Groundnut Farming Tips : भारतात तेलबीया पिकांची शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. यामध्ये सोयाबीन, जवस, भुईमूग यांसारख्या पिकांचा समावेश आहे. भुईमूग हे आपल्या राज्यात उत्पादित केल जाणार एक मुख्य तेलबिया पीक म्हणून ओळखल जात.
या पिकाची शेती राज्यातील बहुतांशी जिल्ह्यात पाहायला मिळते. खरीप आणि उन्हाळी हंगामात आपल्याकडे प्रामुख्याने या पिकाची पेरणी केली जाते. उन्हाळी हंगामात जानेवारीपासून ते फेब्रुवारी पर्यंत या पिकाची पेरणी करण्याचा सल्ला दिला जातो.
ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा
शेतकरी बांधव डिसेंबर मध्ये या पिकाची पेरणी करतात मात्र उत्पादनात यामुळे घट होऊ शकते असा दावा केला जातो. निश्चितचं शेतकरी बांधवांनी योग्य वेळेवर या पिकाची पेरणी केल्यास त्यांना अधिक उत्पादन मिळणार आहे. दरम्यान आज आपण भुईमूग पिकाचे कशा पद्धतीने उत्पादन वाढवले पाहिजे याविषयी थोडक्यात जाणून घेणार आहोत.
जाणकार लोकांनी असा दावा केला आहे की भुईमुगाच्या पिकातून अधिक उत्पादन मिळवण्यासाठी शेतकरी बांधवांनी जीप्समचा वापर केला पाहिजे. जिप्समचा वापर केल्यास एकरी चार क्विंटल पर्यंतचे उत्पादन वाढू शकत असा दावा केला जातो. एका मीडिया रिपोर्ट मध्ये सांगितल्याप्रमाणे, तेलंगणा मधील काही शेतकऱ्यांनी भुईमूग पिकात जिप्समचा वापर करून उत्पादनातं वाढ घडवून आणली आहे.
या शेतकऱ्यांना पूर्वी एका एकरातून सात ते आठ क्विंटल पर्यंतचे उत्पादन मिळत होतं, आता त्यांना जिप्समचा वापर केल्यामुळे एकरी 11 ते 12 क्विंटलचे उत्पादन मिळत आहे. दरम्यान आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की जिप्समचा वापर हा भुईमूग पीक 40 ते 45 दिवसांचे झाल्यानंतर केला पाहिजे.
हे काम करा उत्पादनात वाढ होणार
सर्वप्रथम भुईमुग पेरणी करण्यापूर्वी बीजोपचार करण्याचा सल्ला दिला जातो. तसेच पेरणी करताना कडुलिंबाची पेंड अर्थातच नीम केक वापरण्याचा देखील सल्ला जाणकार देतात. यामुळे पिकांवर रोगराई कमी प्रमाणात येत असते. कीटकांचे देखील प्रादुर्भाव कमी होत असतो.
जाणकार लोकांच्या मते शेतकऱ्यांनी भुईमूग पिकासाठी प्रति हेक्टरी 250 ग्रॅम जिप्सम व्यतिरिक्त, 15 किलो नायट्रोजन आणि 60 किलो स्फुरद देखील प्रति हेक्टरसाठी वापरले पाहिजे यामुळे भुईमुगातील तेलाचे प्रमाण आणि भुईमूग बीयांची संख्या वाढण्यास मदत होते. परिणामी उत्पादनात भरघोस वाढ होते.