Monsoon Update: पंजाबरावांचा आजचा हवामान अंदाज…! हवामानात झाला मोठा बदल; आजपासून पावसाचा जोर कमी होणारं, पण….

Ajay Patil
Published:

Monsoon Update: राज्यात गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र मुसळधार पावसाची (Rain) हजेरी बघायला मिळत आहे. यामुळे राज्यातील अनेक भागात जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र आहे. राज्यात कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे (Monsoon) खरीप हंगामातील पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी होत आहे.

यामुळे शेतकरी बांधवांना हजारो रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागणार आहे. शिवाय शेतकरी बांधवांनी पेरणीसाठी केलेली सर्व मेहनत वाया जाणार आहे. शेतकऱ्यांचा मते, सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे (Monsoon News) खरीप हंगामातील पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी होत असून अजून काही काळ असाच पाऊस सुरू राहिला तर खरीप हंगामात अति पावसामुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागू शकते.

गेल्या काही दिवसांपूर्वी राज्यातील अनेक भागात पावसाने दडी मारल्यामुळे म्हणजेचं पावसाअभावी तेथील शेतकरी बांधवांना दुबार पेरणी करावी लागली होती. मात्र आता अति पावसामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणी करण्याचे संकट ओढावले आहे. यामुळे शेतकरी बांधव सध्या पाऊस उघडण्याची वाट पाहत असल्याचे चित्र आहे.

दरम्यान आपल्या हवामान अंदाजासाठी संपूर्ण महाराष्ट्रात नावलौकिक मिळवलेले पंजाबराव डख साहेबांचा नवीनतम अंदाज (Panjabrao Dakh Havaman Andaz) आता सार्वजनिक झाला आहे. शेतकरी बांधव पंजाबरावांच्या अंदाजाकडे (Panjab Dakh Weather Report) अतिशय बारीक लक्ष लावून असतात.

यामुळे आपण आपल्या शेतकरी वाचक मित्रांसाठी पंजाबराव (Panjabrao Dakh) यांचा सुधारित मान्सून अंदाज दररोज आणत असतो. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया पंजाब रावांचा सुधारित मान्सून अंदाज.

पंजाब राव (Panjabrao Dakh News) यांनी वर्तवलेल्या सुधारित अंदाजानुसार आज 15 जुलै रोजी राज्यातील पावसाचा जोर कमी होणार आहे. आज पासून राज्यात सर्वत्र पावसाचा जोर कमी होईल, आणि राज्यातील अनेक भागात सूर्य दर्शनाचा योग देखील बनेल.

निश्चितचं गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात सूर्य बघायला मिळत नसल्याने राज्यातील जनतेसाठी पंजाब रावांचा हा अंदाज दिलासा देणारा ठरणार आहे. पंजाबराव यांच्या मते, उत्तर महाराष्ट्रात सूर्याचे दर्शन थोडा उशीर होणार आहे. उत्तर महाराष्ट्रात विशेषता नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यात 17 तारखेपासून सूर्यदर्शन होण्यास प्रारंभ होणार आहे.

मात्र, या कालावधीत राज्यातील अनेक भागात पाऊस कोसळणार असल्याचे देखील पंजाब राव यांनी स्पष्ट केले आहे. पंजाबरावं यांच्या मते, राज्यात सूर्यदर्शन होणार मात्र या दरम्यान राज्यात पाऊस देखील कोसळणार आहे. या कालावधीत कोसळणारा पाऊस मात्र राज्यात सर्वदूर नसून राज्यातील काही जिल्ह्यापुरताच मर्यादित राहणार आहे.

सतरा तारखेपासून राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार असून या कालावधीत राज्यात विशेषतः पूर्व विदर्भात मुसळधार स्वरूपाचा पाऊस कोसळणार आहे. पंजाबराव यांच्या मते, पूर्व विदर्भात 17 तारखेपासून 20 तारखेपर्यंत सर्वदूर पाऊस बघायला मिळू शकतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe