठेवणे. परंतु मत्स्यपालनाचे बायोफ्लॉक तंत्रज्ञान (Biofloc Technique) अवलंबून तुम्ही हा व्यवसाय अधिक सहजपणे करू शकता.

बायोफ्लॉक तंत्रात तुम्ही तलावाशिवाय माशांचे संगोपन करु शकतात. या सुधारित तंत्रज्ञानात मत्स्यपालन टाकी किंवा टॅंक मध्ये केले जाते. बायोफ्लॉक तंत्रज्ञान ही मत्स्यशेतीची आधुनिक आणि वैज्ञानिक पद्धत आहे. यामध्ये टँक पद्धतीचा अवलंब करून त्यातील बॅक्टेरियाच्या मदतीने माशांची विष्ठा आणि अतिरिक्त पदार्थ प्रथिन पेशींमध्ये रूपांतरित केले जातात. ज्याचा वापर टाकीच्या आत असलेले मासे खाण्यासाठी करत असतात.

यामुळे माशांसाठी लागणाऱ्या फीडवर कमी खर्च होतो. या तंत्रात तुम्ही कमी पाण्यात आणि कमी खर्चात जास्तीत जास्त मासे तयार करू शकता. याचा परिणाम म्हणून तुम्ही कमी खर्चात जास्त नफा मिळवू शकता.  बायोफ्लॉक तंत्रज्ञानामध्ये माशांच्या अनेक जाती एकाच वेळी टाकीच्या आत पाळल्या जाऊ शकतात.

बायोफ्लॉक तंत्रज्ञानासह मत्स्यशेतीबद्दल जाणून घ्या

बायोफ्लॉक तंत्रज्ञान तलाव तंत्रज्ञानापेक्षा स्वस्त आणि अधिक फायदेशीर आहे. तलाव तंत्रात जेथे मोठी जमीन आणि कच्चा तलाव आवश्यक आहे. मात्र बायोफ्लॉक तंत्रज्ञानात पाण्याची टाकी बनवून मत्स्यपालन करता येते. बायोफ्लॉक तंत्रज्ञानासाठी सिमेंट टाकी/ ताडपत्री टाकी, वायुवीजन प्रणाली, वीज उपलब्धता, प्रोबायोटिक्स, मत्स्यबीज आवश्यक आहे.

तलावामध्ये सघन मत्स्यपालन होऊ शकत नाही कारण तलावातील अमोनिया वाढतो जेव्हा जास्त मासे मिसळले जातात आणि तलाव घाण झाल्यास मासे मरतात. मासे साप व बगळे खात असल्याने मच्छीमारांना तलावावर नेहमीच लक्ष ठेवावे लागते. बायोफ्लॉक असलेल्या टॅंकवर शेड तयार केले जाते. यामुळे मासेही मरत नाहीत आणि शेतकऱ्याचेही नुकसान होत नाही.

एक हेक्‍टर तलावात दोन इंच बोअरद्वारे नेहमी पाणीपुरवठा केला जातो, तर बायोफ्लॉक पद्धतीने चार महिन्यांतून एकदाच पाणी भरले जाते. जेव्हा घाण साचते तेव्हा फक्त दहा टक्के पाणी काढून स्वच्छ ठेवता येते. टाकीतील पाणी शेतात सोडता येते.

Biofloc तंत्रज्ञानात टाकी तयार करण्यासाठी किती खर्च येऊ शकतो ते जाणून घ्या

बायो फ्लॉक टेक्निकमध्ये टाकी बनवण्यासाठी किती खर्च येईल हे टाकीच्या आकारावर अवलंबून असते. टाकीचा आकार जितका मोठा असेल तितकी माशांची वाढ चांगली आणि उत्पन्नही चांगले. या उद्योगाशी संबंधित लोकांच्या म्हणण्यानुसार, एक टाकी बनवण्यासाठी 28 ते 30 हजार रुपये खर्च येतो, ज्यामध्ये उपकरणे आणि मजुरीचे शुल्क समाविष्ट आहे. टाकीचा आकार जसजसा वाढत जाईल तसतसा खर्च वाढत जाईल.

या तंत्रज्ञानामुळे 10 हजार लिटर क्षमतेची टाकी (एका वेळी लागणारा खर्च 32 हजार रुपये, 5 वर्षांसाठी) सुमारे सहा महिन्यांत 3.4 क्विंटल मासे (किंमत 40 हजार) तयार करू शकतात. सहा महिने मासे पालनाचा खर्च 24 हजार रुपये अपेक्षित असतो. म्हणजेचं अतिरिक्त उत्पन्न यातून मिळवता येते.

अशा प्रकारे वार्षिक निव्वळ नफा एका टाकीतून 25 हजार रुपये मिळू शकतात. महागड्या माशांचे उत्पादन घेतल्यास हा नफा साडेचार पटीने जास्त होऊ शकतो. बायोफ्लॉक तंत्रज्ञानाच्या मदतीने तुम्ही टँकमध्ये पंगासिअस, तिलापिया, देशी मांगूर, सिंघी, कोई कार्प, पाबडा आणि कॉमन कार्प यांसारख्या जातींचे मासे सहजपणे पाळू शकता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe